परीघापलिकडले नाते - भाग 6 (मराठी कथा : marathi story)

Spardha, parighapalikadle, nate, parigh, marathi, katha, story, kautumbik, kutumb, family, relation, love, school, boarding



अर्णव , रिया, आर्यन आता आठव्या वर्गात शिकत होते. साठे सर अर्णवला आवडायचे. ते त्याला वेगवेगळ्या गोष्टी समजावून सांगत. मग ते अभ्यासाबद्दल असो , शाळेतल्या इतर ऍक्टिव्हिटीज बद्दल, किंवा एकंदर वागण्याबद्दल असो. नीट प्रोत्साहन मिळाले नाही तर अर्णवसारख्या हुशार मुलाचे नुकसान होऊ शकते हे ते जाणून होते. त्यामुळेच ते वेळोवेळी अर्णवला गणित, विज्ञान इत्यादींच्या परीक्षांना बसवत. त्याला अभ्यास करायला प्रोत्साहन देत. आतापर्यंत साठे सरांच्या आग्रहामुळेच अर्णव बऱ्याच गोष्टी करायला लागला होता. गेल्या वर्षीपासून गिटारही शिकायला लागला होता. त्याला संगीत शिकणे सुद्धा आवडायला लागले होते. रिया नृत्याबरोबरच संगीताचे धडेसुद्धा घेत होती, तर आर्यन ने स्विमिंग शिकायला सुरवात केली होती.

General knowledge quiz competition मध्ये शाळेकडून भाग घेण्यासाठी साठे सरांनीच अर्णवला भाग पाडले होते. आर्यन, रिया आणि अर्णव च्या टीम ने शाळेला दोनदा विजेतेपद मिळवून दिले होते. बिपिन सरांनी सुद्धा त्याला शाळेच्या फुटबॉल टीम मध्ये सामील करून घेतले होते. इंटरस्कूल फुटबॉल मॅचेस मध्ये आता अर्णव, आर्यन सुद्धा खेळायला लागले होते. या वर्षीच्या इंटरस्कूल फुटबॉल चॅम्पियनशिप मध्ये शाळेला विजेतेपदाची ट्रॉफी मिळाली होती.

*****
आज साठे सरांचा शाळेतला शेवटचा दिवस होता. ते निवृत्त होणार होते. शाळेकडून त्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. बऱ्याच मुलांनी त्यांच्या भाषणामध्ये साठे सरांनी आपल्याला कसे मार्गदर्शन केले हे सांगितले. रिया आणि अर्णवने सुद्धा साठे सर आपले आवडते असून त्यांनी वेळोवेळी खूप मार्गदर्शन केल्याचे सांगितले.

"साठे सरांच्या हाताखाली एकदा मुलगा आला, की त्याचे भविष्य घडलेच म्हणून समजा! आपल्या शाळेला नावलौकिक मिळवून देण्यात साठे सरांचा खूप मोठा सहभाग आहे . आदर्श शिक्षक म्हणून राज्य पुरस्कार प्राप्त करणारे साठे सर आपल्या शाळेचे भूषण आहेत",  प्रिन्सिपॉल कार्यक्रमात बोलत होते.

साठे सरांच्या कळकळीने शिकवण्याच्या हातोटीचे तसेच मुलांबद्दल असलेल्या जिव्हाळ्याचे प्रिन्सिपॉल सरांनी कौतुक केले. प्रिन्सिपॉल सरांनी त्यांना सन्मानचिन्ह प्रदान केले. सर आता सोडून जाणार म्हणून सर्वांचे मन भरून आले होते.

कार्यक्रम संपल्यावर साठे सरांनी अर्णव, रिया आणि आर्यन ला आपल्याजवळ बोलविले.

"सर आम्हाला नेहमीच तुमची आठवण येईल . तुम्ही खूप छान शिकविले आहे आम्हाला", रिया म्हणाली.

"मुलांनो, छान अभ्यास करा, शिकून मोठे व्हा. आलेल्या संधीचा नेहमी उपयोग करून घ्या. स्पर्धा, परीक्षा मध्ये भाग घेत जा. त्यामुळे आपल्याला आपण कुठे आहोत, आपली किती कशी तयारी झाली आहे, कुठे कमी आहे हे कळत असतं. मग त्या दृष्टीने पुढे पावलं उचलता येतात. अशा एकेका गोष्टीचं स्वतःपुढे आव्हान ठेवायचं आणि स्वतः च ते पार करायचं.

