Feb 26, 2024
नारीवादी

पैंजण भाग -2

Read Later
पैंजण भाग -2

भाग -2


मेधा आणि संजय च्या लग्नाचा दिवस उजाडतो, मेधा छान तयार झालेली असते. पिवळी नऊवारी, केसाचा आंबाडा, हातात हिरवा चुडा, कपाळावर मुंडावळ्या.


लग्न लागत संजय तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो, " पाय कर पुढे,,... " संजय तिला हळूच बोलतो. ति पाय पुढे करते,, आणि संजय तिच्या पायात पैंजण घालतो.


ति फारच खूश होते आणि संजय कडे पहाते, हेच ते पैंजण जे तिला खुप आवडलेले शॉप मध्ये पाहिलेले..


" हे तुझ्याकडे कसे..? " मेधा विचारते.


" हेच आवडलेले ना तुला ? पण मला सांगितलंस नाही !" संजय बोलतो.


" इतके दागिने घेतलेस आणि त्यात अजून तुला सांगायचं..!" मेधा बोलते.


" पण माझं लक्ष होतं,,,आवडले ना..? तुला तिथे हे इतके आवडले की मि त्याचं दिवशी जाउन हे आणले.. आणि आज ते तुझ्या पायात आहेत..!" संजय बोलतो.


त्या दिवशी मेधा इतकी सुंदर दिसतं होती की, कोणाचीही नजर लागेल अशी.


लग्न छान धामधूम मध्ये होतं.

मेधाचा गृहप्रवेश होतो, आणि ति पाटलांची सून म्हणून त्या घरात येते.


" काय मग मॅडम खूश का..? " संजय तिच्या कानात हळूच बोलतो.


ति त्याच्या कडे पाहते, " नशीब आता उशीर नाही केलास.. " आणि हसू लागते.


लग्नाचे नऊ दिवस सुखाने आनंदाने जातात.

" तुमच्या दोघांची हॉटेल ची तिकीट बुक केली आहे, वेळेवर पोहचा..!" संजयची आई त्या दोघांना बोलत होती.

कारण आईला ही माहित असतं संजय वेळेवर कधीच पोहचत नाही..


आई बाबांनी मिळून दोघांसाठी हनिमून चा प्लॅन आखलेला असतो. शांत सुंदर ठिकाणी.


" बरोबर बोललात आई, हे लग्ना आधी सुद्धा असेच उशीराने यायचे आणि मला तात्काळत ठेवायचे.. " आणि मेधा हसू लागते.


" ह्यात काय हसण्यासारखं ? ते आधी व्हायचं आता तसं नाही काही होणार.. " संजय बोलतो.


" अच्छा बघूया ना आता किती सुधारणा होते ते..!" मेधा त्याला टोमण्याने बोलते.


" बरं चला आटपा लवकर, उशीर होईल नाही तर. " संजय ची आई बोलते.


दोघंही तयार होऊन हनिमून साठी निघतात, रात्रीचे दहा वाजलेले असतात..


मेधाच्या मनात जरा पालं चुकचूक ते, " अरे संजू आज आपण इतक्या रात्री उशिराने का निघालो ? " मेधा विचारते.


" अगं त्यात काय झालं, उलट रात्रीचं रोमँटिक वाटतं. मोकळा रस्ता, शांतता गाड्यांची गर्दी नाही. म्हणून म्हटलं जरा उशिरानेच निघूया... डोन्ट वरी.. " हसून संजय बोलतो.


"अरे पण !!!" मेधा बोलून मध्येच थांबते.


" पण बिन काही नाही, तु उगाच काळ्जी करतेस. आपण काय आज निघालो आहे का आणि मि काय आज गाडी चालवतोय का ? " संजय तिला समजावत बोलतो.


तो गाडीत असलेला रेडिओ चालू करतो, त्यात पहिलंच रोमँटिक गाणं लागत., " लग जा गले... के फिर येह..हसी रात हो ना हो.. " आणि संजय गाणं ऐकताच रोमँटिक होतो.


तिचा हात हातात घेऊन, एकटक गाडी चालवत तिच्याकडे पाहत राहतो. तितक्यात समोरून मोठा हॉर्न येतो, आणि भलमोठा ट्रक त्यांच्या गाडीला कट मारून जातो...


" संजू... " मेधा जोरात किंकाळते आणि त्यांची गाडी जाऊन झाडाला आदळते...


" धडा....म... गाडीचा जोरात आवाज येतो..." गाडीच्या एका हॉर्नचा चेंधा झालेला असतो..


" आई गं.. आई.. " मेधाच्या हाताला जरा खर्चटत..


" तु ठीक आहेस ना.. अरे यार थोडं लागलं आहे.. " मेधाचा हात हातात घेऊन तोह पाहतो..


" तु ठीक आहेस ना...!" मेधा संजय ला विचारते..

त्याला ति नीट पाहते, काही कुठे लागलं तर नाही ना..


" मि ठीक आहे, पण आपली गाडी काही ठीक नाही दिसतं... हॉर्न आणि एक लाईट उडालेली दिसते आहे वाटतं.." आणि संजय मेधा गाडीच्या बाहेर येतात.


" हो रे आता कसं पोहचणार..? एकतर रात्रीचे बारा वाजलेत आणि त्यात रस्त्यावर अंधार. एकही गाडी दिसतं नाही आहे.. " मेधा थोडी पॅनिक होते..


" हो हो काळजी करू नकोस पॅनिक होऊ नकोस, मि पाहतो काय ते.. तु जाऊन गाडीत बस.. " संजय तिला गाडीत बसायला सांगतो.


मेधा जाऊन गाडीत बसते..


.... क्रमश...ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Manisha Narendra Parab

Job

मि लॅब टेकनिशन आहे. लिहायला वाचायला खुप आवडत.

//