Login

पापणीच्या काठावरती

स्वप्न

पापणीच्या काठावरती 

एक गाव होते न्यारे 

रोज सांज सरली की 

स्वप्नांचे ढग आणि तुफान वारे 

स्वप्नांचे ढग आज बरसले खूप 

ढगांची गर्जना आणि विजांची रिग 

उल्हासले हे मन आणि तन चिंब चिंब 

धरणी समोर होते प्रश्नांचे ढीग 

उत्तराच्या शोधात फिरे सैरावैरा धरणी 

स्वप्नांच्या पावसाची त्यातच उर्मी 

इंद्रधनुष्य आठवणींचा बहरला मनी 

प्रत्येक प्रश्नाला निसर्ग हाच तो मर्मी...