फायनली, माझ्या हातात माझी ईराच्या कथामालिका स्पर्धेची ट्रॉफी आली.
ट्रॉफीवर लिहिलेलं माझं नाव.
अहाहा...! कसलं भारी वाटतंय मला! असं वाटतंय दिल गार्डन गार्डन हो गया! कथामालिका लिहिण्याची पहिलीच वेळ असतांना मला ही ट्रॉफी मिळाली.
अहाहा...! कसलं भारी वाटतंय मला! असं वाटतंय दिल गार्डन गार्डन हो गया! कथामालिका लिहिण्याची पहिलीच वेळ असतांना मला ही ट्रॉफी मिळाली.
यात जरी मी मला सुचलेला विषय मांडला असला, तरी हा विचार मांडायला मला ईरासारखं व्यासपीठ मिळालं खरंच मी स्वतःला नशीबवान समजते. मी अश्या व्यासपीठाशी जोडले गेले आहे, ज्या व्यासपीठावर सगळेच लेखक/लेखिका मग ते/त्या नव्या असोत किंवा जुन्या सर्वच एकसमान आहेत.
आणि आपल्या ईराचे वाचक म्हणजे प्रत्येक कथेला भरभरून प्रतिसाद आणि प्रेम देणारे आहेत. वाचकांच्या प्रतिक्रियांमुळे लेखकाला लिहिण्यास उत्साह येतो आणि त्यात जर तो एखादा नवोदित लेखक असेल तर त्याच्यासाठी वाचकांच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या असतात.
मी माझ्या कथेचा पहिला भाग पोस्ट केला, थोड्याच वेळात तो भाग फेसबुक पेजवर आला. ईराच्या फेसबुक पेजवर एखादी कथा आली आणि वाचकांनी ती वाचली नाही असं कधी होऊच शकत नाही.
त्यातल्याच \"स्नेहा चुनरकर\"यांनी पहिल्याच भागाला आपल्या ईराच्या अँपवर कमेंट केली होती की,"कथेचा भाग रोज येऊ दे." त्यांच्या कमेंटचा मान मी राखला आणि रोज एक भाग पोस्ट करत गेले.
तसंही साधारण चार ते पाच भाग लिहून झाल्यावरच मी कथा टाकायला सुरुवात केली. माझ्या कथेची सगळ्यात पहिली वाचक होती माझी दीदी, म्हणजेच तुमच्या सर्वांची लाडकी लेखिका \"प्रतिक्षा माजगांवकर\". तिच्या अनेक कथा तुमच्या मनात घर करून आहेत, जसं \"रहस्यमय हवेली\", \"समुद्री मिशन\", \"गूढ\", \"एक बेट मंतरलेलं\" आणखी बऱ्याच....
पण माझ्या कथेचा प्रत्येक भाग तिने स्वतःची कामं बाजूला ठेवून वाचला, नुसता वाचला नाही तर तो भाग कसा आहे याची सगळ्यात पहिली कमेंट मला माझ्या दीदीकडून मिळायची.
त्यात जर घरात मोठे बहीण भाऊ असतील तर लहानांना कसलीच काळजी नसते. जर काही चुकलं तर ते दीदी/ दादा सांभाळून घेईल, असं 99% तरी असतंच आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर माझं 200% तसंच आहे. म्हणून माझी पहिली वाचक माझी दीदी आहे.
मग मला कथा पोस्ट केल्यानंतर नियमित प्रतिसाद देणारे मंगेश देशपांडे सर, स्नेहा चुनरकर मॅडम, प्रिया मॅडम, कल्पना पाटील मॅडम, कविता मॅडम, सपना पारख मॅडम तसेच फेसबुकवर कमेंट करणाऱ्या वासंती पांडे मॅडम ह्या खरोखर कथा अनुभवत आहेत असे त्यांच्या कमेंट वरून वाटत होते. आणखीनही रंजना बोरकर मॅडम, पूजा दीक्षित मॅडम, देवयानी चित्रा मॅडम, हर्षदा वाव्हळ मॅडम आणि माझी बेस्ट फ्रेंड मानसी मोहिते जी मला व्हाट्सअप्पवर प्रत्येक भाग कसा होता हे सांगायची, या सर्व वाचकांच्या प्रतिक्रियांमुळे मला पुढचे भाग लिहिण्यास हुरूप येत होता.
या सर्व वाचकांच्या प्रतिक्रिया माझ्या प्रत्येक भागाला असायच्या. तुम्ही माझी कथा इतकी मन लावून वाचायचात, त्यात गुंतून जायचात, माझ्या मते एखाद्या लेखकाला यापेक्षा अधिक काहीच नको असतं. आपण लिहिलेली कथा सर्वांना आवडावी यासाठी लेखक स्वतःचे पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करत असतो.
आणि याच प्रयत्नांना यश मिळालं ते वाचकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळेच.
त्यामुळे मी तुम्हा सर्व वाचकांचे आणि ईराच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते.
त्यामुळे मी तुम्हा सर्व वाचकांचे आणि ईराच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते.
महत्त्वाचं म्हणजे मी फेसबुकवर कमेंट करणाऱ्या वाचकांची माफी देखील मागू इच्छिते, कारण माझं फेसबुकला अकाउंट नसल्या कारणाने मी तुमच्या कोणाच्याच कमेंटला रिप्लाय करू शकले नाही.
तरी तुम्ही सर्वांनी मनात काहीच अडी न ठेवता पुढच्या सर्व भागांना प्रतिसाद दिलात. ह्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
तरी तुम्ही सर्वांनी मनात काहीच अडी न ठेवता पुढच्या सर्व भागांना प्रतिसाद दिलात. ह्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
(माझ्याकडे FB नसल्याने काही वाचकांची नावं जर राहिली असतील तर खरंच सॉरी!
नाव लिहितांना नावात जर काही चूक झाली असेल तरी समजून घ्या. काही नावं ही अँपमध्ये जशी दिसतात तशीच लिहिण्यात आली आहेत.)
- साक्षी माजगांवकर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा