पापाज परी....

don't copy without permission....

              आज परीचा दहावा वाढदिवस होता.पहाटे पाच वाजल्यापासून परागच्या डोळ्याला झोप नव्हती....पराग फिल्म डायरेक्टर....रात्री उशीरापर्यंत शुटिंग सुरू होती....पॅकअप करायला आणि घरी पोहोचायला त्याला उशीर झाला होता....तोवर परी गाढ झोपी गेली होती.म्हणून डॅडाचं बर्थडे विश करायचं राहून गेले....नाहीतर दर वाढदिवसाला पराग परीला बरोबर रात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा देत असे.....

           आज शुभेच्छा देता न आल्याने परागला अगदी चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते....कारण परी त्याला प्राणाहून प्रिय होती....पराग एका मुलाचा म्हणजेच प्रतीकचा ही बाप होता.परंतु त्याच्या जन्मावेळी परागचे अल्लड वय आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी चाललेली धडपड यामुळे त्याने प्रतीकला फारसा वेळ दिला नव्हता.....

        मात्र पत्नी प्रितीने परागला समजून घेऊन मुलांच्या संगोपना बाबतीत कोणतीही तक्रार न करता आणि त्याच्या यशाच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ न देता परागला निस्वार्थ साथ दिली.प्रितीने परागचा संसार अगदी प्रेमाने फुलवला होता.....


           परी झाली त्यावेळी परागने अनेक सुपर डुपर हिट सिनेमांचे निर्देशन करून स्वतःचे नावलौकिक कमवले होते.पवई सारख्या ठिकाणी आलिशान बंगला,गाडी नोकरचाकर असे ऐश्वर्य परागने स्वकष्टाने
उभारले होते....भव्य बंगल्याच्या भवती चहूबाजूंनी हिरवळीची बिछाईत केलेली होती.....

        प्रितीला किचन गार्डनची आवड असल्याने तिने अनेक भाज्या,पेरू पपई अश्या फळांची झाडे लावलेली होती.मोगरा,पारिजातकाच्या फुलांचा नुसता सडा पडलेला असायचा प्रितीच्या अंगणात.....प्राजक्ता आणि मोगर्याच्या फुलांचा मनमोहक सुगंध सतत घरात सगळीकडे दरवळत रहायचा.परागने स्वतःचे स्टुडिओ उभारले होते.त्याचे नाव 'परी स्टुडिओ'.लेकीच्या नावावरचं ठेवले होते.आज परागचे नाव मोठमोठाल्या फिल्म डायरेक्टर्सच्या यादीत सामावले होते....


         पहाटेच्या वेळी लेकीच्या विचारांनी परागचे सतत कडा बदलणे सुरू होते.त्यामुळे प्रितीची झोपमोड होते....पराग अरे वाजले किती ???

          सहा वाजले....तू झोप थोडावेळ.....काय रे काय झालं....रात्री उशीरा आलास आणि आताही लवकर उठलास.....कामाच काही टेन्शन आहे का....छे गं काही नाही....सर्व ठिक आहे....अग आज माझ्या स्वीटहार्टचा ब्रथडे आहे आणि नेमकं बारा वाजता तिला विश करायचं राहिलं गं.....परागच्या मिठीत शिरत प्रिती बोलते....feeling jealous हं....तूझी स्वीटहार्ट मी आहे....

         तू माझी बायको आहेस....पण माझी स्वीटहार्ट परीच आहे आणि कायम राहणार....अरे पण तुझी स्वीटहार्ट सुद्धा एक दिवस कोण्या राजकुमाराची स्वीटहार्ट होणार आहे....तेंव्हा येशील धावत माझ्या कडे आणि माझ्या लेकाकडे....पराग प्रीतीला दूर करून तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत शेजारच्या रूममध्ये  परीला उठवायला जातो......


          हॅप्पी बर्थडे परी....उठ उठ चल पटकन...परागचा आवाज ऐकून परी झोपेतून जागी होते.आणि परागच्या गळ्यात पडून मिठी मारते.... परीला कपाळावर किस करत.....डॅडाने तुझ्यासाठी पिंक फ्रॉक,पाइनएपल केक आणला आहे.आज मस्त बर्थडे पार्टी सुद्धा ठेवली आहे. तुझ्या सर्व स्कूलफ्रेंडना बोलव आपल्याकडे....

          वर्तमानपत्रातून हळूच डोकावताना परागला परी शाळेत जाण्यासाठी तयारी करून खाली हॉलमध्ये आलेली दिसते.परी...चल...आज मी येतो तुला सोडायला.....पराग त्याच्या लाडकीला....सोबत प्रतीकला घेऊन शाळेत सोडायला निघून जातो.....

               शाळेत सोडून घरी आल्यावर....प्रिती दोघांसाठी चहाचे कप घेऊन येते....परागला काहीतरी विचारात मग्न पाहून त्याची तंद्री भंग करत....पराग तू मुलगा मुलगी भेदभाव करतोस....तू प्रतीकचा कधीच इतका लाड करत नाहीस आणि परीला अगदी डोक्यावर बसवले आहेस....तिचे वाक्य अर्ध्यात तोडत पराग म्हणतो....

       प्रिती...तू चुकतेस....तस अजिबात नाही.आपण मुलाला आणि मुलीला समान वाढवत आहोत....दोघेही आपल्यासाठी समान आहेत....हां एक मात्र नक्की माझे वडील या नात्याने मुलासोबतचे बॉडिंग बिनधास्त आणि बेधडक आहे....त्यामागेही कारण आहे....अग....आमच्याकडे आम्ही दोघे भाऊच होतो त्यामुळे घरात आमचा ऐकमेकांत कम्फर्ट झोन होता...आम्हाला बहिण नसल्याने जपणे,काळजी घेणे ही सवयच नव्हती....म्हणून प्रतीक बरोबर आपोआप तोच कम्फर्ट झोन बनत गेला....सो यू डोन्ट वरी....


