Jan 23, 2021
माहितीपूर्ण

पापड चूरा

Read Later
पापड चूरा

#पापड #चूरा

सकाळी पापड खात होते.तोडताना तुकड्यांचा चूरा ईकडे तिकडे पडला असेल पण हातात मोठ्ठा पापड असताना त्या बारीक तुकड्यांना कोण बघतेय.पापड खावून संपला.आणि काही वेळ गेल्यावर तीच चव पून्हा जीभेवर रेंगाळली जेव्हा तेच पापडाचे तुकडे जे मी वेचलेच नव्हते ते दिसले.लगेच वेचून तोंडात टाकताच पून्हा तीच चव पून्हा मिळाली चाखायला..

आणि त्यातूनच एक विचार मनात वीजेसारखा चमकून गेला.
आपल्या जीवनातही असेच घडते ना मित्रहो,म्हणजे आयुष्यात मोठमोठी धेय्य,जवाबदाऱ्या पार पाडण्याच्या नादात छोट्या छोट्या आनंद देणाऱ्या गोष्टी आपणच दुर्लक्षीत करतो आणि जेव्हा यशाची,धेय्य पुर्तीची धुंदी संपते तेव्हा एकांत क्षणी आठवायला लागते की मोठमोठ्या गोष्टींची प्राप्ती करत असताना आयुष्यातले छोटे छोटे आनंद वेचायचे आपण विसरूनच गेलो.
आनंद हा कुठे ही कसा ही मिळो त्याची चव सर्वत्र सारखीच असते.
तर असे छोटे आनंदाचे क्षण वेचायला विसरू नये मित्रहो.
मी तर छोट्या/मोठ्या दोन्ही पापडाची चव घेतली आणि दोन्ही चवीत काहीच फरक नव्हता. 
तर मित्रहो थोडक्यात काय तर तुम्ही सुद्धा जीवनातल्या मोठमोठ्या धेय्यांना पादाक्रांत करताना लहान सहान आनंद वेचायचे विसरू नका.
~~~~~~~~~~~~~π~~~~~~~~~~~~~
©®राधिका कुलकर्णी

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..