पारिजात.. गंध प्रेमाचा..!
( मागील भागात आपण वाचलंत सुमीच्या कुटुंबियांचा झालेला भीषण अपघाती मृत्यू.
त्यातून वाचलेल्या सुमी आणि रावीची कथा…
त्यातून वाचलेल्या सुमी आणि रावीची कथा…
आता पुढे… पुन्हा वर्तमानात. )
*************
… शवाघरात ठेवलेले मालतीच्या सासरच्यांचे नी तिच्या कुटुंबियांचे मृतदेह…
तिने पाहिलं एकवार सगळ्यांना नी मोठयाने हंबरडा फोडला…
.
.
.
.
.
… रावी नसती तर कदाचित तिनंही जीवाचं काही बरंवाईट केलं असतं..
पण त्या चिमण्या जीवाला तिच्याशिवाय आणखी दुसरं कोण होतं..??
.
.
.
.
.
.
.
.
.
….. आठवणींचं ते गाठोडं सुमीनं बंद केलं..
छातीशी कवटाळलेल्या त्या अल्बमवर अजूनही अश्रुंची बरसात होत होती…
" रावी.. आय मिस यू यार..! गरज आहे मला तुझी..
आत्ता या क्षणी..!! "
आत्ता या क्षणी..!! "
तिनं डोळे मिटले…
" ढ्याs णs ट sड्या sण..
सरsप्राईजss… "
रावीचा गोड आवाज तिच्या कानात घुमला.
तिला वाटलं मनी वसे ते स्वप्नी दिसें सारखं स्वप्नचं पडलं तिला.
ती तशीच डोळे मिटून बसली.
" मॉम.. अगं खरंच आलेय मी. "
तिला पुन्हा आवाज आला.
मोठया धीराने तिने डोळे उघडले.. तर खरंच समोर रावी उभी होती.. ओठांवर गोड हसू घेऊन.
मोठया धीराने तिने डोळे उघडले.. तर खरंच समोर रावी उभी होती.. ओठांवर गोड हसू घेऊन.
" रावी..? केव्हा आलीस तू..? "
तिच्या चेहऱ्यावर मोठ्ठ आश्चर्य होतं.
" तुमने पुकारा और हम चले आए..! "
रावी हसत म्हणाली.
" अगं खरंच. मनात तेच होतं माझ्या की या क्षणी तू हवीस सोबत.. आणि तू समोर..!
तूला गं कसं कळलं हे..?? "
ती निरागसपणे विचारत होती.
" माझी गं ममुडी…! दिल का रिश्ता है यह..
आपोआप समझ मे आ जाता है..! "
रावी आपल्याच अंदाजात उत्तरली.
" हार्ट स्पेशालिस्ट व्हायला हवं होतं तूला.. चुकून गायनॅक होताहेस."
-सुमी.
" मॉम हार्ट स्पेशालिस्ट असते ना तर तूझ्या हार्टमध्ये ब्लूटूथ बसवलं असतं आधी.म्हणजे मग माझा बरा वॉच राहिला असता तूझ्या हार्टवर.. "
ती हसत म्हणाली.
".. पण माहितीये मम्मा.. असल्याप्रकाराची काही गरजच नाहीये गं.
तुझ्या या नाजूक हृदयाच्या स्पंदनांची खोली आपोआपच जाणवते मला.."
तुझ्या या नाजूक हृदयाच्या स्पंदनांची खोली आपोआपच जाणवते मला.."
-रावी.
तिच्या बोलण्याने भावुक झाली सुमी.
" रावी.. "
तिचा हात पकडत कातर स्वरात तिनं हाक मारली.
"ओह मॉम…
नो इमोशनल ड्रामा प्लीज हं.
रावी तू नसतीस तर माझं काय झालं असतं… वगैरे वगैरे मला अजिबात ऐकायचं नाहीये. कळलं..? "
नो इमोशनल ड्रामा प्लीज हं.
रावी तू नसतीस तर माझं काय झालं असतं… वगैरे वगैरे मला अजिबात ऐकायचं नाहीये. कळलं..? "
रावी तिला धारेवर धरत म्हणाली.
" पण हे खरंय ना बच्चा.. तू नसतीस तर खरंच काय झालं असतं माझं..? "
नको म्हणत असतांनाही एक थेंब ओघळालंच गालावर.
" मॉम..! तू नसतीस तर माझं काय झालं असतं हाही प्रश्न आहेच की. पण काही उत्तरं आहेत का या दोन्ही प्रश्नांची.
मुळात ही प्रश्नच चुकीची आहेत.
मुळात ही प्रश्नच चुकीची आहेत.
एकटीने मोठया हिमतीने सांभाळस तू मला.
आपण आहोत ना दोघी सोबत.. मग कशाला असले प्रश्न..?? "
तिच्या गालावरचा थेंब पुसत ती म्हणाली.
".. अँड लिसन..
व्हेन रावी इज हिअर..