रिया आणि आर्यन तुम्ही स्वतः हून पुढाकार घेताच. पण आता तुम्हाला तुमच्या बरोबरच अर्णवला सुध्दा स्पर्धेत, परीक्षेत सहभागी करून घ्यायचं आहे. शाळा, कॉलेजमध्ये आपल्या स्वभावाचा, पुढच्या जीवनाचा पाया तयार होत असतो. जितकी जास्त मेहनत कराल, वेळेचा सदुपयोग कराल तितका जास्त सर्वांगीण विकास होत असतो.

काय अर्णव, कळलं ना? मी इथे नसलो तरी भाग घेशील ना? जीव तुटतो रे तुमच्यासारख्या मुलांसाठी. देशाचे भविष्य असता तुम्ही", सर कळकळीने सांगत होते.

"हो सर. तुमची शिकवण मी नेहमी लक्षात ठेवेन", अर्णवने आश्वासन दिले.

"तुम्ही वेळोवेळी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवून त्याप्रमाणेच वागू आम्ही. तुमची खूप आठवण येईल सर", आर्यन.

"मी इथे नसलो तरी तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. काहीही अडचण आली तर विचारू शकता", साठे सर त्यांना आपला नंबर देत म्हणाले.

सरांना नमस्कार करून आणि शुभेच्छा देऊन तिघे बाहेर पडले.

****
संध्याकाळी कॅन्टीनमध्ये सर्वजण जेवायला बसलेले होते. अर्णव एकदम शांत, उदास वाटत होता.

"अर्णव, काय झालं, तू इतका उदास का दिसतोय? साठे सर उद्या पासून इथे नसतील म्हणून वाईट वाटतय ना?", रियाने अर्णवचा पडलेला चेहरा बघून त्याच्या मनात चाललेले ओळखण्याचा प्रयत्न केला.

"हं, हो ग, खूप वाईट वाटतय मला . त्यांचा खूप आधार असल्यासारखं वाटायचं इथे", अर्णव उदासपणे म्हणाला.

"हो ना, खरं आहे. खूप सपोर्ट करायचे ना ते आपल्याला. पण ठीक आहे ना रे, He has worked a lot for us till now. Now we should happily let him relax and take rest, right?" , रिया त्याला समजावत म्हणाली.

"हं, मी तर हा विचार केलाच नव्हता", अर्णव म्हणाला.

"I know, जेव आता", अर्णवला किंचित खुललेले बघून रिया गालात हसत म्हणाली.

******

काही दिवसांनंतर ...

मिष्टी आणि रिया संध्याकाळी खेळून येत होत्या. तेवढ्यात मिष्टी रियाला म्हणाली , "रिया, वो देख अर्णव अकेला कैसे बैठा है".
पायरीवर एकटाच बसलेल्या अर्णवला बघून रिया
"अरे हां, ये तो कुछ परेशान सा लग रहा है, लगता है बात करनी पडेगी उससे, चल पूछते हैं", रिया.

तिकडे जाता जाता रियाच्या लक्षात आलं , की आज निकीचा शेवटचा पेपर होता. आजचा त्याचा हॉस्टेलमधला शेवटचा दिवस असणार होता. उद्या तो त्याचे सगळे सामान घेऊन घरी जाणार होता. अर्णव तर निकीला big bro म्हणायचा. त्या दोघांचे नाते तिला माहीत होते. अर्णवच्या उदास असण्याचं कारण लक्षात येताच ती म्हणाली.

"Hi अर्णव, काय करतो आहेस इथे?", रिया.
"काही नाही ग. असाच बसलोय", अर्णव शांतपणे म्हणाला.

"Big bro निकी उद्या घरी जातोय म्हणून उदास आहेस ना?", रियाने विचारले.

"हं , तुला कसं माहिती की मी त्यामुळे उदास आहे?", अर्णव आश्चर्याने म्हणाला.

"दोस्त दोस्त को नही समझेगा तो और कौन समझेगा?", गालात हसत रिया म्हणाली.

"पण मला सांग की असं उदास होऊन कसं चालेल? ", रिया समजावत म्हणाली.

"बिग ब्रो आहे ग तो माझा, माझ्या इथल्या पहिल्या दिवसा पासूनच त्याने मला सांभाळून घेतलंय. कुठलीही अडचण येवो लगेच मदत करायचा तो. आता तो जातोय ना, मग खूप वाईट वाटतय मला", अर्णव.

"हो ना, आपण मिस तर करणारच Big Bro ला. पण अर्णव, तू हा विचार नाही केलास , की तो आता घरी जातोय म्हणजे त्याला घरच्यांबरोबर राहायला मिळेल. किती आनंद होईल ना त्याला? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता उदास होऊन बसून राहिलं, तर आज जो वेळ त्याच्याबरोबर घालवता आला असता, तोसुद्धा वाया जातोय ना? त्यापेक्षा जाऊन त्याच्याशी गप्पा मारत बस , त्याला सामान पॅक करायला मदत कर . तेवढाच सोबत वेळ घालवता येईल ना त्याच्या ? आणि मदतही होईल", रियाने समजावले.

अर्णवच्या चेहऱ्यावरचे औदासिन्य जाऊन आता किंचित स्माईल आले होते.

"हां अर्णव , सही बोल रही है रिया. चल अब", मिष्टी . तिघेही जायला निघाले. रिया आणि मिष्टी होस्टेलमध्ये आपल्या खोलीत गेल्या आणि अर्णव पळतच निकीकडे गेला.

"Big bro, काय करतो आहेस? ", अर्णव निकीला म्हणाला.

"सामान पॅक कर के रखता हूं, सुबह जल्दी निकलना है न",  निकी कपाट उघडून वस्तू बॅग मध्ये भरत होता.

"चल, मी मदत करतो तुला. फक्त उद्या जाईपर्यंत लागेल तेवढेच सामान वर ठेव. बाकी सगळे पॅक करू. सांग कशात काय ठेवायचं आहे ते" , अर्णव म्हणाला.

थोड्याच वेळात सामान पॅक झालेसुद्धा. दोघेही जरा विसावताहेत तेवढ्यात जय आणि आर्यन तिथे आले.

"सामान पॅक झालसुद्धा बिग ब्रो?", आर्यन.
"हो . झालं", निकी.

आता मात्र सगळे भावुक झाले होते . निकी ने सर्वांना गृप हग केले.

"उदास मत हो यार तुम लोग, मैं अपने घर ही तो जा रहा हूँ. फिर मिलेंगे ना. चलो डिनर के लिये चलते हैं ", निकी.

*******

त्यादिवशी अनयचे ऑफिसमधले काम लवकर आटपले होते. घरी लवकर जाऊन तरी काय करायचे म्हणून तो गेल्या कितीतरी दिवसांपासून ऑफिसमध्येच उशिरा पर्यंत थांबून काम करत असे. पण आज त्याला काम झाल्यावर थांबावेसे वाटेना. संध्याकाळी तो घरी आला. फ्रेश होऊन दामूकाकांना कॉफी मागितली. कॉफीचा कप हातात घेऊन तो अर्णवच्या खोलीत आला. त्याला अर्णवची खूप आठवण येत होती.
कारणही तसेच होते. आज दुपारी अर्णवच्या शाळेतून फोन आला होता आणि अनयला भेटण्यासाठी बोलावले होते.
का बोलावले असेल मला भेटायला?

अनय अर्णवच्या खोलीत कॉफी घेत विचार करत होता. समोरच अर्णवच्या टेबलवर एक जुना फोटोंचा अल्बम असलेला त्याला दिसला. अनय त्यातले फोटो पहायला लागला. अर्णवच्या लहानपणी चे किती सुंदर फोटो होते त्यात. दोन तीन वर्षांचा अर्णव खेळताना, खाताना, तर कधी कधी त्या तिघांचाही एकत्र असलेला फोटो . पण अर्णव पाच वर्षांचा झाल्यापासून नंतरचे मात्र एखाद दोन च फोटो होते. त्यातही तिघांचे असे एकत्र फोटो तर नव्हतेच.
असे का असावे?


क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.
हा पार्ट कसा वाटला ते नक्की कळवा.

🎭 Series Post

View all