पनीर टिक्का मसाला

its a love story of chef

पनीर टिक्का मसाला 

पनीर टिक्का मसाला.... मला तर हा शब्द जरी उच्चारला तरी हॉटेलचे मेनू कार्ड दिसते. बहुतेकजण हॉटेलमध्ये गेल्यावर  भाजी कोणती घ्यायची ? तर हीच  यावर ठाम असतात . या मेनू वरच आधारित आहे ही कथा !!

सायली घरातील एकुलती एक मुलगी  म्हणून सर्वात जास्त लाड ही तिचेच,अभ्यासात एकदम हुशार पण तितकीच स्वच्छंदी,  मनाला वाटेल तसेच करणार . अगदी लहानपणापासून शाळेत 80 % पेक्षा जास्त मार्क,  बारावीला तर 87% मिळाले . आता तिला ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घ्यायचे होते.  सायलीला होम सायन्स घ्यायचे होते,  पण घरातले म्हणाले सायलीला  87% मार्क आणि ऍडमिशन  होम सायन्स ला  अजिबात चालणार नाही.  सायली तू सायन्सच घ्यायचे, सायलीने यावेळी आई-वडिलांचे ऐकले  आणि सायन्स ला ऍडमिशन घेतले . पण तिने अभ्यासाकडे दुर्लक्ष केले.  ग्रुप मधल्या मुला मुलिंबरोबर  बाहेर भटकायचे,  घरी उशिरा यायचे . तिच्या ग्रुप मध्ये आर्टस् , कॉमर्स चीच  मुले जास्त होती.  अभ्यास तर तिने  करायचा सोडून दिला होता . मग काय व्हायचे तेच झाले  फर्स्ट इयर ला कमी मार्क पडले.  घरातल्यांचा हिरमोड झाला.  सायली आता दिवसभर घरीच असायची . मित्र-मैत्रिणींना पण भेटत नसायची. तिलाही टेन्शन आलेले  की आयुष्यात पुढे काय करायचे ? सायली अभ्यासात तर हुशार होतीच पण   स्वयंपाकामध्ये ही तरबेज होती. विविध प्रकारचे पदार्थ ती करायची  पण तिचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे पनीर . पनीर चे वेगवेगळे पदार्थ ती करायची  एकदा बाबा म्हणाले, माझे एक मित्र घरी येणार आहेत जेवायला. एखादा तुझ्या आवडीचा छान पदार्थ कर . सायली एकदम खुश झाली करतेच मी बाबा  असे म्हणाली.  सायली पिशवी घेऊन घराबाहेर पडली.  तिने अर्धा किलो पनीर घेतले , सोबत मटार आणि ढोबळी मिरची,  टोमॅटोही घेतला .  डेअरी वाला म्हणाला  आज काय कोणी तरी नवीन येणार आहे वाटते घरी  जेवायला ? सायलीने मानेनेच होकार दिला. 

           घरी आल्यावर तिने  कांदा भराभर उभा चिरला,  मटार धुऊन घेतले ,ढोबळी मिरचीच्या बिया काढल्या , तव्यावर बटर टाकून पनीर फ्राय करून घेतले.  सर्व पूर्वतयारी व्यवस्थित झाली होती . आता फक्त ती पनीर मसाला शोधत  होती.  तोही तिला फ्रिजमध्ये मिळाला . बटर म्हणजे सायलीचा वीक पॉईंट  आणि बटर शिवाय पनीरला चव नाही.  तिने कढईत भरपूर बटर टाकले,  कांदा टोमॅटोची प्युरी टाकून  मंद आचेवर पाच मिनिटे शिजवले . नंतर पनीर, मटार, ढोबळी मिरची टाकून फ्राय केले . सायलीची स्पेशल डिश तयार झाली होती.  तिचे नाव होते "पनीर टिक्का मसाला".  सोबत सायलीने व्हेज बिर्याणी आणि रोटी ही केली .

 बाबांचे मित्र घरी जेवायला आले जेवण झाल्यावर बोलता-बोलता बाबांच्या मित्राने विचारले  ही पनीर ची डिश कोणी बनवली?  बाबा म्हणाले,  अहो ही तर माझी मुलगी सायली हिने बनवली. अरे वा !!फारच चव आहे सायलीच्या हाताला,  तुम्ही तिला होम सायन्सला का नाही पाठवत ? सायलीचे बाबा म्हणाले, अहो बारावीला 87% मार्क मिळाले होते  पण बारावी नंतर सायन्सला ऍडमिशन घेतलं आणि सगळं चुकलं  .अहो सायलीचे बाबा अजून काही चुकले नाही तिला आवड आहे त्यात जाऊ दे . या गोष्टीला एक आठवडा झाला . सायलीच्या आईना व बाबांना हे पटत नव्हते . पण हवी ती  ब्रांच न मिळाल्यामुळे सायली हि अभ्यास करत नव्हती . शेवटी बाबांनी पुढे येऊन सायलीला विचारले ,बाळा तू होमसायन्स ला जाणार आहेस काय ? सायलीने मान डोलावली.  बाबा म्हणाले मग होऊन जाऊ दे तुझी फेवरेट डिश  पनीर टिक्का मसाला  .सायली एकदम खुश झाली  सायली म्हणाली पण बाबा मी यावेळी वेगळ्या पद्धतीने डिश करणार आहे.  सायली लगबगीने गेली  पाव किलो पनीर घेतले  आणि सुहाना चा पनीर टिक्का मसाला इन्स्टंट मिक्स आणला. आणि हो बटरही आणले . भरपूर बटर घालून कांदा पाच मिनिटे परतला. नंतर  फ्राय केलेले पनीर ,टोमॅटो प्युरी आणि इन्स्टंट मिक्स टाकून  पाच मिनिटे शिजवले . सायली बाबांना म्हणाली ," द फूड इज हियर  बाबा" .सायलीला जवळच्याच एका कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले  तीही कॉलेजमध्ये जायला भरपूर खूश होती  नवनवीन मित्रमैत्रिणी आणि  अभ्यासातील विषय देखील तिच्या आवडीचे होते . आता ती स्वयंपाकात पूर्ण पारंगत झाली होती  .पनीरचा काय  पण पुरणपोळी, मोदक ,भाकरी ,पराठा  हेही ती उत्तम बनवू लागली  एकदा सायलीची आई सायलीला म्हणाली ,"तू माझ्यापेक्षाही उत्तम स्वयंपाक करतेस  "सायली खुश झाली बाबांनीही मान डोलावली  .सायलीचे कॉलेजमध्ये अनेक मित्र मैत्रिणी होते  पण खास अस कोणीच नव्हतं . तिला वाटायचं आपल्याही आयुष्यात कोणीतरी स्पेशल यावा . आपल्याही कोणीतरी प्रेमात पडावं.   

              आणि तिची आणि सुशांत ची भेट झाली.  सुशांत त्यावेळी हॉटेल मॅनेजमेंट करत होता . सायली ची खास मैत्रीण निशा तिचा भाऊ  .त्यालाही स्वयंपाक आवडायचा .एकदा सायली आणि निशा एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. तिथे निशाचा भाऊही आला होता . वेटरला ऑर्डर देताना सायली व सुशांत दोघेही एकदम म्हणाले," पनीर टिक्का मसाला " दोघांची आवड जुळली  .गप्पा झाल्या.  दोघांनाही स्वयंपाकाची आवड होती . दोघेही एकमेकांना आवडत होते  पण पहिला पुढाकार कोण घेणार  ? हा प्रश्न होता मग एके दिवशी हिंमत करुन सायलीने निशाला सांगितले  की माझे सुशांतवर  प्रेम आहे!!!   तू त्याला विचार  .सुशांत च्या  मनातही सायली होती त्याने लगेच तिला होकार दिला . दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ  बुडाले   होते .गार्डन मध्ये फिरायला जायचे, पिक्चर ला जायचे , हॉटेलिंग करायचे पण त्यांच्या घरी ही गोष्ट अजिबात कळली नाही . सायलीने होम सायन्स पूर्ण केले.  सुशांत नेही आपले हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केले .आता प्रश्न होता तो लग्नाचा . सायलीने घरात सांगितले, सुशांत नेही आपल्या घरात सांगितले की काय परिस्थिती आहे.  दोघांचेही आई-वडील वेल एज्युकेटेड होते  .त्यांनी सायली आणि सुशांत च्या लग्नाला होकार दिला  .सायली सारखी भावजय मिळणार म्हणून निशा ही खुश होती  .दोघांचेही लग्न धूमधडाक्यात पार पडले . दोन फुडी लोकांचे लग्न म्हणजे  विविध पदार्थांची रेलचेल असणारच .  स्टार्टर मध्येच पनीर टिक्का  हराभरा कबाब , व्हेज कोफ्ता, बटर नान ,पनीर  ,डाल तडका ,जीरा राईस ,बिर्याणी  ,डेझर्ट मध्ये  आईस्क्रीम रस मलाई असे एक ना अनेक पदार्थ होते  .त्यामुळे सर्व वऱ्हाडी एकदम खुश होते .

            लग्न झाल्यावर सायली आणि सुशांत ने स्वतःचे रेस्टॉरंट  चालू करायचे ठरवले . इंडियन, चायनीज   मल्टी कझीन  असे विविध मेनू त्यांच्या हॉटेलमध्ये होते.         अल्पावधीतच या हॉटेलला  लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला.  त्यांचे हॉटेल पंचक्रोशीत  नावारूपास आले  त्यांचा दोघांचाही सुखाचा संसार चालू झाला  त्यासाठी कारण एकच  "पनीर टिक्का मसाला  "

राहुल चिंचोळीकर  

ReplyForward