पाहीली का गाडी...

घरातल्या मुलाकडून झालेली चुक वडीलांपर्यत पोहोचवीणीरी एक्सप्रेस न्युज म्हणजे पापाकी परी.

एकदा गण्या त्याच्या बहीण लागे घेउन घरी येत होता. त्याच्या बहिणची परीक्षा होती दुस-या गावी. 

गण्याने त्याच्या मेव्हण्याची बाईक घेतली होती. त्याच्या गाडीने ऐनवेळी काम काढल होत. त्याच्या मेव्हण्याची बाईक नवीन होती आणि जास्त पावर ची होती. 

परीक्षा देऊ न परत येताना, योगायोगाने गण्याचे वडील ही त्याच वेळेला असणा-या लोकल मधुन घरी यायला निघाले. 

बाईक जास्त पावर ची असल्याने ती जवळपास लोकलच्या वेगाइतपत धावत होती. 

 जशी ती लोकल पुढच्या स्टेशनला थांबलेली दिसायची तसा गण्या त्याच्या बहीणला म्हणायचा पाहीली का दादांची गाडी (तो त्याच्या वडीलांनी दादा म्हणायचा) अस ३ त ४ वेळेस झाल.गण्याच्या बहीण ने फक्त मान डोलवली. पुढचा रस्ता खराब असल्याने गण्याला घरी पोहोचायला उशीर झाला. 

मग घरी पोहोचल्या पोहोचल्या गण्याच्या बहिणने तिच्या वडीलांना विचारल, 

"पाहीली का गाडी, आम्ही सोबतच होतो तुमच्या? " 

तेव्हापासून ४ दिवस झाले गण्या पायीच फिरत होता.