Feb 26, 2024
नारीवादी

पैंजण भाग -4

Read Later
पैंजण भाग -4
भाग -4

संजय तिला समजून घेतो, तीच ही बरोबर असतं. रात्र ही बरीच झालेली असते, आणि तसं ही पुढचे चार ते पाच दिवस आनंदाने घालवू शकतो.

सकाळ होते, संजय मेधासाठी बेड टी मागवतो.
तिच्या चेहऱ्यावर गोड किस देत तिला तो उठवतो. " गुडमॉर्निंग.. उठा सकाळ झाली.. " संजय बोलतो.

मेधाचा चेहरा तेजस्वी दिसतं असतो, " खूपच फ्रेश दिसतं आहेस ती.. " संजय कौतुकाने प्रेमाने बोलतो.

" हो रात्री उशिरा का होईना छान झोप लागली ना, म्हणून तुला अस वाटतं असेल.. " मेधा चहाचा घोट घेत.

" सो उठा आता, फ्रेश व्हा म्हणजे बाहेर जाऊ फिरायला आणि मग मस्त जेवण जेऊ. आणि रात्री उशिरा रूमवर येऊ.. काय बोलतेस आजचा प्लॅन. " संजय तिला सगळं सविस्तर समजावतो.

तेवढ्यात त्याला त्याच्या आईचा कॉल येतो.
" अरे आईचा कॉल... " संजय कॉल घेतो.

" काय रे पोहचलात का ? " समोरून आई विचारते.

" हो पोहचलो जरा उशीर झाला पण आलो.. " संजय बोलतो आणि पाठी वळून मेधा कडे पाहतो.

" नशीब माझं.. " आई सुटकेचा श्वास घेत.

" का गं काय झालं..? " संजय विचारतो.

" अरे काही नाही, मी आणि बाबांनी पाहिलं नाही काल अमावस्या होती ना. त्यामुळे काळ्जी लागून होती, पण बरं झालं नीट पोहचलात ते... " आई काळजीने बोलत होती.

" अगं आई नको ते काय मनात आणतेस, अस काही नसतं.. बघ मी आणि मेधा व्यवस्थित आहोत. ती आत्ताच फ्रेश व्हायला गेली आहे..फ्रेश होऊन मस्त फिरून आरामात येऊ.. " संजय सांगतो.

" बरं बरं चला मी ठेवते काही असेल तर कॉल कर.. " अस बोलून आई. कॉल कट करते.

मेधा आणि संजय मस्त तयार होऊन फिरायला बाहेर पडतात..

रात्रीचे दहा वाजतात संजय आणि मेधा रूमवर येतात.. संजय आत येऊन दार लावून घेतो, मेधा खिडकीपाशी उभी असते.

संजय पाठी जाऊन तिला मिठी मारतो, " अरे रे थांब की.. " मेधा त्याला अडवत..

" आता काय झालं ? " संजय विचारतो.

" अरे फ्रेश तर होउदे.. " मेधा बोलते.

" अरे हो सॉरी.. बरं थांब एकच मिनिट.. " संजय बॅग मधून एक हॉट असा सूट काढतो.

" हे घाल तु, ह्या सूट मध्ये मला तुला पाहायचं आहे. आपली पहिली रात्र मला तुला ह्यात पाहायची आहे. " संजय बोलतो.

मेधा आत जाते फ्रेश होऊन बाहेर येते आणि तिने तो सूट घातलेला असतो...
तिच्या त्या गोऱ्या अंगावरी लाल कलरचा नाईट सूट फारच उठून दिसतं असतो.

" फारच छान.. अप्रतिम दिसतेस.. " आणि तोह तिच्या अंगाला स्पर्श करतो...

तिच्या जवळ जातो, हाताने तिचे केस मोकळे करतो.. ती जरा लांब होते, पण पुन्हा तो तिला जवळ खेचतो. चेहऱ्यावर आलेली बट तो फुंकर मारून बाजूला करतो आणि हळूच त्याचं लक्ष समोर असलेल्या आरशावर जात तसं तो पटकन मागे सरतो. त्याचा विश्वासच बसत नाही, तो दोन्ही डोळे चोळतो पण समोर कोणीच नसतं.

तो रूम मधून तसंच बाहेर येतो, चावी घेऊन तो गाडी चालू करतो.. रस्त्यात त्याचं वाटेवर त्याला मेधा बसलेली दिसते. पायात तोंड घालून रडत, त्याचा गाडीवरचा ताबा सुटतो.. गाडी जाऊन झाडाला आपटणार तेवढ्यात तो कंट्रोल करतो.. आणि तडक घराच्या वाटेला येतो..

तेवढ्यात त्याला एक फोन कॉल येतो, तो कॉल घेतो.

" हॅल्लो मिस्टर संजय पाटील बोलतायत का ? " समोरून अनोळखी व्यक्ती बोलते.

तो घाबरतच, " हो बोलतोय आपण कोण ? " संजय कापत्या स्वरात बोलतो.

" मी इन्स्पेक्टर राणे बोलतोय, मेधा पाटील ह्यांची बॉडी भेटली आहे. तुम्ही येऊन एकदा पडताळून पाहता का ?" इन्स्पेक्टर राणे बोलतात.

" पण तुम्हाला कसं माहित ? " संजय विचारतो.

" आम्हाला त्यांच्याशी शेजारी फोन भेटला त्यात ही सर्व माहिती होती.. म्हणून तुम्हाला कॉल केला.. " आणि पोलिस कॉल ठेवून देतात..

संजय घराची बेल वाजवतो, रात्रीचे दोन वाजलेले असतात..
आई बाबा खडबडून जागे होतात..
" आता ह्या वेळेला कोण आलं...? " आई बाबांना बोलते.

दोघेही बाहेर येतात दरवाजा खोलतात दारात संजय उभा असतो..
तो लगबगिने आत जातो, आई बाबा दोघंही त्याला बघून आश्चर्यात पडतात..

आईची नजर मेधा ला शोधत असते, " अरे हे काय एकटा आलास ? " आई विचारते.

" मेधा कुठे आहे ? बाहेर सामान वगरे काढतेय का ? " बाबा दाराच्या बाहेर जाऊन गाडीत पाहतात..

.....क्रमश.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Manisha Narendra Parab

Job

मि लॅब टेकनिशन आहे. लिहायला वाचायला खुप आवडत.

//