परीघापलिकडले नाते पर्व दुसरे - भाग 8 (मराठी कथा : marathi story)

Parigh, parighapalikadle, nate, kautumbik, katha, spardha, kutumba, family, relations, love, Anay, Anshika, Arnav, Riya, college, school, boarding, prem

मागील भागात आपण पाहिले ...

"तुझे प्रेम असूनही तू का नकार दिलास अर्णव?असं कोणतं कारण आहे ज्यामुळे तू तिचे प्रेम स्वीकारले नाहीस?" अनयने काळजीने विचारले.

"मला खूप भीती वाटते बाबा.... मला नात्यांमध्ये, परिवारामध्ये राहण्याची सवय नाही.... एकमेकांना कसे समजून घ्यायचे , सांभाळून घ्यायचे हे सुद्धा मी कधीच शिकलो नाही .... खूप भीती वाटते मला जोडलेले नाते तुटण्याची....  नाते तुटताना खूप जवळून बघितले आहे मी.... त्याचा, दुराव्याचा,  दोघांनाही होणारा त्रास , वेदनासुद्धा खूप जवळून बघितल्या आहेत.... मी हे नातं, हे प्रेम सांभाळू नाही शकलो तर? ....
आयुष्यभर तिला साथ नाही देऊ शकलो तर?... आम्ही एकत्र नाही राहू शकलो तर ? .... तिच्या वेदनांचे मला कारण बनायचे नाही.... मी तिला दुःखात नाही बघू शकत. जवळ येऊन दुरावणे हे जास्त कष्टदायक असते ना?
मला हिंमतच झाली नाही बाबा तिचे प्रेम स्वीकारण्याची.... पण .... पण .... मला तिला गमवायचेही नाही बाबा.... सांगा ना, मी काय करू? तिने आपले प्रेम कबूल करण्याची मी एकीकडे वाटही बघत होतो, आणि दुसरीकडे त्या क्षणापासून दूरही पळत होतो... आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिचेही आपल्यावर प्रेम असणे ही किती दुर्मिळ आणि भाग्याची गोष्ट आहे ना...
ती माझी वाट पाहत राहिली... मी स्वतः हून व्यक्त करण्याची ... मी व्यक्त तर करू शकलो नाहीच ... पण  तिने व्यक्त करूनही स्वीकारू सुद्धा नाही शकलो मी....
खूप मनापासून प्रेम करतो मी तिच्यावर.... तिच्याशिवाय राहूही नाही शकणार मी....ती मला सोडून गेली तर, हीच भीती वाटते मला ....ती मला सोडून गेली तर.... तर मी नाही जगू शकणार तिच्याशिवाय....मी हरलो बाबा... मी हरलो.... सगळ्या गोष्टींत अव्वल असणारा तुमचा अर्णव .... प्रेमात, आयुष्याच्या लढाईत मात्र हरलाय बाबा! .... ", अर्णवचे अश्रू क्षणाचीही उसंत घेत नव्हते.

*****
आता पुढे...

अर्णवला मिठीत घेऊन पाठीवर थोपटत असलेल्या अनयच्याही डोळ्यात आता पाणी तरळले.

क्षणात अनयने एक निश्चय केला आणि अर्णवला म्हणाला, " चल अर्णव".
"कुठे बाबा?" अर्णव.
"रियाचं घर माहिती आहे ना तुला? मला घेऊन चल तिथे, आपण जाऊ या. तू गाडी काढ, तोपर्यंत मी आलोच" अनय.

अर्णवने बाहेर जाऊन गाडी काढली.  तोपर्यंत अनय कपडे बदलून एक सॅक घेऊन आला.

"मी चालवतो, तू बस बाजूला", अनय अर्णवला म्हणाला. दोघांनी आपापली जागा घेतली आणि ते निघाले. थोडावेळ काहीही न बोलता ते जात होते. अनय मुद्दाम गाडी हळू चालवत होता. अध्ये मध्ये जमेल तसे त्याचे अर्णवच्या चेहऱ्यावर येणाऱ्या भावांचे निरीक्षण करणे सुरू होते. अर्णवची बेचैनी आता स्पष्ट दिसत होती.

"बेटा, पाण्यात पडल्यावर पोहायला तर शिकावेच  लागेल ना? असं घाबरून कसं चालेल?
आयुष्यात आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती मिळणं यालाही भाग्य लागतं. खूप अनमोल असते अशी व्यक्ती. तिला जपता आलं पाहिजे. नाहीतर आयुष्याची धूळधाण होते. हाती काहीही राहत नाही. अनुभवा वरून सांगतो", अनयने एका बोटाने चष्म्याखालून डोळ्यातून डोकावणारा अश्रू पुसला.

"तुझं रियावर प्रेम आहे ना? मग तिला समजावून सांग तुझ्या मनातल्या भावना, तुला वाटणारी अस्वस्थता, भीती, जे काही असेल ते सगळं. खूप प्रेम करते रे ती तुझ्यावर. माझा विश्वास आहे ती नक्कीच समजून घेईल तुला. रुसली असेल तर मनव तिला, पण आयुष्यातून जाऊ देऊ नकोस. तिने आतापर्यंत ज्याप्रकारे तुला सांभाळून घेतले आहे त्यावरून सांगतो, तिच्यापेक्षा जास्त तुला समजून घेणारी मुलगी मीसुद्धा शोधू शकणार नाही तुझ्यासाठी. खूप समजदार आणि गोड आहे रिया, ती आली की घरात चैतन्य येतं जणूकाही", अनय .

"खरंच बाबा? ती समजून घेईल का मला?  ...", अर्णवला आता थोडी आशा वाटत होती.

"हं, I hope so....", अनय.

"बाबा, लवकर चला ना", अर्णव अधीरतेने शेवटी म्हणालाच.

"अरे, हो, हो....जातोच आहोत ना? हे ट्रॅफिक बघितलं नाहीस का?", अनय हसत म्हणाला आणि त्याने रेडिओ सुरू केला.
"हं", अर्णव.

रेडिओवर गाणे सुरू होते...

हम तेरे बिन अब रह नहीं सकते
तेरे बिन क्या वजूद मेरा
तुझसे जुदा गर हो जाएंगे
तो ख़ुद से ही हो जाएंगे जुदा

क्यूंकि तुम ही हो, अब तुम ही हो
ज़िन्दगी अब तुम ही हो
चैन भी, मेरा दर्द भी
मेरी आशिक़ी अब तुम ही हो

तेरा मेरा रिश्ता है कैसा?
एक पल दूर गवारा नहीं
तेरे लिए हर रोज़ हैं जीते
तुझ को दिया मेरा वक़्त सभी
कोई लम्हा मेरा ना हो तेरे बिना
हर सांस पे नाम तेरा...

डोळे मिटून अर्णव गाणं ऐकत होता.
एक एक ओळ जणू अर्णवच्या मनातल्या भावनांचं प्रतिबिंबच होती. रियापासून दुरावण्याच्या कल्पनेने त्याला त्याच्या प्रेमाच्या खोलीची झालेली जाणीवच जणू गाण्याद्वारे व्यक्त होत होती. गेल्या थोड्याच वेळापासून तिच्याशिवाय त्याचे आयुष्य किती नीरस आहे हे त्याला कळले होते. ती आयुष्यात नसण्याची कल्पनाही तो सहन करू शकत नव्हता.... हर सांस पे नाम तेरा ....खरंच रिया, माझ्या प्रत्येक श्वासावर तुझंच नाव आहे....
मी नाही कुठे जाऊ देणार तुला.... त्याच्या मिटलेल्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्याला तसे बघून अनयने मनात काहीतरी ठरविले.

थोडया वेळाने ते रियाच्या घराजवळ पोचले. दोघेही गाडीतून खाली उतरले. अर्णव घाईने वळून जायला निघाला. तेवढ्यात ...

"चिरंजीव... लढाईवर चाललात तेही हाती शस्त्र न घेताच? ", अनयने हसत हसत मागून आवाज दिला.
अर्णव मागे वळून बघत, "अं,काय?".

"रिकाम्या हातानेच जाणार आहात का माझ्या सुनेला आणायला? ", हसतच अनय म्हणाला.

"अं... ते ...मी ... घाईघाईने तसाच निघालो ... काही घेतलेच नाही...आता इथे तर काही मिळणार पण नाही, उशीर होईल...", अर्णव .

"हे घे",  मागे हातात लपवून धरलेला गुलाबाच्या फुलांचा छोटासा गुच्छ पुढे करत अनय म्हणाला, "आता हे सुध्दा आम्हाला शिकवावं लागेल का चिरंजीव?"

अर्णवच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद मावत नव्हते. ब्लश करत, नजर खाली करत तो म्हणाला ..
"हे तुम्ही कधी घेतले...?"
"बस तू गाडी काढत होतास तेव्हाच.... आपल्याच टेरेस गार्डन मधली आहेत..., जा आता लवकर", अर्णवला लाजलेले बघून अनय गालात हसत होता.

"आणि तुम्ही पण येताय न?", अर्णव.
"तू जा, मला थोडं काम आहे . मी येतो नंतर थोड्या वेळात", अनय म्हणाला.

"Ok " , म्हणत अर्णव फुले घेऊन जवळजवळ पळालाच !
.
.
.

इकडे अनयने अंशिकाला कॉल केला.
" हॅलो अनय, अरे मी पॅरिसला आहे... तुला सांगितलं होतं ना", अंशिका.
"हो ग, तसंच महत्त्वाचं काम होतं अंशिका , म्हणून कॉल केलाय", अनय.
"हं, बोल ना", अंशिका.

"अंशिका, तुझा अंदाज खरा ठरला. तू काही दिवसांपूर्वी म्हणाली होती ना, की अर्णव प्रेमात आहे असं वाटतंय.... मोठा झाला ग आपला अर्णव आता .... प्रेम पण करायला लागला...", अनय.

"व्हॉट? रिअली?आणि कोण आहे ती मुलगी?", अंशिकाने विचारले.

"अग... none other than Riya. ", अनयच्या आवाजातला आनंद लपत नव्हता.

"काय? खरंच? मला तर आधीपासूनच खूप आवडते रिया", अंशिका आनंदाने म्हणाली.

"चला तर मग तुलाही सून पसंत आहे ना? मग आज मी आलोय तिच्या बाबांशी बोलायला", अनय म्हणाला.

"अरे , आजच गेलाससुद्धा ? का इतकी घाई करतो आहेस?", अंशिका.

अनय अंशिकाला आज घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगू लागला. सगळं अथ पासून इति पर्यंत सांगून झाल्यावर म्हणाला,

" अंशिका, खूप प्रेम करतात ग दोघे एकमेकांवर.... आज त्याचे हमसून हमसून रडणे पाहवत नव्हते मला. पण आपला पठ्ठ्या नात्यात गुंतायला घाबरतोय ग.... नाते नीट सांभाळता नाही आले, तिला नीट जपता नाही आले तर... अशी भीती वाटतेय त्याला.... त्याचे भावविश्व पूर्णपणे उध्वस्त झाले आहे ग.... अन इकडे रियासाठी स्थळ बघण्याचं तिचे बाबा म्हणत होते... म्हणून मी घाई करतोय. मी समजावेन मुलांना.... आपण समजावू त्यांना.... आपल्या परीघापलिकडले गेलेल्या , दुभंगलेल्या नात्याचा ....मुलांच्या उमलत्या नात्यावर .... त्यांच्या आयुष्यावर ....परिणाम नको ग व्हायला.... शेवटी प्रेमाची माणसं जवळ असल्यावरच आयुष्याला अर्थ असतो ना?", अनय.

"ठीक आहे अनय, माझी काही हरकत नाही . तू बोलून घे", अंशिकाने संमती दिली.

.
.
.

लिफ्ट खाली येण्याचीही वाट न बघता अर्णव जिन्याने भराभर चढून सातव्या मजल्यावर पोचलासुद्धा. हातातला गुच्छ पाठीमागे लपवला.

बेल वाजवून वाट बघत उभा राहिला. दोन मिनिटे झाली तरी दार उघडले नव्हते. मग त्याने पुन्हा एक दोनदा बेल वाजवली. रियाने दार उघडले. तिचा अवतार बघून त्याच्या काळजात धस्स झाले.

सकाळचाच ड्रेस , पण केस विस्कटून सुटलेले, डोळे रडून लाल झालेले, चेहऱ्यावर अश्रूंच्या धारा गळून सुकलेल्या... सकाळ च्या एक कप कॉफी वर राहिलेली ती ... दुपार झाली तरी अजूनही काही खाल्लेले नव्हते. सकाळी उत्साहाने सळसळणारा तिचा चेहरा आता मात्र पुरता कोमेजून गेला होता.

"अर्णव, तू इथे काय करतो आहेस?", रियाचा आवाज सुद्धा खोल गेला होता.
"अग, मला आत तर येऊ देशील ना?", अर्णव आत येत म्हणाला.

"अर्णव, मी सांगितलं न, ठीक आहे मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. तुला त्रासही देणार नाही , तुझ्या आयुष्यातून दूर निघून जाईन. पण मला थोडा वेळ तर देशील ना सावरायला? का आलास तू इथे?", रिया.

"एकदा माझे ऐकून घे ना रिया... प्लीज...", अर्णव अजीजीने म्हणाला.

"अर्णव, आत्ता मला काहीही ऐकायचं नाही... मला एकटे राहायचे आहे...", रिया.

"रिया, प्लीज ग... ", अर्णव.
"ठीक आहे", रिया.

"रिया, तू आज जे व्यक्त केलंस ते फार पूर्वीच कळलंय मला तुझ्या डोळ्यांतून... नेहमी माझी काळजी घेत मला आनंदी ठेवण्याच्या आटोकाट प्रयत्नातून...
खरं सांगायचं तर त्यामुळेच गेल्या दोन तीन वर्षांमध्ये तुझ्यापासून दूर राहिलो ग मी स्वतः हून...
मला खूप भीती वाटते ग रिया.... मला नात्यांमध्ये, परिवारामध्ये राहण्याची सवय नाही.... एकमेकांना कसे समजून घ्यायचे , सांभाळून घ्यायचे हे सुद्धा मी कधीच शिकलो नाही .... खूप भीती वाटते मला जोडलेले नाते तुटण्याची....  नाते तुटताना खूप जवळून बघितले आहे मी....लहानपणापासूनच .... त्याचा, दुराव्याचा,  दोघांनाही होणारा त्रास , वेदनासुद्धा खूप जवळून बघितल्या आहेत.... मी हे नातं, हे प्रेम सांभाळू नाही शकलो तर? ....
आयुष्यभर तुला साथ नाही देऊ शकलो तर?... सारखे हेच वाटायचे की तू मला सोडून गेलीस तर?  कसे जगू मी तुझ्याशिवाय ? आणि तुझ्या मनालाही किती वेदना होतील.... तुझ्या वेदनांचे मला कारण बनायचे नाही.... मी तुला दुःखात लोटून नाही जाऊ शकत... नाही बघू शकत तुला असे रडताना. जवळ आल्यावर दुरावल्याचा जास्त त्रास होतो ना? ते जास्त कष्टदायक असते ना?

मला हिंमतच झाली नाही ग प्रेम स्वीकारण्याची.... पण रिया खरं सांगतो ग, तुझ्याशिवाय राहुसुद्धा शकत नाही मी.......
मी स्वतः त्यामुळेच प्रेम व्यक्त करत नव्हतो ग. तू आपले प्रेम व्यक्त करण्याची मी एकीकडे वाटही बघत होतो, आणि दुसरीकडे त्या क्षणापासून दूरही पळत होतो...
खूप मनापासून प्रेम करतो मी तुझ्यावर, रिया.... कितीतरी वर्ष झाली.... राहू नाही शकणार मी माझ्या हृदयातल्या राजकुमारीशिवाय .... मला खूप हरल्यासारखं वाटतय ग रिया... मी हरलो ... मी हरलो.... सगळ्या गोष्टींत अव्वल असणारा तुझा मित्र अर्णव .... या आयुष्यात हरलाय .... आणि तुझ्या प्रेमात मात्र स्वतः लाही हरलाय .... ", अर्णवच्या गालावर घळाघळा अश्रू ओघळत होते.

रिया त्याच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत होती ...तिचे अश्रू क्षणाचीही उसंत घेत नव्हते. विस्फारल्या नजरेने आणि कानात प्राण आणून ती अर्णवचे बोलणे ऐकत होती.

"रिया, आजपर्यंत प्रत्येक वेळी तूच मला सांभाळले आहेस. मला नेहमी सावरले आहेस, नवीन दृष्टिकोन दिला आहेस. माझ्या मनातील गोष्टी न सांगता समजून घेतल्या आहेत. ... ते गाणं मी फक्त तुझ्याचसाठी गायलं होतं रिया ... म्हणूनच मी तू येईपर्यंत थांबलो होतो.... आणि माझ्या गाण्यातून तुझ्या हृदयापर्यंत माझी साद बरोबर पोचली होती.
यावेळी सुद्धा तू बरोबरच समजून घेतलेस मला.... माझ्या मनातल्या तुझ्यासाठी असणाऱ्या भावना अगदी बरोबर ओळखल्यास.  मी नेहमी तुझाच होतो आणि आहे .... प्लीज रिया.... मला पुन्हा समजून घेशील? माझ्या मनातल्या भीतीला पुरून उरशील? माझी आयुष्यभरासाठी साथ देशील का रिया? आयुष्यभर माझी राणी बनून राहशील? ", अर्णवने आता गुडघ्यावर बसून आपल्या हातातील गुलाबाच्या फुलांचा गुच्छ रियासमोर धरला होता.

रियाच्या डोळ्यात एकाचवेळी अश्रू आणि आनंदाचा संगम झालेला दिसत होता.....

क्षणभर दोघेही तसेच स्तब्ध होते.  आतामात्र रियाच्या मनावरचे मळभ दूर झाले होते. पन आता तिच्या मूळ स्वभावाने पुन्हा उचल खाल्ली. मागे वळून खांदे उडवत ती हसत म्हणाली...

"दे sss खूं ssss गी....
सो sss चूं sss गी....
कल परसो बोलूंगी ...."

"रिया .... प्लीज ना ग.... नको ना आता त्रास देऊ....बघ या गुलाबांकडे किती वाट बघताहेत तुझ्या हाती येण्याची...", अर्णव तिची मनधरणी करत म्हणाला.

"आतापर्यंत मी तुला समजून घेत होते, आता तर तुलाही शिकावं लागेल मला समजून घेणे... मिस्टर अर्णव.... ओळखा आम्हाला काय हवे आहे ते..." , रिया मनात म्हणत तशीच पाठमोरी उभी राहिली.

आणि काय आश्चर्य, अर्णवला तिच्या मनातले कळलेच जणू.
त्याने  रियाचे अत्यंत आवडते गाणे गायला सुरवात केली.

तू ही रे, तू ही रे तेरे बिना मैं कैसे जियूं
आजा रे, आजा रे, यूं ही तड़पा ना तू मुझको
जान रे, जान रे, इन सांसों में बस जा तू
चाँद रे, चाँद रे, आजा दिल की ज़मीन पे तू

चाहत है अगर आके मुझसे मिल जा तू
या फिर ऐसा कर, धरती से मिला दे मुझको
तू ही रे, तू ही रे तेरे बिना मैं कैसे जियूं
आजा रे, आजा रे, यूं ही तड़पा ना तू मुझको

आज अर्णवच्या गाण्यात खरोखरच त्याच्या मनातल्या भावनांचं प्रतिबिंब दिसत होतं... दर्दभऱ्या आवाजात ते गाणं आज फक्त आणि फक्त रियासाठी गात होता तो.... दोघांचेही डोळे झरू लागले होते.... अत्यंत भावनिक आणि प्रेमाचा तो क्षण होता ... रियाने फुले घेतली आणि हळूच त्याच्या खांद्याला धरून उठवले. एकाच वेळी दुःखाश्रू आणि आनंदाश्रूंचा दोघांच्याही डोळ्यांत संगम झाला होता. निःशब्दपणे दोघेही एकमेकांच्या डोळ्यातले प्रेम अनुभवत होते...
 

क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव.

हा पार्ट कसा वाटला , अभिप्राय नक्की कळवा.




🎭 Series Post

View all