Mar 04, 2024
प्रेम

पारिजात ... गंध प्रेमाचा..! भाग -7

Read Later
पारिजात ... गंध प्रेमाचा..! भाग -7

( मागील भागात आपण बघितलं रावीचा हॉस्पिटलचा पहिला दिवस... आणि तिला झालेली पनिशमेंट...

सुमतीला आठवलेली अनीची पहिली भेट...

आता पुढे.... )


****************************-****************

आपण वाचत आहात एक भन्नाट प्रेमकथा...  गंधाळलेल्या प्रेमाची.. पारिजातकच्या सुगन्धासारखी....


" ...  खुलली ना कळी माझ्या बाळाची... "

हसत ती म्हणाली.
" येस मॉम..! तू म्हणजे ना सोलुशन आहेस माझ्या सर्व प्रॉब्लेम्सचा... लव यू मॉम..! "


रावी फ्लाईंग किस देत म्हणाली.


" लव यू बच्चा...! "सुमतीनेही तिला फ्लाईंग किस दिली ...


कॉल कट झाला..

तिची कॉफीही आटोपली...

पण प्राजक्ताचा सुगन्ध मनात रेंगाळतच होता...


अजूनही...
.
.
.
.
..... रात्र बरीच झाली तरी सुमतीचा डोळा लागत नव्हता... ह्या कडावरून त्या कडावर ती नुसती पलटत होती.. ती उठून हॉलमध्ये आली. सोफ्यावर बसून डोळे मिटले... तरी तिची अस्वस्थता वाढतच होती. एक उसासा सोडून ती परत किचनकडे गेली. पाणी पिऊन बाहेर येतंच होती की मनानं विचारलं...
" एक कप कॉफी...? "
".... आत्ता...?? "  - ती.
".... चालतंय की..! "  - तिचं मन.
मग ती हसली... मनातच..!
" कॉफीचा मग घेऊन ती हॉलमध्ये आली.
टीव्ही ऑन केला... आणि बसली मग चॅनल चेंज करत...
" रावी असती तर मस्त कॉर्टून बघितले असते... "
नकळत तिला रावीची आठवण आली..
"... स्वतः काय कमी कॉर्टून आहे ती..? "
मनात प्रश्न आला आणि ती पुन्हा हसली...  स्वतःशीच !
चॅनल चेंज करता करता एका म्युझिक चॅनलवर थांबली.. कधीकाळी तिचं खूप आवडतं असलेलं गाणं सुरु होतं...


"...आज कल पॉंव जमीं

पर नहीं पडते मेरे

बोलो देखा हैं कभी
तुमने मुझे उडते हुए
आज कल... "


तिनं कॉफीचा मग ओठांना लावला...

उफ्फ...
ते रेखाचं अभिजात सौंदर्य..
अन् तो लतादीदींचा काळजाला भिडणारा तरल स्वर...
गाण्या - बिण्यात तिला फारसा रस नव्हताच आधीपासून... पण अनिकेत आयुष्यात आल्यावर ती गाणे ऐकायला कशी शिकली..?
आठवून तिलाच हसू आलं..
प्रेमात पडल्यावर अचानक कसे काय बदलून जातो ना आपण..?
काय काय करायला लावतो हे प्रेम..?
ती डोळे मिटून लतादीदींचा आवाज हृदयात साठवून घेत होती...

"...  नींद सी रेहती हैं
हलका सा नशा रेहता हैं
रात दिन आँखों में
इक चेहरा बसा रेहता हैं
पर लगी आँखों को देखा हैं
कभी उडते हुए
आज कल... "

