पहिल्या प्रेमातील पवित्रता......भाग २...

This is a true love story...

पहिल्या प्रेमातील पवित्रता......भाग २.

अनय सारखा सिया चा पाठलाग करीत होता,याचे कारण मात्र सीयाला कळत नव्हते...दिसायला देखणा मुलगा माझ्यासारख्या सामान्य मुलीच्या मागे का लागला असावा?असा तिला सारखा प्रश्न पडत होता..

अनय च्या पाठलागी ची सियला सवय झाली होती,आणि एक दिवस शाळेत जात असताना सिया सारखी इकडे तिकडे बघत होती...तिची मैत्रीण अनघा तिला सारखा प्रश्न करीत होती...अग सिया काय झालं?तुझ काही हरवलं का?का काही विसरलीस तू...अशी वेड्या सारखी इकडून तिकडे अन तिकडून इकडे काय बघतेस ग...त्या दिवशी मात्र सिया ला नक्की काय झाले हे माहीत नव्हते...

दुसरा दिवस उजाडला तरी देखील सियाचे वागणे तसेच ,,, नेमके सिया ला काय झाले असे अनघा ला सारखे वाटत होते...आणि सिया अनघा ला म्हणाली...अग अनघा काहीतरी हरविल्यासारखे वाटत आहे ग...हो त्या दिवशी तिला तिच्या पहिल्या प्रेमाची चाहूल लागली होती...पण मनात कसली तरी भीती असल्या मुळे ती तीच प्रेम व्यक्त करत नव्हती...

त्या दिवसात मात्र अनय दोन तीन दिवस सिया ला दिसलास नाही...एके दिवशी सिया कोचिंग ला जात असताना सायकली वरून सतत मागे मागे पाहत होती,..आणि काय समोर एका सायकली ने सिया ला चांगलाच धक्का दिला,अग आई ग ...म्हणत सिया उठत होती आणि कोणी धळका दिला म्हणून बघते तर काय समोर अनय ....हाताला जखम झाली असून देखील काहीच न लागल्या सारखे तिला भासले,व मनोमन एक हास्य देऊन ती सायकल उचलीत होती,..समोरून अनय सॉरी सॉरी सारखा म्हणत होता... इट्स ओके म्हणून सिया ने सायकल उचलली व तिथून निघाली....

जात असताना एकदा तिने मागे वळून बघितले तर अनय जणू काही तिच्या बघण्याची वाट पाहत होता,म्हणजेच तो तिच्या कडे च बघत होता...सिया ला तर असे वाटत होते की दोन तीन दिवस कुठे होतास विचारावे का...पण कुठेतरी मनाला सावर घालत ती तिथून गेली....

धेय्य वेडी सिया प्रेमाच्या जाळ्यात अडकत चालली होती,फक्त अभ्यासाला महत्त्व देणारी सिया अनय ची सतत वाट पाहत होती,..एक दिवस जरी अनय दिसला नाही की तिला करमत नव्हते...आणि अनय देखील सारखा तिच्या समोर यायचा,त्यामुळे तिला ही तो आता खूप आवडायला लागला होता,..अर्थातच आवडण्या सारखा च होता तो...

अनय आणि सिया च्या घराचा रस्ता एकच होता,त्यामुळे सियाची नजर फक्त रस्त्यावर असायची,अन् जर का अनय दिसला तर लगेच ती पण बाहेर यायची,केवळ त्याला बघण्यासाठी म्हणजेच ती खरोखर अनय वर मना पासून प्रेम करत होती आणि तिला त्याचा आदर ही वाटायचा,की इतक्या सुंदर मुलाला कोणतीही मुलगी मिळू शकते,पण त्याने इतक्या साध्या मुलीत रस दाखविला...या गोष्टीमुळे सिया त्याच्या वर खूप प्रेम करत होती...

पण कदाचित अनय हा केवळ टाईमपास करत असेल का ,या विचाराने ती नेहमी व्याकुळ राहत असे,अन् जर समोरून त्याला प्रपोज केले अन् त्याने माझी चेष्टा केली तर,असे नाना प्रकारचे विचार सियच्या मनात येत होते,,आणि या प्रेम प्रकरण मुळे तिचे अभ्यासातील सातत्य कमी होत चालले होते....पण सिया ला मात्र अनय च्या व्यतिरिक्त काहीच दिसत व महत्वाचे वाटतं नव्हते...

सिया ने ही गोष्ट तिची मैत्रीण अनघा ला सांगितले तर अनघा यावर हसली आणि म्हणाली अग तू वेडी आहेस का...तो अनय तुझ्यावर शक्यच नाही...त्याला काय मुलींची कमी आहे...असे म्हणत अनघा तिथून निघून गेली,,,मात्र या गोष्टीचा सिया च्या मनावर परिणाम झाला,तिला ही असे वाटले अनघा जे बोलते ते खरच आहे,...स्वताच्या मनाची समजूत काढत तिने असे ठरविले की अनय च जरी नसेल प्रेम तरी माझं एकतर्फी प्रेम आहे त्याच्यावर....हे मात्र नक्की....

एके दिवशी अनघा व सिया दोघी मंदिरात जात होत्या,तेव्हा सिया ला सारखे वाटत होते की अनय तिचा पाठलाग करतोय,पण तिने काही मागे वळून बघितले नाही,अन् थेट मंदिरात गेली ...समोर बघते काय तर चक्क अनय ....अनय ला एकदम समोर बघून ती थोडी घाबरली ...आणि बाजूला झाली,आणि लगेच आवाज आला...सिया,. सिया. .चक्क अनय तिला आवाज देत होता,...मागे वळून न बघता तिने दबक्या आवाजात विचारले ,,,,,काय...

अनय: अग मला थोड बोलायचं होत...

 सिया: पण काय बोलायचे तुला...

अनय: रागवशिल तर नाही ना...

सिया: नाही

अनय:. एक विचारायचं आहे तुला,,,

सिया: ह विचार

अनय:. माझं हो आहे आणि तुझ....

सिया:. पण काय हो....

अनय : समजून घे प्लीज....

सिया:बर!!मग माझं नाही आहे .....

अनय: अग पण तू ही ........
          बर बर ...खरंच तुझ नाही आहे ना...ठीक आहे...

सिया:अरे पण काय नाही माझं ते तर सांगशील ....

अनय :पुन्हा विचारतो,,,नाही ना तुझ माझ्यावर प्रेम...

सिया :प्रेम,,,,नाही माझं फक्त अभ्यासावर प्रेम आहे,आणि हो यापुढे माझ्या समोर देखील येऊ नकोस...माझी तुला विनंती समज,...

त्या दिवशी का कुणास ठावूक सिया ने अनय ला नकार दिला,,,आता नेमके नकार देण्याचे कारण काय असावे हे बघुया आपण पुढील भागात....

कथा आवडल्यास नक्की लाईक आणि शेयर करा....


Ashwini Galwe Pund...