Dec 05, 2021
Commedy

पाहुणा

Read Later
पाहुणा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

पाहुणा
         अतिथी देवो भव:
          अस म्हणून आपण आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत करतो. संस्कृती आहे आपली. तर असाच एक पाहुणा आलाय आपल्या घरी. सुरुवातीला घाबरलेला, पाहुणचार होणार की नाही म्हणून. पण आपण भारतीय. परंपरा जपली पाहिजे. जपलं. यालासुद्धा जपलं. एवढं की तो पाहुनचार खाऊन टम्म फुगलाय नि हवेत तरंगायला लागलाय. आदरसत्कार आपला आणि काय? 
         पंछि, नदीया, पवनके झोकें,
          कोई सरहद ना इन्हे रोके.
 हे गाणं चुकीचे वाटायला लागलंय, ते अस असायला पाहिजे,
          पंछि, नदीया, पवन, कोरोनाके झोकें,
           कोई सरहद ना इन्हे रोके.
     बोला आता. शत्रूदेशातील असूनही आपण किती जपलं. तशी सवय आहे आपल्याला चिनी मालाची. एवढे छान पंचपक्वान्न दिले की तो जायला मागत नाही. तो आला तेव्हा शत्रूदेशविरोधी म्हणायचे की याचे अंतिमसंस्कार इथेच करू. अरे बाबांनो आपलेच अंतीमसंस्कार होत आहेत आता.
            350 वर्षे मुघलसत्ता, 150 वर्षे इंग्रजसत्ता, आणि आता एक वर्ष होणार कोरोना सत्तेला. आणि म्हणे अंतिमसंस्कार करू. ह्या तिन्ही सत्ता का आल्या तर आपण ह्यांना सुरुवातीपासूनच कमी गणल. आता आपलीच गिणती कमी होत आहे. 
              कुठे गेले ते भविष्यवक्ते, अरे सांगाना कोणत्या रंगाचे कपडे घालायचे, कोणत्या खड्याची आंगठी घालायची की कोरोना होणार नाही.
           आणि ते कुठेत जे म्हणत होते की भारताच्या वातावरणात कोरोना उष्णतेने जळून जाईल. अरे इथे आपल्याला जाळायला लाकडं सोडा, स्मशानभूमीही उपलब्ध नाहीये.
            मला सर्वात जास्त राग त्या लोकांचा येतोय जे प्रशासनाच्या, डॉक्टरांच्या, पोलिसांच्या नावाने अजूनहीे बोट मोडत आहेत. अरे तुमचं लहान मुलासारखं शि- शु करण्यात त्यांचं कंबरड मोडलंय, त्याच काय? 
                    अजूनही लोक मास्क घालत नाहीयेत. घातलं तर नाक उघड तोंड झाकलेला, तोंड उघड तर गळा झाकलेला. झाका. गळा झाका. जसा काही कोरोना तुमचा गळा दाबणारेय. अजिबात गळा दाखवू नका. भलेही 10 लाखाचे 20 लाख होऊ देत. 
                   गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणारेही पोपटायला लागलेत, की प्रशासन कोरोना रुग्णांची नीट देखभाल करत नाही म्हणून. 'देखभाल दिखेगी कैसे भाई, आपनेजो सब जगहपे रंगीनिया फैला रख्खी है उसके सामने प्रशासनकी देखभाल फिकी पड जाना लाजमी है'.
                अजूनही भविष्यवक्त्यांचे दुकान सुरू आहेत. सांगतात कसे - कुंभ राशी- 'आज प्रवासाचा योग आहे'. अरे नालायकानो जरा हेही सांगत जा की प्रवासाचा योग अनुभवताना पोलिसांच्या बांबूचा बमवर प्रयोग अनुभवण्यास मिळेल आणि बमचा बॉम्ब झाल्यास तो कुठेही टेकण्यास " मुश्किलही नही, नामुमकीन हो जायेगा".
                   लस निघणार तेव्हा आपण कोरोनामुक्त होऊ अस म्हणणाऱ्यांनो, आपण झालोत का कुष्ठरोगमुक्त, पोलिओमुक्त, क्षयरोगमुक्त. मुक्तीसमर्थकानो हे 100 वर्षांपूर्वीचे आजार अजूनही आहेत. का? तर आपण काळजी घेत नाही आपली व दुसर्यांचीही. जरा यांच्यामुळे झालेले मृत्युदर बघा. कोरोनापेक्षाही जास्त आहेत.
                  शेवटी उपाय काय? काळजी. हा एकमेव प्रतिबंधात्मक उपाय. कशी घायची? तीही मीच सांगू?हो. सांगायला पाहिजे कारण हाथ, मुंह, बम सारख्या जाहिराती काढून जेवणाअगोदर व नंतर हात धुवायचे हेही सांगाव लागत हे आपल्या देशाच दुर्दैव.
                     मुंबई, पुणे, ठाण्यात कहर माजलाय कोरोनाचा पण लोक अजूनही बिनामास्कने फिरताहेत. जसकाही यमदेव यांना सांगून गेलाय, " जुग जुग जिओ मेरे लाल, मेरी उमरभी तुमको लग जाये".
               काही लोक प्रशासनाला 100 रुग्ण होते तेव्हा थाळ्या, टाळ्या वाजवल्या आता 10 लाखावर रुग्ण गेले तर dj वाजवून नाचायच का? अस विचारताहेत तर मला सांगा नाचायला, dj वाजवायला तुम्ही सुखरूप आहात, कोरोनामुक्त आहात ते प्रशासनामुळे हे विसरू नका. आणि टाळ्या , थाळ्या वाजवताना वरातीत आपणही सामील होतात, तेही आपापल्या पिल्याना घेवून हे बरे विसरलात.
               डॉक्टर लोकांचे हाल विचारू नका. " नजरके सामने, जिगरके पास, कोरोना रेहता है" अस चाललंय. कोरोनावेडे झालेत ते आणि तुम्ही कोरोनयोद्धे म्हणून फक्त स्वतःलाच मनःशांती देताय.
                 पोलिसांचं पण काही वेगळं नाहीये, त्यांचा झिंगाट डान्स कधीही न संपणारा. परिस्थिती, "जतानाभी नही आता, छुपानाभी नही आता"अशी.
           "या अल्लाह और कितनी बार नमाज पढना
पडेगा?, Ohh God When you will blessed us?, हे वाहेगुरु ये क्या कर दिया आपने?,  नको देवराया अंत पाहू आता." खूप झालंय हे सर्व.
            हे मी विनोदीभाषेत यासाठी सांगतेय कारण कोरोनाला आपण विनोदातच घेतलंय, अजूनही घेतोय. म्हणून म्हटलं शहाण्या लोकांना ' स्मार्ट ' कराव. मास्क लावून गप्प बसता येतं नाही मला म्हणून ही जनजागृती. आपणच आपली जागृती केली  नाहीतर हा पाहुणा "हिंदी चिनी भाई भाई" म्हणून इथेच राहायचा नि आपण चेपट नाक्यांना शिव्या घालत बसायचोे. 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sushma Chawle - Kanetkar

Job

I like reading very much. I want to share my stories .