नो मोअर टीअर्स…!
व्हेन रावी इज हिअर..
नो मोअर टीअर्स…!
ओन्ली चिअर्स..!! "
तिनं कॉफीचा मग तिच्या पुढ्यात ठेवला.
"कॉफी..? आत्ता??"
तिनं प्रश्नार्थक रावीकडं पाहिलं.
" बघू नको अशी. तूला गरज आहे म्हणून आणली.
आणि हो , हे तुझं आठवणींचं कपाट ना बंदच करून ठेवते मी..
उगाच सारखं डोळ्यात पाणी असते तूझ्या. "
अल्बम आत ठेवून कपाटाला लॉक करत रावी म्हणाली.
.
.
.
.
.
.
" खिचडी बेसन करते गं मी. चालेल ना तूला..?? "
किचनमधून रावीचा आवाज आला.
" अगं कशाला? शांता येईलच ना एवढ्यात. "
-सुमी.
" का गं? तूला जमत नाही माझ्या हातचं..? "
कमरेवर हात ठेवून तिनं विचारलं.
" तसं नाही गं..!
चार तास प्रवास करून आलीस तू. नी आल्या आल्या कशाला किचनमध्ये जातेस..? "
चार तास प्रवास करून आलीस तू. नी आल्या आल्या कशाला किचनमध्ये जातेस..? "
सुमी म्हणाली.
" अगं माझे आई ! पंचपकवान नाही गं .. साधी खिचडी करतेय मी. "
रावी हात जोडत म्हणाली.
" आणि मीच शांताकाकूला येऊ नको म्हणून सांगितलं आज रात्रीची. "
तिनं स्पष्ट केलं.
" एवढया लांबचा प्रवास करून माझ्यासाठी खिचडी बनवायला आलीयेस? "
-सुमी.
" मग! स्पेशल कुक आहे मी तुझी…!
ओन्ली फॉर एक्सक्लूजीव अँड प्रेशीअस पर्सन साठी..! "
ती जेवणाची भांडी टेबलवर ठेवत म्हणाली.
" इतक्या रात्रीची कशी आलीस बच्चा तू..? "
रात्री झोपताना तिच्या केसातून हात फिरवत सुमीनं विचारलं.
" अगं असंच.
एका वेळेस तीन तीन कप कॉफी प्यायलीस तू सायंकाळी.
तेव्हा वाटलं नक्कीच टेंशनमध्ये असणार तू. मग काय उचलली बॅग नी पोचले बसस्टॉप ला.
आणि शांताकाकूला एक कॉल केला येऊ नको म्हणून.. "
-रावी.
" किती गं तूला काळजी माझी. "
तिच्या गालाची पापी घेत सुमी म्हणाली.
" मग घ्यावी लागते…
आफ्टरआल तेरी यार हूं मै..!"
रावी तिला मिठी मारत म्हणाली…
.
.
.
.
.
.
.
उद्यापासून रावीची इव्हीनिंग शिफ्ट… त्यामुळे सकाळीच ती निघणार होती.
सकाळी कॉलेजला जाताना सुमीने तिला बसस्टॉपला सोडलं.
" नीट जा गं. नी पोहचली की कळव मला.. "
हात हलवत सुमी म्हणाली.
" हो गं. रडू नकोस तू आता.. नाहीतर कॉलेजला पोहचण्यापूर्वीच मेकअप खराब होईल तुझा..! "
बसच्या खिडकीतून रावीनेही हात दाखवला.
.
.
.
.
.
… बस सुरु झाली… त्याबरोबरच रावीच्या डोक्यातील विचारचक्रही…
" बस्स..! ठरलं आता. आता एकच मिशन..
शोधमोहीम… सुमीच्या अनीची..!
लग्नाचा किंवा बिनलग्नाचा..!
पण मिस्टर अनी तुमको ढुंढके रहेगी ये सुमीकी दिवानी..!! "
शोधमोहीम… सुमीच्या अनीची..!
लग्नाचा किंवा बिनलग्नाचा..!
पण मिस्टर अनी तुमको ढुंढके रहेगी ये सुमीकी दिवानी..!! "
नेहमीप्रमाणे ती एकटीच बडबडायला लागली...
.
.
.
.
.
.
.
.
.
" हेय पार्टनर..! हाय!! "
आपली स्कूटी पार्किंगहुन काढताना एक ओळखीचा आवाज कानावर आला..
" विराज..? तू?
तू काय करतोहेस इथे..?? "
तिनं हसून विचारलं.
" अगं हॉस्पिटलला चकरा मारत असतो मी..
तूला तर माहितीये ना. "
तूला तर माहितीये ना. "
-तो.
" हो रे. एव्हाना कळलं मला ते. पण का मारतोस ते नाही सांगितलंस.
काही दुसरी सेटिंग वगैरे आहे काय? "
डोळे मिचकावत तिनं विचारलं.
" अजून पाहिलीचा पत्ता नाही , दुसरी कुठून आणायची..? "
तोही तिच्या मस्करीत सामील झाला.
