पालकत्व अन संवाद

Story tells how to communicate with children and how to inspire them and improve their hopes.

कायग, बरी आहे ना?? वसुधा म्हणजे आर्याची आई त्यांनी तिचा डोक्यवरून हात फिरवतच तिला प्रश्न केला. 
आर्या कॉलेजमधून घरात आली तशी शांतच. नेहमी अखंड बडबड करणारी आज शांत का??  आईला समजले लेकीचे काहीतरी बिनसले. 
तिचा चेहरा ही उतरलेला होता. ती सांगू लागली. अग आई आमचे आज कॅम्पस इंटरव्हू होते. ज्या कंपनीत नोकरी करण्याचे माझे स्वप्न आहे, तीच कंपनी.पहिल्या तीन राऊंड ला मी निवडली गेली पण उद्या शेवटचा राऊंड होईल.आम्ही फक्त पाच जण  निवडलेत त्यांनी.अन उद्या यातून फक्त एकजण सिलेक्ट करणार आहेत . 

आई तर खूप खुश झाली. अरे वा, मग इतकी आनंदाची बातमी तू अशी देतीयेस?? 

हो, कारण बाकी जे चार जण आहेत त्या सर्वाना 70%पेक्षा जास्त आहेत  पण मी एकटीच आहे की मला 65%आहेत. काय करू मी? नाहीच होणार का मग माझे स्वप्न पूर्ण?? ती तणतणतच तीचा  रूममध्ये गेली. 
वसुधा ला माहित होते की तीची लेक किती हुशार आहे, हो जरी अकॅडमिक मार्क्स जरा कमी असले तरी तिचा नेहमी शाळा -कॉलेज चा अभ्यासाव्यतिरिक्त असलेल्या  प्रत्येक कार्यक्रमात तिचा सक्रिय सहभाग. वक्तृत्व स्पर्धेतले तिचे यश अन त्यामुळे ती निवेदन पण खूप छान करायची. त्यामुळेच तिचा बोलण्यात एक छानसा आत्मविश्वास अन चातुर्य ऐकणाऱ्याला नेहमीच जाणवायचे. वसुधा नेही तिला नेहमीच पाठिंबा दिला. अगदी सोसायटीचा गणेशोत्सव काही इतर कार्यक्रमात ही ती सहभाग घ्यायची. 
वसुधाही तशीच तिचा रूम मध्ये गेली. 
आर्या मला एक सांगशील का?  इंटरव्ह्यू का घेतात. 
 म्हणजे? आर्या. 
आर्या अगदी मनापासून ऐकू लागली. 

अग मान्य आहे की तुला त्या चौघांपेक्षा कमी मार्क्स आहे पण एक आशेचा किरण असा की तरीही तू त्यांचा बरोबरीने सिलेक्ट झालीस. अन जर त्यांना मार्क्स पाहून च सिलेक्ट करायचे असतात तर ते डायरेक्ट उमेदवार घेऊ शकतात की फक्त मार्क्स पाहून. एक नेहमी लक्षात ठेव की मुलाखत घेणारा मार्क्स सोबतच आपण स्वतःला इतरांसमोर कसे प्रेझेंट करतो म्हणजे तुम्ही काय म्हणतात आता प्रेझेंटेशन स्किल. 
या बरोबरच तुम्ही इतर चार चौघात मिळून मिसळून काम करू शकता का??  अन त्यांना नेमकी काय हवय त्या प्रोफाइल नुसार ते आपल्याला कितपत समजले हेही ते पाहतात. 
अन तुझे मैत्रीपूर्ण बोलणे व तुझी नवनवीन शिकण्याची उर्मी तुला नेहमीच यशस्वी करणार यात शंकाच नाही,  आईने अगदी अलगदपणे आर्या ला तिचा गुणांची जाणीव करून दिली होती . 
हे ऐकुन आर्या ने आईला घट्ट मिठी मारली.
दुसऱ्या दिवशी कॉलेज हून आर्या आली ते सिलेक्ट झाल्याचा आनंदात,  पेढे घेऊनच. 
आज प्रत्येक घरात अशा प्रकारचे सकारात्मक संवाद खूप गरजेचा आहे . 

आज जरी मोबाईल मुळे सगळे जग मुठीत असल्याचा जो आभास आहे त्यामुळे कुठेतरी मुलांची प्रगती खुंटतिये. प्रत्यक्ष खरेदी करताना जसे आपण किंमत कमी जास्त करतो.कुठे बाहेरचा ठिकाणी फिरायला गेल्यावरही तिथेच उपलब्ध असलेल्या वाहनाने प्रवास केला (ऑनलाईन कॅब बुक न करता ) अशा छोटया छोटया अनुभवातुनसुद्धा मुलांना कुठे  कोणाशी कसे अन काय बोलायचे हेही समजते. अनुभव हाच आयुष्यात महत्वाचा शिक्षक आहे.
आजचा गॅजेटचा जगात पालकांनी सुविधांचा मारा करण्यापेक्षा संवादाचा धागा जपलेला कधीही चांगला.पण बऱ्याचदा पालक म्हणून आपण  मुलाचा डब्याचे, जेवण, जेवणाची वेळ याचा  जितका ताण घेतो  तितका किंबहुना त्याहून जास्त त्यांच्या मनाचा, मानसिकतेचा विचार करायला हवा...सकारात्मक संवाद साधायला हवा.