पहिल्या प्रेमातील पवित्रता......भाग १.

This is a true love story....

सिया अतिशय साधी सालस गोड मुलगी,विशेष अस तिच्या मध्ये काहीच नाही,पण तरी देखील सर्वांना हवीहवीशी वाटणारी अशी सिया.....जरी रंग काळा असला तरी चार लोकांमध्ये सतत उठून दिसत असे, खर तर इतर मुलीनं प्रमाणे ती जरी असली तरी तिचे धेय्य मात्र ठाम होते...

वय वर्षे १६असलेली सिया,घरकामात निपुण तर होतीच तसेच अभ्यासात देखील तिला रुची होती...काळा रंगा वर मात करण्यासाठी तिने अभ्यासाचे माध्यम निवडले होते....

आईवडील एक भाऊ आणि सिया,अस छोटंसं सियाच कुटुंब...भाऊ हा सिया पेक्षा वयाने मोठा त्यामुळे सिया त्याला थोडीफार घाबरत असे,आणि तो ही तिच्यावर नेहमी लक्ष द्यायचा,...सिया घरात लाडाची असल्यामुळे आईवडील तिला केव्हाच रागवत नसे...

सिया ला तिचे कुटुंब,तिचा अभ्यास,...आणि आपण काहीतरी या आयुष्यात बनून दाखवायचे असा ठाम विचार....या व्यतिरिक्त ती कशातच लक्ष देत नसे...सिया आईवडिलांची आदर्श मुलगी म्हणून देखील ओळखली जायची...

आणि म्हणतात ना आयुष्यात एक वळण येतं अन् सर्व आयुष्य च बदलून जाते असेच काहीसे सिया च्या बाबतीत घडले...गेले कितीतरी दिवसा पासून एक मुलगा सतत सियाचा पाठलाग करत होता,ही बाब सियाच्या लक्षात येताच तिने भावाला सांगायचा प्रयत्न केला परंतु भाऊ हा गरम स्वभावाचा असल्यामुळे काय करेल याची तिला भीती वाटत होती,म्हणून ही गोष्ट घरी कोणालाच न सांगता आपण स्वतःच यावर काहीतरी मार्ग काढावा असे तिने मनोमन ठरविले....

त्या मागे लागणाऱ्या मुलाकडे लक्ष न देता ती फक्त अभ्यासात लक्ष देत होती....आणि कदाचित तो मुलगा ही खूप जिद्दी होता म्हणून त्याने ही तिचा पिच्छा सोडला नाही,सियाला मनोमन खूप भीती वाटत होती,परंतु ही गोष्ट जर घरात कळली तर कदाचित तिचे शिक्षण थांबले जाईल असे तिला वाटत होते...म्हणून कशी बसी ती त्या मुलाला टाळत रोज शाळेत जायची...एक मात्र विशेष असे होते त्या मुलामध्ये की तो फक्त तिच्या मागे जायचा,बोलायचा एक शब्द देखील नाही....

समोर आला की फक्त तिच्या कडे बघून हसायचा,अनय त्या मुलाचे नाव...अनय असा का वागतोय नेमके त्याच्या मनात तरी काय?? अशा प्रश्नाचं घर तिच्या मनात झालेलं...

अनय दिसायला देखणा,उंच,गोरापान,...घरचा देखील श्रीमंत ,त्याला तर मुलींची कमी नाही,मग हा सिया च्या मागे का लागला असावा...याचे उत्तर आपल्याला मिळेल पुढील भागात....अनय आणि सिया च्या आयुष्यात कोणकोणते मोड येतात ते बघुया आपण पुढील भागात....