Feb 23, 2024
प्रेम

पारिजात... गंध प्रेमाचा...! भाग - 12

Read Later
पारिजात... गंध प्रेमाचा...! भाग - 12

आपण वाचत आहात सुमी आणि अनीची भन्नाट प्रेमकथा..

पारिजात... गंध प्रेमाचा...!


( मागील भागात आपण पाहिलं अनीने सुमीला दिलेलं सरप्राईज..!

त्याबरोबरच चाखला सुमीने केलेल्या बेसन लाडवाचा गोडवा...!!

आता पुढे... थोडंसं वर्तमानात...)


        ***************************" काकूss.. काय मस्त लाडू बनलेत हो..!

अप्रतिम चव आहे तुमच्या हाताला..! "

- तो.


" अरे मी नाही सुमीनं केलेत लाडू.. "


- आई.


" जमलेत.. पण जास्तच गोड झालेत रे अनिकेत..

सुमीच्या प्रेमाचा गोडवा उतरलाय त्यात..!! "


त्याला ऐकू येईल अशा हळू आवाजात मालती म्हणाली.


त्यानं सुमिकडं बघितलं..


एक मिश्किल हसू होतं तिच्या ओठांवर...


आईनं एक तुकडा तोंडात टाकला..


" हो अगं सुमा..! फार भारी चव आलीय लाडवाला...!


मलाही नाही जमली हां आजपर्यंत ही चव..! "आई म्हणाली.


आईच्या कौतुकाच्या थापेनं तिचाही चेहरा खुलला.

.

.

.

.

.

.


...  एक दीर्घ श्वास सोडून तिनं समोरचा लाडवाचा डबा बंद केला.


" अनी.. तूझ्या आठवणीत तू एकटा नसतोसच कधीच..

तुझ्यासोबत ताई.. आई.. बाबा...

साऱ्यांनाच घेऊन येतोस..! "


डोळ्यातला टिपूस तिनं अलगद वेचला.


... अचानक वातावरणात गारवा जाणवायला लागला होता तशी ती तिच्या बाल्कनीच्या आवडत्या कोपऱ्यात आली..

हातात कॉफीचा मग होताच तिच्या..!

बाहेर अचानक दाटून आलेले मेघ रिमझिम बरसत होते..

अशा अवेळी बरसणाऱ्या पावसासोबत दरवळणारा मृदगंध ती डोळे मिटून हृदयात सामावत होती..!

ट्रिंssग.. ट्रिंss ग..

रावीच्या फोनकॉल ने तिची तंद्री भंगली.

" बच्चा..!
कसा गेला तुझा दिवस...?? "

तिनं हसून विचारलं.

" मॉम.. ऑसम..! आजचा संपूर्ण दिवस खूप भारी गेलाय.

अँड क्रेडिट गोज टू युअर लड्डू आणि तूझ्या हातची ती अमेझिंग टेस्ट..!
लव्ह यू मॉम..!

उउउउउउउम्म्म्म्मआआआ !! "

तिनं मस्त एक्सायटिंग मोड मध्ये फ्लयिंग किस दिली..

पुन्हा तेच लाडू..!
पुन्हा तीच आठवण...!!

ती हसली केवळ....
...खिन्नशी..!

" काय झालं मॉम..??  तुला बरं नाहीये का..??

ते रात्रीचं जागरण.. आणि त्यासोबत कॉफीचे मग..
बंद कर बरं सगळं. "

तिला दम भरत रावी म्हणाली.


" नाही रे बच्चा..!

कधीमधी नाही येत झोप रात्रीची नी मग होते एखादी कॉफी.. "

ती स्पष्टीकरण देत म्हणाली.

" मॉम.. तुझं कॉफीप्रेम मला चांगलंच माहितीये..!"

थोडं चिडून ती बोलली नी मग क्षणभर थांबून म्हणाली.

" मॉम...

एकटेपणा खायला उठतोय ना गं हल्ली तुला..??

तू ना एक काम कर. सरळ vrs घेऊन माझ्याकडे ये.
आफ्टरऑल लेक कमावती झालीय तुझी..

ये ना गं.. खूप धमाल करू सोबत इथे..! "


आवाजात एक आर्जव होतं तिच्या..

तिच्या बोलण्याने हसूच आलं तिला.

" सुमा.. लेक मोठी झालीय हां तुझी.. "

हसून तिचं मन बोललं.

" नाही रे बच्चा..! एकटी कुठेय मी..?? हा पारिजात आहेच की सोबतीला..!

हां आता होतो कधी कधी मूड स्विंग.. नी मग उडते झोप.

पण वयापरत्वे हे चालायचंच.

यू नो बेटर दयान मी.. माय डिअर डॉक्टर..!! "

ती स्मितवदनाने म्हणाली.

" हो.. कळतंय मला. Bt यू आर स्टील too यंग मॉम..!
काही वय नाही झालंय हां तुझं..

नी ते कॉफीचा अतिरेक टाळ जरा.. बरं नसतं गं आरोग्याला.. "

तिला समजावत रावी म्हणाली.


" येस डॉक्टर..! आय विल फॉलो युअर ऍडव्हाइस..! "

- हसून ती.

गप्पा टप्पा आटोपल्या नी दोघी आपापल्या कामाला लागल्या....
.
.
.
.
.
.
... जवळपास तीन महिने सरत आले..

रावी हॉस्पिटलला चांगलीच रूळली होती.

आधीच आवडतं काम नी सोबत डॉक्टर साठेंची मेण्टरशिप..!
ती खूप आनंदी होती.

डॉ.साठ्यांशी फारच पटायचं तिचं असं नव्हतंच..
पण कुठेतरी तारा जुळायच्या त्यांच्या...!

सगळ्यांना कठीण फणसा सारखे वाटणारे डॉक्टर साठे...!

तिच्याबाबतीत मात्र कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर तयार होत होता त्यांच्या मनात.

वीस वर्षांपूर्वी त्यांच्या मनात दडलेलं कुणीतरी...!

बहुतेक तिलाच शोधत होते ते रावीमध्ये...!!

कोण होती ती..??


.
.
.


... श्रुतीची काल नाईट ड्युटी होती नी घाईघाईत किल्ली सोबत न्यायला  मात्र विसरली ती ..
नेहमीप्रमाणे...!

आज  सकाळी रावी थोडी लवकरच निघाली. श्रुतीला चावी द्यायची होती नी उशीरही नको व्हायला म्हणून.

".. हॅलो श्रुती..! मी आलेय बाहेर. तू ये लवकर.."

गाडी पार्क करत तिने मोबाईल कानाला लावला.

" अरे यार , रावी  एक अकॅसिडेन्टल केस आलीये आणि मी  डाकुमेंटल वर्क मध्ये अडकलेय.
तूच जरा आणून दे ना. प्लीsज? "

तिचा तसा आवाज ऐकून रावीचे पाय आरथ्रो डिपार्टमेंट कडे वळले.

" थँक्स यार..! "

चावी घेत श्रुतीने तिला हग केले.

" चल यार पळते मी..! उशीर होईल तर डॉ. साठे जीव खातील माझा..! "

ती खरोखरच तिथून पळत निघाली.


तिथून जाताना सहज नजर स्पेशल रूमच्या उघड्या दरवाज्यातून आत असलेल्या पेशंट कडे गेली...

आणि...


पेशंटला बघून ती थबकली तिथेच...

अचानक ब्रेक लागल्यासारखी..!

" हेssय.. यू... मिस्ट्री मॅन ??
काय करतोयस हिथं..?? "

तिने रागात विचारलं.

" घरी झोपायला जागा नाहीये माझ्या म्हणून आलोय इथे.. "

कडवट चेहऱ्याने तो म्हणाला.

" हातापायाचं बँडेज दिसत नाहीये का गं तुला..??

... आणि का माझा असा पाठलाग करतेस सारखा .. ??

तिला डिवचत तो पुन्हा म्हणाला.

" हेsय लिसन,
मी पाठलाग करत नाही तुझा कळलं? "

त्याला बोट दाखवत ती म्हणाली.

" सुंभ जळला तरी पीळ काही जात नाही.. "

ती पुटपुटली.

" ये s व्हॉट यू से..?? सुंभ कोणाला म्हणतेस गं..?? "

- तो चिडून.

" तुझ्याशिवाय कोणी आहे का दुसरं इथे..??

एवढं हातापायला बँडेज बांधलंय पण जिभेवर लगाम नाहीये ह्याच्या...! चाललीये आपली चुरूचुरू बोलत..!!"


तिच्या डोळ्यात राग होता.

" येय स्टुपिड गर्ल तू मला नाही शिकवायचं हं..! "

आता तोही चिडला होता.

ती काही बोलणार तोच ओळखीचा आवाज तिच्या कानावर आला. तशी ती पटकन मागे वळली.

" डॉक्टर..?
व्हॉट आर यू डूईंग हिअर??
डिपार्टमेंट चेंज झालंय का तुमचं..?? "

आरथ्रो सर्जन बरोबर डॉक्टर साठे आत येत म्हणाले.

" नो सर. अक्च्युअली हा मित्र आहे माझा . 
सोबत कुणी नाहीये त्याच्या म्हणून थांबले जरा वेळ..!"

ती काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेली.

तिचा चेहरा आणि डोळ्यातील भाव यांचा न बसणारा ताळमेळ मात्र डॉक्टर साठेंच्या नजरेतून सुटला नाही.


... आणि तो..??

त्यालाही धक्काच बसला हे ऐकून.

" मित्र...?? नॉव धिस इज टू मच..! "

तो मनात म्हणाला.

"डॉक्टर...  these are your duty hours..!

आणि कोणत्याही सबबीखली ते waste झालेले मला चालणार नाही..

नॉव गो टू बॅक युअर वर्क.. "

जवळ जवळ त्यांनी तिला खडसावलंच.

" सॉरी सर..! पुन्हा असं होणार नाही. "

पाणीच आलं डोळ्यात तिच्या.. पण कोणालाही न दिसू देता ती तेथून जायला निघाली.

" wait..!  बाय द वे नाव काय मित्राचं ..?? "

क्रॉस होणाऱ्या तिला त्यांनी विचारलं.

तिनं पलटून त्यांच्याकडे पाहिलं..


नी एकवार त्याच्याकडे...!

" रावी... अडकलीस ना आता..! "
ती मनातच चरफडली.

" मोटू..! "

ती त्याच्याचकडे पाहत म्हणाली.

" हं..?? "

डॉ. साठेंच्या कपाळावर आठी पडली.

" म्हणजे मी म्हणते त्याला.. प्रेमाने..! "

ती पुढं बोलली.

"...कुठून येतो हा फाजील आत्मविश्वास हिच्यात... हिलातरी माहिती असेल का ..? "

तो मनात म्हणाला.

तिचा उडणारा गोंधळ बघून त्याला मजाही येत होती..

"  get well soon यंग मॅन..!
मैत्रिणीला त्रास होतोय तुमच्या..!! "

त्याच्या केसांत हात फिरवत डॉ. साठे म्हणाले.

तो  केवळ हसला... कसंनूसं...!
.
.
.
तिची Opd आटोपली होती. सध्या डिलिव्हरीच्या वेटिंग केसेस पण नव्हत्या.
ती मोबाईलशी चाळे करत बसली होती.

" डॉक्टर.. तुमच्या मित्राला भेटायचे असेल तर दहा मिनिटं आधी निघू शकता. "

डॉ.साठे तिला म्हणत होते.

मोबाईल मध्ये खुपसलेली मान तिनं वर केली.

" आज खुद्द डॉक्टर साठे मला लवकर जायला सांगताहेत..?? "

तिचा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता.


सांशक नजरेनं तिनं त्यांच्याकडे पाहिलं.


तिच्या नजरेतला रोख त्यांनी ओळखला.

" आय मिन.. पेशंट नाहीयेत आता.. सो यू कॅन लीव्ह. "

ये परत म्हणाले.

" सर.. तो तसला मित्र नाहीये माझा..!
खरं तर तो मित्रच नाहीये माझा. "


ती म्हणाली.

" हो.. जाणवलं मघाशी ते मला.! "

ते हसून म्हणाले.


ती त्यांच्याकडे पाहतच राहिली.

" सर.. काही दिवासांपूर्वी तो सतत पाठलाग करत होता माझा. अगदी आपल्या हॉस्पिटल पर्यंत देखील पोहचला.
आणि आज असा अचानक समोर दिसला म्हणून मी तिकडे थांबले होते. "

तिने खरे काय ते सांगून टाकले.

" तुमचा काहीतरी गैरसमज झालाय डॉक्टर रावी.. तो तसला मुलगा नाही वाटत. "

ते म्हणाले.

ती हसली.. थोडीशी..!

" सर...
तुम्ही ओळखता त्याला..?? "

तिनं प्रश्न केला.

" येवढया वर्षांत माणसं ओळखायला थोडंफार शिकलोय मी.."

एक उसासा टाकत ते .

".... पण मी मात्र ह्या काटेरी फणसाला नाही ओळखले अजून.
मघाशी त्याच्यासमोर एवढं झापलं मला आणि आता स्वतःच जायला सांगत आहेत...!

मनात ती म्हणाली.

" डॉक्टर..! "
त्यांच्या आवाजानं जाता जाता थबकली ती.

" मुलगा तसा चांगला वाटतोय..! मित्र म्हणून विचार करायला हरकत नसावी..!! "

ते हसून म्हणाले.

" साठे सर म्हणजे ना एक अजब रसायन आहेत अगदी...! "

मनात बोलत ती बाहेर पडली.

बाहेर जाता जाता तिची पावलं नकळत वळली आरथ्रो डिपार्टमेंटला...

एक नजर टाकावी म्हणून थांबली ती तिथेच...

रूमचा दरवाजा हलकेच उघडला.. दारातूनच तिनं पाहिलं..

तो आत झोपला होता.. शांत..!

कुणास ठाऊक का.. पण तिचेही ओठ रुंदावले...

आपोआपच...!!

.

.

.

.

.

क्रमश :

    *******************************

कसा वाटला आजचा पार्ट..??

रावी आणि डॉ. साठेंची केमिस्ट्री आवडतेय का तुम्हाला..??

कमेंट करून नक्की सांगा.

पार्ट आवडल्यास लाईक कमेंट आणि share करा.

आणि ईच्छा असल्यास मला folllow करा.. ?

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//