त्या मिटलेल्या डोळ्यासमोर तिचा अनी पुन्हा येऊन उभा ठाकला...! ओठांवर तेच मिश्किल हसू घेऊन...!!
.
.
.
.
.... ती पारिजाताची फुलं घेऊन आजीच्या रूममध्ये गेली... तसा तोही तिच्या मागोमाग आला ..
" आली का गं माझी सुमा.. "
आजी म्हणाली.
"... हो आजी... आले मघाशीच. पण ह्या नमुण्यामुळे उशीर झाला. "
त्याच्याकडे रागानं पाहत ती म्हणाली.
"अनिकेत मुळे..? का गं काय केलं त्यानं..?"
तिच्या ओंजळीतील फुलं घेत आजीनं विचारलं.
" अगं धक्का दिला मला... सगळी फुलं खाली सांडली... "
- ती.
" ये... मी धक्का दिला नाही हं.. तू येऊन धडकलीस मला.. "
-तो.
" मला काय माहित रे तू दारात उभा राहणारेस म्हणून.. "
-ती.
" तर मग मलाही कुठं माहित होतं गं तू अशी धाडकन आत येणार आहेस म्हणून... "
-तो.
त्यांचे शाब्दिक वार सुरु झाले..
"... अरे.. अरे..
सुमा.. अनिकेत...  काय हे लहान मुलासारखं भांडत आहात..?
चला एकमेकांची माफी मागा.. "
तसे दोघं शांत झाले..
सुमानं त्याच्याकडं बघून नाक वाकडं केलं.. त्यानंही आपल्या नाकाचा शेंडा उडवला..
" अरे काय सुरु आहे तुमचं..? चला माफी मागा.. "    - आजी.
" आजी... पहिले याला सांग गं.. "        - ती.
" नाही....! पहिले हिला सांग.. "           - तो.
दोघेही माघार घ्यायला तयार नव्हते... मग आजीच म्हणाली...
" चला दोघेही एकत्रच कान पकडा.. आणि माफी मागा... "
आजीचा आवाज मोठा झाला तसं दोघांनीही तिच्याकडे पाहीले आणि पटकन कान पकडून एकाचवेळी म्हणाले..
".. सॉरी.. "
"... हम्म..! चला आता एकमेकांचे हात हातात घेऊन मैत्री करा... "
आजीनं फर्मान सोडलं..
"... आजी मी नाही करणार गं ह्या नमुन्यासोबत मैत्री... "
ती त्याला वेडावत म्हणाली.
तोवर त्यानं हात समोर केला होता..

तिच्याकडे बघत...


तिची नजर पुन्हा स्थिरावली... त्या काळ्याभोर डोळयांत.. आणि आपसूकच तिचाही हात समोर आला.. तिच्या नकळत...

.
तसा त्यानं झटकन आपला हात मागं घेतला..


"...मलाही कुठं ह्या नकटु सोबत मैत्री करायची आहे.. "
तो तिला चिडवत म्हणाला.
".. मी नकटु होय.. थांब बघतेस तुला.. "
त्याला मारायला तिनं उशी घेतली.
"... हो नकटु..!  सारखी नाक वाकडं करत असतेस.. "
तो कॉटच्या भोवती पळत म्हणाला..
" मी नकटु ना.. तू.. तू आंधळा.. एवढी मोठी मी दिसले नाही तुला.. "
ती त्याच्यामागे उशी घेऊन पळत होती..
"  तू तिखट मिरची.. "   - तो.
" तू कडू कारलं... "   - ती.
"  तू जाडी म्हैस.. "   - तो.
"कुठून तुला जाडी दिसतेय रे... तूच ढोल्या..."
- ती.
पळून पळून दोघांचेही श्वास लागले होते..
ती  पुन्हा काही बोलणार तोच अनिकेत तिच्यासमोर आला..
"... फ्रेंड्स...?? "
त्यानं पुन्हा तिच्यापुढे हात धरला...
पुन्हा तेच त्याचे कळेभोर डोळे...
पुन्हा तेच तिचं त्यात हरवणं...
मन म्हणालं...  " नाही सुमा.. थांब...!! "
पण हात केव्हाच  त्याच्या हातात गेला होता.
".. हं.. हं.. मी पण आहे म्हटलं तुमची मैत्रीण... "
आजी खाकरत म्हणाली.
तसे दोघांनी तिच्याजवळ जाऊन  तिला मिठी मारली...
आजी अंथरुणाला खिळली होती... पण होती मोठी गोड...


"... ये.. मी तुला अनी म्हणू..?? "
ती विचारत होती.
" येय.. मोठा आहे हं मी तुझ्यापेक्षा.. दादा म्हणायचं मला. "
तो डोळे मोठे करत म्हणाला.
".. ये.. मित्र झालो ना आता आपण..?? मग दादा वगैरे काही नाही.मी तुला अनीच म्हणणार.. पटलं तर ठीक नाहीतर जा उडत... "
ती आपल्या अटीट्युड मध्ये येत म्हणाली.
" हम्म.. ठीक आहे.., मग मी तुला नकटु म्हणणार.. "
तो हसून म्हणाला.
".. अजिबात नाही हं...! "
ती पटकन म्हणाली.
" सगळे मला सुमा म्हणतात... तू पण म्हण.. "
- ती.
" नाही  सुमापेक्षा मी तुला  सुमी म्हणणार...  चालेल..?? "
- तो.
"चालेल..! "
.

.
" सुमा ss "
आईचा आवज आला तशी ती जायला वळली..
" आले ss...
येते गं आजी.. "
ती पळतच निघाली.
" सुमी ss.. "
तो.
" हं... "
तशी ती थबकली...
"... बाय... "
तो हसून म्हणाला. तीनही हसून हात हलवला... आणि ती गेली.
"... आजी मीही जातो गं... आंघोळ करून घेतो."

तो म्हणाला आणि आजी काही बोलायच्या आत निघूनही गेला.
"... मुलं असली घरात तर कसं घर भरलं असतं ना..! "
स्वतःशी आजी म्हणाली...
.
.
.
.... पहिल्या भेटीत भांडणारे ते...दोन दिवसांतच त्यांची चांगली गट्टी जमली..
"... मावशी इथे जवळपास फिरण्यासाठी एखादं ठिकाण नाहीये का गं..? घरात खूप बोअर होतेय.."
अनिकेत विचारत होता.
"... अरे सुमासोबत जा.. ती तुला आणेल बघ फिरवून..! "
दिवेकर काकू म्हणाल्या.
.
.
".... चलायचं..? "
ती विचारत होती.
" कशाने...? " - तो.
" अरे सायकल आहे नं.. "
" मला नेशील डबलशीट..? "
" ये ढोल्या... मी माझ्या सायकलने आणि तू ताईची सायकल घे... कळलं..?? "
परत आली ती अटीट्युड मध्ये.
" हो हो.. जाडे ठीक आहे , चल..!"
तो तिला चिडवत..
तशी तिनं एक खुन्नस नजर टाकली त्याच्यावर.
" ओ.. सॉरी सॉरी... सुमी चलायचं...? "
कान पकडून तो म्हणाला तशी ती हसली... गालात.
अन् तो बघत राहिला गालावर पडणाऱ्या गोड खळीकडे...
" चल... जाऊया... "
ती म्हणाली तसा तो भानावर आला...
... तिनं त्याला फिरवलं तिचं शहर.. ते देवीचं मंदिर.. तिची शाळा... अजून बरंच काही..
"घरी निघायचं...? " ती म्हणाली.
"... बस... एवढंच आहे का गं इथे फिरायला..? "
-तो.
" आहे एक पुन्हा ठिकाण.. जायचं..? "
ती विचारत होती...
त्यानं मानेनच होकार भरला.
सायकल रपेटत दोघं निघाले.. गावापासून दूर एका ठिकाणी एका ओढ्याजवळ ती त्याला घेऊन आली..
"अरे वाह.. मस्त जागा आहे ही..! "
मोकळ्या हवेत श्वास घेत तो म्हणाला.
"पण करायचं काय इथे...? "
त्यानं प्रश्न केला.
" ये सांगते..!"
त्याचा हात पकडून त्याला ती अगदी ओढ्याशेजारी घेऊन आली.
" या इथं असं बसायचं.. पाण्यात पाय मोकळे करून... "
आणि  सांगता सांगता ती बसलीही पाण्यात पाय सोडून.
मग तोही बसला तिच्या शेजारी..
सूर्य हळूहळू मावळतीकडे कलत होता.. त्याच्या सोनेरी चंदेरी किरणांनी पाणी चमकत होतं..
"... आणखी काय करायचं..?? "
तो म्हणाला.
" आणखी...??

हां छोटे छोटे दगड घ्यायचे आणि पाण्यात फेकायचे... बघ किती छान तरंग उठतात...! "
ती एक दगड टाकत म्हणाली...
"... आणखी... आणखी जर गळ असता ना आपल्याकडे तर मासेही पकडायचं शिकवलं असतं.."
थोडा  पॉज घेऊन ती म्हणाली.
" इई ss मासे..?? मी अजिबात खात नाही. शुद्ध शाकाहारी आहे मी..!"
-तो.
" हो..??
मी तर शुद्ध मांसाहारी..! "
ती हसत म्हणाली.
" तो कोंबडीचा तांबडा पांढरा रस्सा..  ते माशांचे कालवन..  आहाहा!! जिभेला पाणी सुटलं निव्वळ नाव घेऊन.. "
ती  मुद्दाम चिडवत म्हणाली.
" सुमी ss मला उलटी होईल आता.. "
कसानुसा चेहरा करत तो म्हणाला.
" अरे सॉरी सॉरी.. मी तुला चिडवत होते.. "
ती कान पकडून म्हणाली.
तसं रागानं त्यानं तिच्याकडे पाहिलं..
"अरे समोर बघ.. किती मस्त दृश्य आहे..! "
त्याचं लक्ष समोर वेधत ती म्हणाली.
" काय..? "
-तो.
".. बघ ना.. आकाशात कशी लाली पसरली आहे.. पक्षी त्यांच्या घरट्याकडे परतत आहेत..
तो सूर्य.. ते आकाश.. ते वेगवेगळ्या आकाराचे ढग.. ते पक्षी... सारंच किती मस्त वाटतेय ना..!! "
ती त्या विश्वात रमुन गेली.
"... हो पण मला नाही आवडत मावळतीचा सूर्य.. "
तो म्हणाला.
"का रे..? "
" काय पहायचं गं  एवढं त्या मावळतीच्या सूर्यात...?? काही काळ नेत्रसूख अनुभवलं की पूर्ण जग अंधारात गुडूप होतो..
पाहायचाच आहे तर उगवतीचा सूर्य पहा नं.. तेव्हाही तीच लालिमा असते आकाशात.. पक्षांची किलबिलही तीच असते.. सूर्याची सोनेरी चंदेरी किरणेही तीच असतात... पण त्यात सामर्थ्य असतं पूर्ण जग  पुन्हा उजळण्याचं...! "
तो बोलत होता..
" कित्ती छान बोलतोस रे तू... असं वाटतं की ऐकतच राहावं...! पण तरीही मला मावळतीचाच सूर्य जास्त आवडतो.. "
ती म्हणाली.
"...आपल्या कोणत्याच आवडी जुळत नाहीत गं  "
तो म्हणाला.
दोघे काही नं बोलता तसेच बसले होते.
थोडा वेळ गेल्यावर त्याच्या पायाला गुदगुल्या होऊ लागल्या.
तसा तो हसत म्हणाला.
"ये सुमी... पायाला काय होतंय गं.. "
" ते रे... ते मासे आहेत.. पायांशी खेळताहेत तूझ्या.. "
ती हसत.
" काय..? "
त्याने झटकन पाण्यातून पाय बाहेर काढले, आणि उठून उभा राहिला.
" चल इथून.. "
तो थोडा चिडून म्हणाला.
तिला हसायला येत होते. तशीच ती हसत गाफिल उठली आणि तिचा पाय घसरला..
त्यानं पटकन तिचा हात पकडून तिला आपल्याकडे ओढलं. तशी ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली..
क्षणभर काय होतेय तिला काही कळलं नाही. आपले डोळे तिने गच्च बंद केले.
तिला तसं बघून तो हसला.. मिश्किल...

" काही नाही झालं एवढं..! तू पडली असती म्हणून ओढलं तुला.. "
तो म्हणाला.
तसं डोळे उघडले तिनं.. आणि झटक्याने दूर झाली..
" थॅंक यू.. निघायचं आता..?? "
तिनं विचारलं... तिची नजर खाली झुकली होती....
आणि...
दोघे घराकडे परत निघालेही ....
तिचं मन मात्र गुणगुणत होतं...
जब भी थामा हैं तेरा
हाथ तो देखा हैं
लोग कहते हैं के
बस हाथ की रेखा हैं
हमने देखा हैं दो तकदीरो को जुडते हुए..
आज कल पॉवं जमीं पर नहीं पडते मेरे
बोलो देखा हैं कभी
तुमने मुझे उडते हुए..
आज कल पॉवं जमीं पर
नहीं पडते मेरे...

.

.

.


...... क्रमश :


       ***********************************

आवडला का आजचा भाग...??

आवडला तर नक्की कॉमेंट करा...

नाही आवडला तर..??

तर हक्काने सांगा...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//