पालक पराठा

आज दिपक ला घरून डबा आला .घर तसं लांबच तालुक्यातील गावात.डबा पोहचवायचा तर दोन्ही वेळेला होईल असाच द्यावा म्हणून तिने सकाळच्या जेवणासाठी पोळीभाजी आणि रात्रीच्या जेवणासाठी पालक पराठे, चटणी दिली.बाबांसाठी दुध बिस्कीट दिले .
पालक पराठा
आज दीपक चा दवाखान्यातला पाचवा दिवस होता.त्याच्या बाबांना जिल्ह्या रुग्णालयात भरती केले होते.सुरुवातीचे दोन दिवस तो रात्री उशिरापर्यंत झोपण्यासाठी घरी आला.त्यामुळे सकाळी डब्बा सोबत नेता आला.नंतर बाबांची तब्बेत जास्त खराब होवु लागली.मग त्या चे दवाखान्यातच थांबणे होवू लागले.कधी मित्रांकडून तर कधी नातलगा कडून जेवणाचा डबा येवू लागला.
दिपक दवाखान्यात थांबून बाबा ची सेवा करू लागला, रात्रीच जागरण होवू लागल.बाबांची तब्येत खालावत गेली.तशी त्याच्या पण तब्येत खराब होवू लागली.
तरीही तो त्यांची सेवा करत होता.कारण दुसरा पर्याय नव्हता, कधी त्यांना स्वच्छ करणं कधी बेड ठीक करणे.त्यांना खाऊ घालण ,दुध देण, सारखा त्यांच्या सेवेत राहायचा.त्या गडबडीत त्याचे स्वताकडे दुर्लक्ष होत होते.जेवन करायला ही वेळ मिळत नव्हता.त्यालाही गोळ्या सुरू होतो त्या पण वेळेत त्या घेणं ही त्याला जमत नव्हते.कसा तरी एखाद्या लाजवर सकाळ च आंघोळ करून परत त्यांच्या सेवेत हजर व्हायचा.
आज बाबांची तब्बेत जास्तच बिघाड ल्याने त्यांना दुसऱ्या दवाखान्यात हलवण्यात आले.आज दिपक ला घरून डबा आला .घर तसं लांबच तालुक्यातील गावात.डबा पोहचवायचा तर दोन्ही वेळेला होईल असाच द्यावा म्हणून तिने सकाळच्या जेवणासाठी पोळीभाजी आणि रात्रीच्या जेवणासाठी पालक पराठे, चटणी दिली.बाबांसाठी दुध बिस्कीट दिले .

शहरात असलेल्या लहान भाऊ आकाशला इतके दिवस गावी येण्यास सगळे नाही म्हणत होते.कारण रेल्वे बंद होत्या.मुलांना आणि बायको सोबत आणणे योग्य नव्हते.पण बाबा सोबतच मोठ्या भावाची तब्येत खराब आहे.माहीत झाल्याने त्याने गावी येण्याचे ठरवले.बायको , मुलांना तिथेच ठेऊन तो स्वतः घ्या चार चाकी गाडी ने गावी येण्यास निघाला इतर वेळी सर्व सोबत असताना काही वाटत नव्हते पण आजचा प्रवास खुप लांब वाटत होता.फोन वरून तब्बेत ची चौकशी करत होता.घरुन आलेले जेवण एका शेतात थांबून त्याने आटोपले.वेळ न घालवता तो लगेच पुढील प्रवास ला निघिला.सकाळी लवकर निघाल्यामुळे आठ तासांत तो तालुक्यातील घरी पोहचायला.आता थोडा आराम कर, सकाळी जिल्हातिल दवाखान्यात बाबांना भेटायला जा. असे सगळे सांगत होते पण त्याला दिपकच्या तब्येतीची काळजी वाटत होती.घरी फक्त चहा घेऊन लवकर दवाखान्यात गेला. बाबाचे अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.तेथिल सेविकांना विनंती करून आकाश बाबांना भेटायला आत गेला.भेट कसली फक्त एक नजर पाहुन आला.त्यांना तर काही होश नव्हता.त्यांची अवस्था पाहून त्याचा संयमाचा बांध सुटला.बाहेर येवून दीपक आणि तो खुप रडले.आतुन दोघेही खचलेले होते पण एकमेकांना धीर देत होते.बाबांच्या उपचारासाठी वाट्टेल ते करायला दोघांची ही तयारी होती, आकाश आल्या मुळे दिपकला ही थोडा धिर आला.पुढील औषधोपचार, तपासणी करण्यात बराच वेळ गेला.आठ वाजत आले होते.दिवसभराचा प्रवास आणि काळजी ने खुप थकल्या सारखे वाटत होते.आता थोडे काही खाऊन आराम करावा म्हणून तो दवाखान्याच्या आवारातुन बाहेर आला पण बाहेर सगळी दुकाने हाटेल बंद झाले होते.सगळीकडे संचारबंदी लागू झाली होती.
नास्ता,फळ, चहा, काहीही त्याला मिळाले नाही.माझ ठिक आहे प्रवासाचा थोडा थकवा आहे.पण दिपकला तर थोडा ताप पण आहे, शिवाय दोन दिवसांपासून तो पाच मिनिटे ही झोपला नाही . त्याची झोप होणे जास्त आवश्यक आहे.
बाबा तर आता अतिदक्षता विभागात असल्याने त्यांच्या जवळ थांबू देणार नाही.काही लागले तर मी लक्ष ठेवतो पण तु जेवण करून गोळ्या घे.आकाश दिपकला विनंती करू लागला.
दिपक च्या गाडीत सकाळी घरून पाठवलेले पालक पराठे, चटणी होती.पण आकाश उपाशी असतांना एक घासही त्यांच्या पोटात जाणार नव्हता.आकाशने त्याला खुप समजावले तेव्हा तो खाण्यास तयार झाला.कसेतरी चार घास खाऊन त्याने गोळ्या घेतल्या.झोपायला कुठेच सोय नव्हती.मग तो आपल्या गाडीत बसून झोपण्याचा प्रयत्न करू लागला.
आकाश ही त्यांच्या गाडीत बसुन दिपककडे लक्ष ठेवून होता.पोटात काही नसल्याने आणि काळजी ने तो रात्रभर जागीच होता.
पालक पराठे, चटणी बरीच शिल्लक होती.पण दिपकने त्याला दिली नाही.भावाला मोत्यांचा घास जरी भरायचा असेल तर स्वतःचा जीव ओवाळून टाकायला कमी न करणारा भावाला असे वागावे लागले.
कारण
जगभरात पसरलेली महामारी
कोरोणा.
पुष्पा प्रमोद.