पानावरचा दवबिंदू

पानावरचा दवबिंदू


*पानावरचा दवबिंदू*

पानावरचा दवबिंदू
भासे मज टपोरा
होण्या धरेत एकरूप
झालाय अधिरा...

पानावरचा दवबिंदू
भासे मोत्याची खानी
चकाकणारा मोती
पसरलेय हिरव्या रानी

पानावरचा दवबिंदू
भासे मज जणू मोती
हिरव्या गालिच्यावर
ते हिऱ्यासम चमकती

पानावरचा दवबिंदू
भासे मज सोनेरी
किरणांची आभा जणू
विसावे हिरव्या पानावरी

ओघळत होते पाणी
भासे मोहक पर्णावरी
नयनरम्य त्या पहाटे
निसर्गाची किमया न्यारी

पानावरचा दवबिंदू
वाहायचा विसरला
आयुष्य क्षणभंगुर तरी
एकजागी स्थिरावला


✍?✍?✍?
©श्री.

🎭 Series Post

View all