पालकत्व निभावताना.....

All parents have patients in case of handle children... children are very sensible ..

पालकत्व निभवतांना......

आज प्रिया जरा विचारात होती,अन् तिने आरव ला हाक दिली...आरव काही हाक मनावर घेत नव्हता,म्हणजेच तो त्याच्या ऑफिस च्या कामात व्यस्त होता...ती पुन्हा पुन्हा त्याला आवाज देई,पण आरव काही लॅपटॉप सोडायला तयार नव्हता...शेवटी ती कंटाळली व त्याला म्हणाली....

तू आणि तुझ काम...बस....

अग,,काय झालं...मला ऑफिसचे काम आहे ग...का अशी वैतागली आहेस...

तुझ काही घराकडे लक्ष आहे की नाही...अरे मी एकटीने किती करायचे...तू असा नेहमी तुझ्या कामात व्यस्त असतो,अन् तिकडे मयंक तसा...

मयंक तसा म्हणजे कसा...आणि मयंक ला काय झाले...चांगलाच तर आहे तो....

अरे तू मयंक ला त्याच्या वाढदिवसा च्या दिवशी नोटीस नाही केलं का...तो आता पूर्ण सहा वर्षाचा झाला पण त्यातील तो खोडकर पणा,त्याची मस्ती,त्याचे मला त्रास देणे....हल्ली सगळ्या गोष्टी तो विसरला असा सारखं मला वाटतं....

छे तुझं आपलं काहीतरीच.....आहे तसाच आहे तो...

अरे मी त्याची आई आहे,एक आई मुलाचे सुख दुःख ओळखू शकते,तू काय बाबा..बाबांना कळायला वेळ लागतो....

जेव्हा मयंक बोलत नव्हता तेव्हा देखील मला सगळं काही तो न बोलताच कळत होतं,तर आता न कळायला काय झाले... तो आधीसारखा खेळत पण नाहीस ...नक्कीच काहीतरी झाले आहे....

बर मग आता मी काय करू...सांग बाई....

अरे तू त्याला विश्वासात घेऊन ...नक्की काय झालं हे विचार...

बर बर...येवढे काम आटपून लगेच त्याला विचारतो...

हम्म्म.......

आरव मयंक च्या खोलीत जातो,तर मयंक खिडकीत बसून बाहेर बघत असतो,बाहेर त्याच्या वयोगटातील मुले खेळत होती,तो त्यांच्या कडे एकसारखा बघत होता....आरव मयंक ला दोनदा आवाज देतो...पण मयंक फक्त त्या मुलांकडे पाहत असतो...शेवटी आरव त्याच्या जवळ जाऊन अलगद त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारतो...

अरे बाळा,तू का नाही जात त्यांच्या बरोबर खेळायला.....

नाही नको बाबा....मला नाही खेळायचे....

अन् तू असा एकटा च का खोलीत...आपण खेळायचे का...मला आज भरपूर वेळ आहे तुझ्यासोबत खेळायला.....

नाही बाबा....माझी मुळीच इच्छा नाही....

मयंक चा आवाज अगदीच दबलेला होता,त्याला खेळावेसे वाटत होते,पण कसलीतरी भीती त्याच्या मनात होती....आरव ला आता पटले होते की प्रिया जे बोलत होती त्यात तथ्य आहे...
आणि नक्कीच काहीतरी झाले असावे...

आरव ने नक्की काय झाले असेल याचा शोध घेण्याचे ठरविले,...सर्वात आधी त्याला खोलीच्या बाहेर काढले,आणि शाळेची वेळ झालीच होती,म्हणून त्याला शाळेत जाण्याकरिता तयार करायचे ठरवले...मयंक शाळेत जायला अजिबात तयार नव्हता...शाळेत न जाण्याची इच्छा पाहून आरव ने त्याला आपण दुसरीकडे बाहेर फिरायला जाऊया असे सांगितले...

मयंक ने एक स्मित हास्य देऊन होकार दिला...

त्या दिवशी आरव ने ऑफिस मधून सुट्टी घेतली,प्रिया ने घरातील सर्व कामे पटापट आवरली,..आणि बाहेर जायला ते निघाले...

प्रिया आणि आरव ने आधीच ठरविले होते की मयंक ला आधी फॅमिली डॉक्टर कडे घेऊन जाऊ...तसे ते डॉक्टरांकडे गेले ...दोघांनी डॉक्टरांना मयंक मध्ये होणारा बदल सांगितला...डॉक्टरांनी मयंक ला तपासले...तेव्हा मयंक जोर जोराने रडत होता,आणि मयंक डॉक्टरांना ढकलून लगेच प्रिया जवळ येऊन तिच्या कुशीत लपला व रडत होता....

डॉक्टरांना मयंक बाबतीत थोडासा अंदाज आला म्हणून त्यांनी प्रिया व आरव ला केबिन मध्ये बोलावले...दोघांना डॉक्टरांनी सांगितले की कदाचित मयंक च्या विशेष भागावर कोणीतरी स्पर्श करत असावं....आणि म्हणूनच मयंक मध्ये हा बदल घडला....तुम्ही त्याला विश्वासात घ्या आणि त्या कोमेजलेल्या मनाला पुन्हा तू पूर्णतः सुरक्षित आहे ही जाणीव करून द्या....

प्रिया आणि आरव सर्व ऐकुन ठप्प झाले होते,त्यांना विश्वास बसत नव्हता की खरच आपल्या मुलासोबत्त असे काही घडू शकते,मयंक चे वयच किती होते,...अन् अशा गोष्टी त्याच्या सोबत घडतात...दोघांनी त्या क्रूर व्यक्ती चा शोध घेण्याचे ठरविले,,म्हणून ते मयंक ला विचारण्याचा प्रयत्न करत होते पण मयंक काही त्या व्यक्तीचे नाव सांगत नव्हता....

मयंक अगदीच कोमेजून गेला होता...त्याला कसे नार्मल करावे हे प्रिया आणि आरव दोघांना हि कळत नव्हते,...प्रिया आणि आरव दोघेही मयंक ला पूर्ण वेळ देत होते...त्याची खूप काळजी घेत होते,त्याला पूर्ण विश्वासात घेण्याचा आणि तू सुरक्षित आहेस हे पटून देत होते...

एक दिवस मयंक अन् आरव दोघे चित्र काढत असतात,चित्रांमधून आरव त्याला विचारण्याचा खूप प्रयत्न करतो पण मयंक काहीच न सांगत असल्याचे स्पष्ट होते...आणि तेव्हा डोअर बेल वाजते,,लगेच प्रिया दार उघडते तर समोरच्या काकू  येतात...

याना काकू

काही नाही ग...सहज आले मी...

हो का,,

हो...बर मयंक कुठे आहे?दिसत नाही आहे...

आहे ना....थांबा ह...मी त्याला आवाज देते

मयंक तुला भेटायला बघ कोण आलं...

मयंक ला जसा त्या काकुचा आवाज येतो तसाच तो सर्व फेक फाक करतो अन् लगेच त्याच्या खोलीत धावत जातो...

लगेच आरव त्याच्या खोलीत जातो,अन् त्याला विचारतो...तू असा का आलास....


बाबा....त्या काकू खूप खराब आहेत,मी नाही नाही म्हणताना देखील त्या माझ्या खोलीत येऊन मला ...आणि त्याच बोलणं थांबत....पण आरव च्या आता सर्व लक्षात आलं होतं...तो लगेच प्रिया ला बोलावून सांगतो....

तसेच प्रिया व आरव दोघे मयंक ला घेऊन पोलिसांकडे जातात व त्या काकूंची तक्रार करतात,...लागलीच पोलिस त्या काकूंकडे येतात व त्यांना पोलिस स्टेशन ला घेऊन जातात,..तिथे त्या काकू लेडीज पोलिस कडून मार ख्याल्यावर काही वेळाने सर्व कबुल करतात व त्यांना सर्व हकीकत सांगतात...

जेव्हा प्रिया एखद्या कामानिमित्त बाहेर गेली की मी लगेच मयंक च्या खोलीत जायची,,एखाद्या वेळेला मयंक खेळायला असला की मी लगेच त्याला माझ्या घरी काही कारण सांगून बोलवायची....
असे करत मी मयंक ला बरेचदा त्रास दिला....

प्रियाला तर हे सर्व ऐकल्यावर राहवले नाही त्यामुळे वयाने मोठ्या असून सुध्धा तिने त्या बाईच्या थोबाडीत मारली...व स्वतःच कुठे ना कुठे आपण अपराधी असल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली,...पण इथून पुढे मी माझ्या मयंक ला कधीच ऐकट सोडणार नाही असे तिने ठरविले...

यात आरव ला देखील पश्र्चाताप होत होता की मी फक्त ऑफिस ऑफिस करत असल्यामुळे हे सर्व घडले...या पुढे मी पण घराकडे तेवढेच लक्ष देईल जेवढे प्रिया देते....

दोघांनी झालेल्या घटनेतून बरेच काही ठरविले,व एकमेकांच्या समजुतीने व विश्वासाने मयंक मध्ये आत्मविश्वास आणण्याचा निर्णय घेतला,त्याच्या कोमल मनाला पुन्हा बहरून आणले....

आणि झालेली घटना लपून न ठेवता सर्व पालकांना उघडकीस केली,व सर्वांनी आपापल्या लेकरांचा विश्वास जिंकून त्यांच्या मना चा विचार करून त्यांना जगात होणाऱ्या अशा वाईट घटनांपासून सावध करावे,व असल्या कृत्यांना वेळीस आळा बसावा...या साठी मुलांना घरातच चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याचे शिक्षण द्यावे...असे आवर्जून सांगितले.....


Ashwini Galwe Pund