Login

पानिपत...एक लहान विवेचण...माझ्या नजरेतून

A War
विश्वास पाटील यांचे "पानिपत" बऱ्याच जणांनी वाचले असेल...खरेच किती सहजपणे आपण हा शब्द एखाद्याला सपशेल अपयश आले की वापरतो...त्याचे तर "पानिपत" झाले...पण खरेच पानिपत म्हणजे फक्त मराठ्यांचा दारुण पराभवच नाही बरे...भयंकर अशा परिस्थितीचा सामना करता करता धारातीर्थी पडले मराठे...माझ्या नजरेतून एक विवेचन...
***********************************************

दोन मोती गळाले,सत्तावीस मोहरा आल्या कामी,
लाख फुटली बांगडी,चिल्लर खुर्द्याची गणतीच नाही
मराठा पळून आला,सैन्याने खाल्ली कच,
ध्यानात ठेवा लोकहो इतकेच नाही हो "पानिपत"...

पानिपत आहे मराठ्यांचा अतुलतुल्य पराक्रमाचा उतारा,
ते कुठल्या परिस्थितीत झुंजले नुसता ऐकूनी येतो शहारा,
आपलेच लोक झाले वैरी,वाऱ्यानेही फिरवली दिशा,
सूर्यानेही आणली घेरी, नदीनेही केली दशा

पण उपाशी तपाशी मराठा लढतच राहिला
जीवात जीव असेपर्यंत गीलच्याला कापतच राहिला
राजपूत ही फिरकले नाही,पण इब्राहिम गारदीने गाजवून सोडले मैदान
नुसता यवणीचा पोर मी नाही, आहे बाजीरावाचे बीज ,समशेरबहाद्दुर ने ही उडवली धूळदान...

एवढा पराक्रमी अब्दाली पण झाला काही काळ तो ही स्तब्ध
सदाशिव भाऊंचे भूत पाठलाग करते या भीतीने गीलचा होता गलितगात्र
पडलेल्या कोवळ्या विश्वासरावना पाहून वैरीही हळहळला
का इतक्या या सुंदर देहाला मातीने कवेत घेतला

तेव्हा सहज कुठेही नका उच्चारू हा शब्द पानिपत
सुर्यविरांच्या आठवणीने होऊ द्या मने सद्गद...