" खोटं नको बोलू हां. मला माहितीये तुझी हनी. "
-रावी.
" कोण हनी..? "
-विराज.
" ती नाही का मॉलमध्ये तूला मिठी मारणारी..!"
ती म्हणाली.
" फिलिंग जेलस हं? "
तो हसला जरासा.
"चल रे मी कशाला जेलस होऊ..? बरं निघते मी आता. उशीर होतोय. "
गाडी स्टार्ट करून निघालीही ती.
" पार्टनर.. "
तो परत तिच्या पुढ्यात उभा ठाकला.
" काय..? "
नजरेनंच तिनं विचारलं.
" नी काय रे सारखं सारखं पार्टनर म्हणतोयस??
कसली पार्टनरशिप आहे आपली? "
ती.
" ते आत्ताच कसं सांगू..?
भेटल्यावर सांगेनच की."
मिश्किल हसत तो म्हणाला.
" अरे हो. ते राहिलंच की.
कधी भेटायचं सांग."
कधी भेटायचं सांग."
-रावी.
" मागे मी ठरवलं.. आता तुझी टर्न."
-तो.
" ओके.. मी कॉल करेन तूला. "
-ती.
" नंबर आहे माझा तुझ्याकडे..?"
त्यानं विचारलं.
"नाही ना..!"
तिनं जीभ चावली.
" दे ना मग.तेव्हाच कळवेन ना मी तूला .. "
ती.
ती.
नंबर एक्सचेंज करण्याची पद्धत आवडली त्याला.
बाय करून तो निघाला.
" बाय.. "
तिनंही घराकडे धूम ठोकली…
.
.
.
.
.
.
.
.
.
आठवडा सरत आला.. पण तिने काही फोन केला नव्हता. स्वतःहुन कॉल करण्यातला विराजही नव्हताच…
व्हाट्सअपचे प्रोफाइल पिक्चर चेक करण्याशिवाय दुसरं काहीच ऑपशन नव्हतं त्याच्याकडे.
प्रोफाइलला तिचा फोटो देखील नव्हता. त्याला वाटलं काय मुलगी आहे यार ही.. साधा आपला फोटो देखील ठेवत नाही..
…. आणि शनिवारी सकाळी सकाळी मोबाईल वाजला.
" हॅलो.. कोण? "
ओळख न दाखवता त्यानं विचारलं.
ओळख न दाखवता त्यानं विचारलं.
" काय रे अजूनही झोपेतच का..? "
तिनं विचारलं.
तिनं विचारलं.
" नाही... पण आपण कोण?"
" सॉरी.. रॉंग नंबर.
ठेवते मी… "
" वेट वेट.. पार्टनर..!"
आठवल्यासारखं करून तो बोलला.
" कशी आठवण आली अचानक..?? "
वाट तर तो रोजच पाहत होता पण सांगणार कसं ना.
" अरे मी फ्री आहे आज दुपारी..!
जमेल तूला भेटायला ? "
जमेल तूला भेटायला ? "
ती म्हणाली.
" थांब मी बघतोय माझं शेड्युल.. "
आता त्यालाही थोडं भाव खायची हुक्की आली.
" नसेल जमत तर राहू दे.. पुन्हा नंतर केव्हातरी भेटू.. "
ती.
" अगं नको.. दुपारनंतर फ्री च आहे मी. भेटूया.. "
तो पटकन बोलला.
त्याचा उतावीळपणा जाणवला तिला.
" म्हणजे मग नंतर वेळ नसेल ना तुलाही.. "
त्यानं लगेच स्वतःला सावरलं.
" काय प्लॅन आहे ते तरी सांग. "
तो.
" कुठेतरी बाहेर जाऊया.. शहराच्या बाहेर…!
चालेल तूला?? "
ती.
" मग तुझी हरकत नसेल तर माझी कार घेईन मी. काही प्रॉब्लेम तर नाही ना."
तिनं होकार भरला.
.
.
…. बरोब्बर तीनच्या ठोक्याला त्यानं हॉर्न दिला. ती रेडी होतीच.
लॉक करून फ्लॅटच्या खाली येत तीनं त्याला गोड स्माईल दिली.
" छान दिसतेस..! "
तो.
तो.
" तू सुद्धा.. "
ती हसून म्हणाली.
" कुठे जायचं..?? "
त्यानं विचारलं.
त्यानं विचारलं.
" चल. तूला मी घेऊन जाते.."
त्याच्या हातातील किज घेवून तिनं ड्रायविंग सीटचा ताबा घेतला.
" विराज बस लवकर. "
तिनं हॉर्न दिला.
खांदे उडवत तो आत बसला.
सुसाट वेगानं रावी कार पळवत सुटली....
कुठे..??
वाचा पुढील भागात.
क्रमश :
*****************************
भेटू लवकरच.
तोवर कसा वाटला हा भाग नक्की कळवा...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा