पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग -6

एक भन्नाट प्रेमकथा... गंधाळलेल्या प्रेमाची... पारिजातकाच्या सुगंधासारखी....



आपण वाचत आहात एक भन्नाट प्रेमकथा... गंधाळलेल्या प्रेमाची पारिजातकच्या सुगंधासारखी....


( मागील भागात आपण पाहिलंत.. रावीचा हॉस्पिटलचा पहिला दिवस.. आणि त्यात तिच्या मिस्ट्री मॅन मुळे झालेला उशीर...! वेळेच्या बाबतीत अगदी panctual असलेले साठे सर कसे रिऍक्ट होतील.. वाचा आजच्या भागात...)




...पळता पळता ती पायऱ्यांना धडकणार पण कशीबशी वाचली. तिचा धान्दरटपणा बघून त्याला हसायला आलं.. हसतच तो तिथून निघाला...
.
.
.
... रावी पळतच डॉक्टर साठेंच्या केबिनपाशी आली.


" डॉक्टर साठे इज इन..?? "
काउंटर सिस्टरला तिने विचारलं.
" डॉक्टर रावी..? "


तिच्या हातातील ऍप्रॉन आणि स्टेथॉस्कोप बघून सिमा सिस्टर ने विचारलं.
" येस..! "
स्माईल करत ती उत्तरली.


" मॅम.. सर राऊंडवर आहेत.. त्यांनी तुम्हाला आत बसायला  सांगितलंय. " 

 - सिस्टर.
ती डोअर उघडून आत गेली.
इकडे सिमा सिस्टरने आपल्या सहकारी मैत्रिणीला टाळी दिली..
" आज सरांच्या गळाला लागलेल्या ह्या माशाचं काही खरं नाही.. "
सिमा तिला म्हणाली आणि दोघी हसायला लागल्या..


रावी आत आली.. केबिनच्या रॅकमध्ये बरीच पुस्तकं होती.. इकडेतिकडे बघत ती चेअरवर बसली.

" उशीर झाल्यामुळे सर रागावले असतील का.. "
ती मनात म्हणाली. वरवर दाखवत नसली तरी मनातून मात्र ती घाबरली होतीच.
केबिनचे दार उघडले तशी ती धाडकन उठून उभी राहिली. डॉक्टर साठे आत आले होते.
" गूड मॉर्निंग सर.. "
तिने ग्रीट केलं. तसा त्यांनी तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि आपल्या खुर्चीवर जाऊन बसले. त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्व पाहून ती भारावून गेली.
" गूड मॉर्निंग सर.. " तिने परत विश केलं.
" आय एम डॉक्टर रा.. "
ती काही बोलणार तेच ते म्हणाले,
" डॉ. रावी.. तुमचा वेळ काय यायचा??"
त्यांनी सरळ मुद्द्याला हात घातला.
" I\"m sorry sir.. पंधरा मिनिटे उशीर झाला मला.. "
ती खाली बघत म्हणाली.
" पुस्तकं बघितली ही..?? "
-डॉ. साठे.
" हां..?? "
काही न कळून ती म्हणाली.
" you saw these books..? "
करड्या आवाजात ते परत म्हणाले.
"... येस सर.. "   - ती.
" रॅक मधून त्यांना बाहेर काढायचं नी नीट पुसून परत त्याच जागेवर व्यवस्थित ठेवायचं...
This is today\"s work for u.. Got it?  "
त्याच नजरेने तिच्याकडे पाहत ते म्हणाले.. आणि त्यांनी बेल वाजवली.
"  येस सर.. "
सिस्टर आत येत म्हणाली.
" सिमा.. पेशंटला पाठवा आत... "- डॉ. साठे.


तिला करावे काही सुचेना. ती तशीच रॅकसमोर जाऊन उभी राहिली. साठे सरांनी परत तिच्याकडे तोच कटाक्ष टाकला.. तशी ती एकेक पुस्तक बाहेर काढू लागली... मनात तिला खूप वाईट वाटत होतं. रागही येत होता.. स्वतःचा आणि त्या मिस्ट्री मॅनचा ही. त्याच्यामुळेच तिला उशीर झाला होता... ज्या साठे सरांसोबत काम करायला ती इतक्या दिवसांपासून आतुरली होती त्यांच्यासमोर पहिल्याच दिवशी तिचं इम्प्रेशन डाउन झालं होतं. डोळ्यात पाणी आणून ती पुस्तकं ठेऊ लागली...
थोडया वेळाने टी ब्रेक झाला. तिचेही काम आटोपले. ती उभीच होती.


"... सीट "  - ते म्हणाले.
ती खाली मान घालून बसली.
" Tea or cofee..? What do u want? " त्यांनी विचारलं.
" Nothing.. "
ती पुटपुटली.
" I think... तुम्हाला कॉफीची जास्त गरज आहे आता... " डॉ. साठे.
कॉफी घेता घेता दोन मिनिटं शांततेत गेली. मग तिनेच बोलायला सुरुवात केली.


" Actually sir ,

मी वेळेतच पोचले होते पण एक मुलगा मला सारखा स्टॉक करतोय.. त्याच्यामुळे   उशीर झाला..."

- ती.
" see doctor..

Don\"t mix ur personal life with ur professional.. ok..? U are a doctor and u must be panctual at your work.. कधी दोन मिनिटांच्या वेळाने एखाद्याचा जीवही जाऊ शकतो.. "
-डॉ. साठे.


" सॉरी सर ह्यापुढे असं नाही घडणार... "

ती बोलली...


ब्रेक नंतर पुन्हा डॉक्टर साठे पेशंट चेक करायला लागले. रावी केवळ ऑबजर्व करीत होती. थोडया वेळाने त्यांनी तिला एक पेशंट बघायला सांगितलं.


" बोला ताई काय होतेय..? "     - ती.
" अंगावर जातंय.. " - पेशंट.
" कधीपासून... "    - ती.
" झालेत तीन चार महिने.. "     - पेशंट.
":एवढे दिवस का नाही आलात मग..? - रावी .
" नवरा सगळे पैसे दारूत उडवतो.. मारतो मला.. दवाखान्यासाठी कुठून आणणार पैसे.. " डोळ्यात पाणी आणत ती म्हणाली.
" ठीक आहे.. मी औषध लिहून देते.. ती घ्या बरोबर.. "
रावीने तिला औषधं लिहून दिली..


ती गेल्यावर डॉ. साठे तिला म्हणाले,
" अशी घेतात केस..? "
रावी त्यांच्याकडे बघत राहिली.
" तुमच्याकडे येणारे पेशंट ह्या महिला असतात.  कित्येकदा गरीब कुटुंबातल्या. तेव्हा प्रश्न विचारताना पेशंटच्या डोळ्यात बघा. While consulting,you must feel the pain of that patient.. तेव्हाच तुम्ही  त्यांना एक समाधान देऊ शकाल.डॉक्टरांचं काम फक्त औषध देणंच नाही तर पेशंटचे मानसिक समाधानही आवश्यक आहे... "
ते बोलत होते.
तिला आत्ता कळलं तिचं काय चुकलं...  डॉक्टर तर आहोतच आपण पण त्यापूर्वी एक माणूस म्हणून त्या पेशन्टकडे बघायला हवं.. तेव्हाच कळेल की समोरच्या व्यक्तीला काय हवंय..!
.
.
.
तिचा वेळ झाला तसं साठ्यांनी तिला जायला सांगितलं. केबिनच्या बाहेर ती निघाली तशी बाहेरच्या सिस्टरांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. सगळ्यांना कुतूहल होतं.. हिचा चांगलाच समाचार घेतला असेल साठ्यांनी...!
त्यांच्याकडे एक जरबेची नजर टाकून ती हॉस्पिटलच्या बाहेर पडली. श्रुती तिची वाटच बघत होती.
" ये   हा s य..!
कसा गेला मग आजचा दिवस..? "
एकसाईटमेन्ट मध्ये श्रुतीने तिला विचारलं. तशी तिच्या गळ्यात पडून ती रडायला लागली.
" अगं.. काय झालंय.. रावी..?? " तिने विचारलं.
तसा तिने सकाळपासून घडलेला सर्व वृत्तांत सांगितला.


" ओके.. Calm down..

चल निघूया आपण.. नाहीतर उद्या पुन्हा तुझे खडूस सर ओरडायचे
" डॉक्टर रावी... यू मस्ट बी पंक्च्युअल.. घरी अगदी वेळेत पोहचायला हवं.. "
त्यांची ऍक्टिन्ग करत श्रुती बोलली.. तसं दोघीही हसत घराकडे निघाल्या...
.
.
.
.
.... सायंकाळचे चार वाजत आले होते..

आपला कॉफीचा मग घेऊन सुमती तिच्या बालकनीच्या आवडत्या कोपऱ्यात आली. पारिजातकाचा मंद सुगंध तिच्या मनात भिनला होता... रोजच्यासारखाच....


"... ह्या प्राजक्ताच्या सुगन्धाप्रमाणेच अनीही माझ्या मनात भिनला आहे...! "
रावीला सांगितलेलं तिला आठवलं. आणि उगाचच गाल लाल झाल्यासारखे तिला वाटले.
"... ईश्श..! हे काय आताही लाजायला काय होतंय मला.."
ती स्वतःशीच बोलली.
"..अनी आताही माझ्यासोबत आहे असं वाटतं मला... पण त्यालाही येत असेल का माझी आठवण..?? " पुन्हा तिनं स्वतःला विचारलं.
तो चिडका.. पण तेवढाच हळवा..
वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर... तरीही तिला झालेला उशीर समजून घेणारा..

तिचा अनी तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला... मग त्याचा हात पकडून तीही गेली त्याच्यासोबत... तिच्या भूतकाळात....
.
.
.
... आई , बाबा, ती आणि मालती ताई... त्यांचं एक चौकोनी सुखी कुटुंब होतं.. वन बी एच के फ्लॅट मध्ये त्यांचं आनंदात चालले होते.. दोन महिन्यापूर्वीच समोरच्या फ्लॅट मध्ये दिवेकर फॅमिली राहायला आली होती. दिवेकर काका काकू आणि आजी.. बस्स. एवढेच त्यांचे कुटुंब. धन दौलत सगळं काही होतं त्यांच्याकडे.. नव्हते ते स्वतःच्या मुलांचं सुख..  खूप प्रयत्न करूनही त्यांना काही संतानप्राप्ती झाली नाही शेवटी मग त्यांनी प्रयत्न करनेच सोडून दिले. काका -काकू खूप प्रेमळ होते.. आजीदेखील. दिवसाचा किती तरी वेळ सुमती त्यांच्याच घरी राहायची. सकाळी उठल्याबरोबर अंगणातल्या भल्यामोठया पारिजातकाची फुलं गोळा करून आजीला नेऊन देणे हे सुमतीचं नित्याचं काम. आजीही तो सुगन्ध हुंगून खुश व्हायची...


.... नुकतीच सुमतीची दहावीची परीक्षा आटोपली होती... बाबा सर्वांना  बाहेर घेऊन गेले.. बाहेरच जेवण.. आईस्क्रीम.. मस्त एन्जॉय करून रात्री उशिरा घरी परतले..
सकाळी उठल्या उठल्या ती नेहमीप्रमाणे खाली अंगणात फुललेल्या पारिजातकाची फुलं आजीसाठी घेऊन आली.. दिवेकर काकूंच्या फ्लॅटचा दरवाजा लोटून आत येताच ती कुणालातरी धडकली.. ओंजळीतील सारी फुलं खाली विखूरली. परत फुल गोळा करून तिनं वर पाहिलं. स

मोर एक मुलगा उभा होता.. निमगोरा.. नुकताच तारुण्यात पदार्पण केलेला.. काळ्याभोर डोळ्यांचा... क्षणभर ती त्या डोळ्यात हरवली. पण क्षणभरच...त्यानं तिला उठायला हात दिला.
" ये काय रे.. डोळे डोक्यावर घेऊन चालतोस काय..? "
ती त्याच्या हाताला पकडून उठत म्हणाली.
" ये s य शहाणे.., तुला उठायला मदत करतोय मी आणि माझ्याशीच भांडतेस होय..? "
असं म्हणत त्यानं हात सोडून हलका धक्का दिला.
" आं ss.. पडेल ना मी.. "
ती स्वतःला सावरत म्हणाली.
" दिवेकर काकू ss.., कोण नमुना आलाय हो तुमच्याकडे.. "
किचनकडे जात ती ओरडली तशा काकू बाहेर आल्या..
"... सुमा.. काय गं काय झालं..? "
काकूंनी विचारलं.
":बघा नं काकू.. यानं मला धक्का दिला. चांगली पडता पडता वाचले मी..!
कोण आहे हा..? "
त्याचीच कागाळी करत तिने विचारलं.
" हा होय? अगं हा माझ्या ताईचा मुलगा अनिकेत. बारावीच्या परीक्षा आटोपल्या ना तर आलाय माझ्याकडे.
आणि  अनी.., ही सुमा.. समोरच्या फ्लॅटमध्ये असते. खूप गोड मुलगी आहे.. "
त्यांनी एकमेकांची ओळख करून दिली.
" गोड..?? मला तर महातिखट वाटली.. "
तो हसत म्हणाला. तशी ती वाकडं नाक करून आजीच्या रूममध्ये गेली...
.
.
... ही अनीशी झालेली पहिली भेट..! भेट कसली.. भांडणच. पण काही असो त्या काळ्याभोर डोळ्यात मात्र नकळत अडकली ती....
.
.
.
.
.... ट्रिंग ट्रिंग...! मोबाईलच्या आवाजाने ती भूतकाळातून परतली. स्क्रीनवर रावीचा विडिओ कॉल झळकत होता..
" हॅलो बच्चा...काय मग कसा गेला पहिला दिवस..? हॅपी ना...?? "
कॉल घेत ती बोलली.
" नो मॉम.. नॉट हॅपी.. ते साठे सर कसले खडूस आहेत गं. जाम झापलं मला... "
रावीने सकाळचा सगळा वृतांत तिला सांगितला.
" ते काही असो पण काल पर्यंत तुझे आयडल असलेले साठे सर आज तुला ओरडल्यामुळे एकदम खडूस झाले का गं?  असं नसते बोलायचं बाळा.. तेच खरे गुरु असतात जे आपली चूक लक्षात आणून देतात. आज ते ओरडले नसते तर तिच चूक पुन्हा तुझ्याकडून घडली असती ना.. "
तिला समजावत सुमती म्हणाली.
" घे तू त्यांचीच बाजू.. समवयस्क असणार ना तुम्ही म्हणून तुला त्यांचं पटतेय. तो मुलगा मला त्रास देतोय हे नाही कळतंय कोणाला... "
रावी मुसमूसत म्हणाली.
" अगं माझा लाडोबा.. रुसला होय..
तसं नव्हे रे बच्चा तो मुलगा बोलला ना की तो तुला फॉलो नाही करतोय तर मग झालं ना. आणि तरी तुला वाटलंच असं काही तर सगळं सोडून पहिले पोलीस कंप्लेंट कर. शेवटी काय आपली सेफ्टी महत्वाची... "      -ती.
रावीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
" खुलली ना कळी माझ्या बाळाची... " हसत ती म्हणाली.
" येस मॉम..! तू म्हणजे ना सोलुशन आहेस माझ्या सर्व प्रॉब्लेम्सचा... लव यू मॉम..! "
रावी फ्लाईंग किस देत म्हणाली.
" लव यू बच्चा...! "सुमतीनेही तिला फ्लाईंग किस दिली ...


कॉल कट झाला.. तिची कॉफीही आटोपली...

पण प्राजक्ताचा सुगन्ध मनात रेंगाळतच होता...

अजूनही...

.

.

.

.

... क्रमश :



       *******************************

कसा वाटला आजचा part... कमेंट करून नक्की सांगा.. आवडल्यास like करा.

ही कथामालिका शेवटपर्यंत फ्री आहे..

🎭 Series Post

View all