               हां परीसोबतचे नाते जरा नाजूक,
हळवे आणि भावनात्मक आहे....अग आजचं उदाहरण घे ना....एरवी बरेचदा स्कूल बस मीस झाली म्हणून किंवा उशीर झाला म्हणून मी प्रतीकला स्कूल गेटवर सोडून लगेच तिथून कलटी खायचो....या शाश्वतीने की तो मुलगा आहे....अडचण आलीच तर करेल त्याच तो मॅनेज...म्हणून नो टाटा...नो बाय....

            पण जेंव्हा जेंव्हा परीला सोडायला जातो तीन तीनदा मागे वळून तिला न्याहाळत असतो....ती दिसेनासे होईपर्यंत जागचा हालत नाही तिथून....गर्दीत तिची शेवटची झलक दिसत नाही तोपर्यंत पाय काढता घेत नाही मी....आज तर दहा मिनिटे उगाच शाळेच्या आवारात रेंगाळत होतो....तिला काही लागले,अडले तर तिला तिचा डॅडा समोर दिसावा म्हणून.....मला खात्री आहे प्रतीकला काही अडले तर तो स्वतः मॅनेज करेल पण मुलीचा बाबा म्हणून माझे मन लेकीसाठी कदाचित खंबीर नसावे.....याचा अर्थ असा मुळीच नाही मुली मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अशक्त असतात....


         अग मला आवडत....तिने प्रत्येक गोष्टींसाठी अडल्या नडल्याला माझ्याकडे धावत आलेलं....लेक आहे म्हणून ही काळजी मनाला लागून असते....बाप आणि लेकीचे नाते हे असेच असते....

        तुला सांगतो प्रिती या पलीकडे मला परीचा चांगला मित्र व्हायला आवडेल.मला कायम असं वाटतं की तिच्या मनात येणारी कोणतीही गोष्ट तिने निसंकोच पणे माझ्याशी शेअर करावी.....

            माझ्या व्यस्त दिनक्रमामुळे मी घरात फार वेळ देऊ शकत नाही...पण सुट्टीच्या दिवशी परी किंवा प्रतीक किती दंगा करतात हे लक्षात येतं माझ्या....आपसूकच प्रतीकवर चढलेल्या आवाजात राग व्यक्त होतो आणि परीला ओरडताना सूर खोटा लागतो....ती रडल्यानंतर जीव पटकन तिला जवळ घ्यायला कासाविस होतो....

             तसेही वडीलांचे ओरडणे,रागावणे मुलींना मान्यच नसते....कारण मुलींना खात्री असते जे लाड, हट्ट आई पुरवत नाही ते बाबाकडून हमखास पुरवले जातात.....

        बोलण्याच्या ओघात चहा संपतो....आणि प्रिती परागला बळेच छेडते....परी सासरी जाईल त्यावेळी काही खरं नाही तुझं....माझ्यापेक्षा तुच जास्त रडशील असचं चित्र दिसतयं.....


        प्रिती....अग ह्या एकाच विचाराने....माझ्या डोळ्यात अश्रूंचा समुद्र साठतो....तो क्षण माझ्यातील कठोर बापाला हळवं करून सोडेल बहुतेक....हे बोलून परागच्या डोळ्यात अश्रू तरळतात....

       प्रिती परागच्या खांद्यावर हात ठेवते...त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला सावरते.....अरे आपली लेक जेमतेम दहा वर्षांची आहे.....

          हल्ली मुलींनी सगळ्याच क्षेत्रात प्रगती केली आहे.तितक्याच मुली असुरक्षित झाल्या आहे.म्हणून वाईट प्रसंगांना तोंड देण्यासाठी मुलींना घरातूनच भक्कम आधार देण्याची गरज आहे.परीला मनसोक्त शिकून स्वतःच्या पायावर उभी करायची आहे आपल्याला....नक्कीच....मी तर म्हणतो वाईट प्रसंगांना हिम्मतीने तोंड देण्यासाठी मुलींना सर्व प्रथम घरातूनच सक्षम करणे गरजेचे आहे...आणि हो मी माझ्या परीच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा आहे....


            बोलता बोलता पराग आणि प्रितीने परीच्या बर्थडे पार्टीसाठी फुगे,फुलांच्या माळा,लाइटिंग,कॅन्डल लावून घर सजवले होते....

वाचकहो ही कथा वर्तमानपत्रातील एका लेखातून प्रेरित होऊन सुचलेली आहे....तो लेख मला हृदयस्पर्शी वाटल्याने आणि नातेसंबंधात अनेकदा बाप लेकीचे नाजूक नाते जवळून पाहून मी ही कथा लिहिली आहे....आई लेक या नात्यावर अनेक कथा वाचनात येतात....ही कथा सर्व बाबांसाठी.....बरेचदा बाबा व्यक्त होत नाही पण प्रत्येक बाबा आपल्या लेकीवर सारखेच प्रेम करतो.....त्यापलीकडे लेकीची तितकीच काळजी ही करत असतो.....प्रत्येक मुलगी तिच्या बाबांची परी असते.....

धन्यवाद

©® Sujata Tambade

कथा आवडल्यास नावासकट शेअर करा...लाईक करा....आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका.