भाग - पस्तीस.
अंगावर पडणाऱ्या शॉवरच्या थंडगार पाण्यात स्वतःला झोकून देऊन तो नखशिखांत भिजला. आता कुठे थोडे शांत वाटत होते. चेंज करून तो तसाच बेडवर पहुडला.
भूक, तहान.. पुन्हा विसरला तो. मनात साद घालणारा एकच प्रश्न.. 'उद्यातरी आसावरी भेटेल ना?'
'ती भेटली की माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय तिच्यापुढून हलणार नाही.'
भूक, तहान.. पुन्हा विसरला तो. मनात साद घालणारा एकच प्रश्न.. 'उद्यातरी आसावरी भेटेल ना?'
'ती भेटली की माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय तिच्यापुढून हलणार नाही.'
मनातच विचार करता करता तो निद्रेच्या केव्हा अधीन झाला, कळलेच नाही.
********
"मम्मा, आज ऑफिसला नको जाऊस ना गं." तयारी करून ऑफिसला निघालेल्या आसावरीचा हात पकडून आपल्या पिटुकल्या चेहऱ्याने छवी तिला थांबवत होती.
"पिल्लू, दोन दिवस जाऊ दे ना. नंतर मग पुन्हा मम्माला सुट्टी घ्यावी लागेल ना?" तिच्या कपाळावर ओठ टेकवत आसावरी म्हणाली.
"म्हणजे आशू, आपल्याला पुन्हा हॉस्पिटला जायचे आहे का गं?" आपली घारी नजर तिच्यावर रोखत ती.
"हम्म, जावे तर लागेलच. माझी गोडुली लवकर स्ट्रॉंग व्हायला हवी ना?" तिच्या केसातून हात फिरवत आसावरी.
"नको ना आशू, मला तिथे अजिबात करमत नाही." ती.
"बस्स! आता आणखी काही दिवस. मग माझ्या बाळाला तिथे कोण घेऊन जाईल? ती तर घरीच राहील." तिला प्रेमाने कुरवाळत आसावरी.
"बरं, मी आता निघते. नाहीतर बॉस ओरडतील ना मला?" आपली पर्स सांभाळत ती उठली. "आणि आजीला त्रास नाही द्यायचा बरं का? मी लवकरच येईन." तिला परत एक मिठी मारून ती निघाली.
"काकू, येते हो मी." छवीची सूत्रे रजनीताईच्या हाती सोपवून तिने घराबाहेर पाऊल ठेवले.
खरं तर ऑफिसला जायला तिचे मन धजत नव्हते. कायम छवीशेजारी राहावे, तिच्यापासून क्षणभरही दूर होऊ नये असे सतत वाटत होते पण पर्याय नव्हता. आधीच कालची सुट्टी झाली होती आणि आता ऑफिसमध्ये गेल्यावर सागर काय बोलेल हा प्रश्न होता. कारमध्ये बसल्यावर तिचे लक्ष अंगणात फुललेल्या गुलाबाकडे गेले. तो टवटवीत गुलाब आपल्याकडे बघून हसतोय असे तिला वाटले. कारच्या बाहेर येऊन तिने त्या गुलाबावर अलगद बोटे फिरवली. त्या मऊ मखमली स्पर्शाने डोळ्यातील टपोरा थेंब त्या गुलाबी पाकळीवर विसावला.
'तुझ्याप्रमाणे काकूंचा गुलाबदेखील लवकरच टवटवीत होऊन फुलेल.'
ती मनात म्हणाली आणि लगेच ऑफिसला निघाली.
ती मनात म्हणाली आणि लगेच ऑफिसला निघाली.
रजनीताई दारातून आसावरीला न्याहाळत होत्या. तिला गुलाबावर हात फिरवताना बघून त्यांच्या डोळयात टचकन पाणी आले. आपले घर सोडून इथे येताना त्यांनी केवळ जुन्या घराच्या दारात फुललेला गुलाब आपल्यासोबत इथे आणला होता. ह्या पाच वर्षांत इथली छोटेखानी बागसुद्धा वेगवेगळ्या गुलाबांनी गच्च बहरली होती.
'दारातील गुलाब किती छान बहरलाय. माझ्या घरातील गुलाब मात्र कोमेजत चाललाय. केव्हा पूर्वीसारखी फुलेल ती?' त्यांचा पदर डोळ्याजवळ गेला.
*******
टेबलवरचा फोन खणखणला. सागर तिला आत बोलावणार हे घरूनच ती गृहीत धरून आली होती.
"तुला काय वाटतं? तू मला आवडतेस म्हणून तुझी मनमानी सहन करेन मी?" केबिनमध्ये सागर तिच्यावर ओरडत होता.
"मी कसलीही मनमानी केलेली नाहीये. मला इमर्जन्सी रजा हवी होती म्हणून काल मी आले नाही, इनफॅक्ट तसा मेल सुद्धा केला होता." शांतपणे ती.
"अच्छा! पण तुझी रजा मी अप्रूव्ह केली की नाही हे जाणून न घेताच तू घरी थांबलीस." चिडून तो.
"सर, मी कधीच विनाकारण रजेवर नसते. त्यामुळे माझ्या भरपूर लिव्ह्ज शिल्लक आहेत. त्यामुळे तुमच्या अप्रूव्हलची वाट पाहावी असे मला वाटले नाही." राग तर तिलाही येत होता पण अजूनही चेहऱ्यावर शांतता होती.
"आणि सर,मी तुमच्याशी लग्नाला तयार नाहीए म्हणून तुम्ही माझ्याशी असे वागू शकत नाही.तुमचे पर्सनल लाईफ आणि ऑफिशियल लाईफ एकत्र मिक्स करू नका." ती शांतपणे बोलत होती.
"तुझ्याकडून काही शिकावे अजून माझ्यावर तशी वेळ आली नाहीए, अंडरस्टूड?" त्याचा राग नियंत्रणाच्या बाहेर जात होता.
"नॉक नॉक.."
बाहेरून रिसेप्शनिस्ट आत डोकावली. त्याने ईशाऱ्यानेच तिला आत बोलावले.
बाहेरून रिसेप्शनिस्ट आत डोकावली. त्याने ईशाऱ्यानेच तिला आत बोलावले.
"सर, सर्वोदय ग्रुपचे नवे सीइओ तुम्हाला भेटायला आले आहेत." रिसेप्शनिस्ट.
"ही मिटींग केव्हा ठरली होती?" त्याने दोघींकडे बघत विचारले.
"नाही सर, मिटींग ठरली नव्हती. ते काल आले होते पण तुम्ही दुसऱ्या मिटींग मध्ये होतात म्हणून मी त्यांना नकार दिला." रिसेप्शनिस्ट.
"व्हॉट नॉन्सेन्स? असे परस्पर निर्णय घ्यायला तू माझी सेक्रेटरी आहेस का? तुला माहितीए बाहेर बसलेली व्यक्ती कोण आहे ते? जा पाठव पटकन आत." तो घुश्शात बोलला.
तिच्या पाठोपाठ आसावरीही निघाली तसे त्याने तिला अडवले.
तू कुठे निघालीस? इथेच थांब." त्याच्या बोलण्यावर ती निमूटपणे तिथेच थांबली.
काही वेळापूर्वी..
शेखर घाईतच आपला ब्रेकफास्ट आवरून घरून निघाला होता. आज कोणत्याही परिस्थितीत त्याला आसावरीला भेटायचे होते. ऑफिसमध्ये नाही तर किमान तिथून तिच्या घराचा पत्ता मिळवायचा असे त्याने ठरवले होते. तो तिच्या ऑफिसमध्ये पोचला तेव्हाच ती त्याला क्रॉस झाली. लाल काठ असलेली हलक्या निळ्या रंगाची साडी. व्यवस्थित पिनअप केलेल्या केसातून बाहेर आलेल्या एक दोन बटा, सावळाच तरी रेखीव असा शांत चेहरा. तिला आवाज देऊन तिथेच थांबवावे असे त्याला वाटले तोवर ती त्याच्या समोरून निघूनही गेली.
रिसेप्शनजवळ जाऊन आत जाण्याची विनंती करूनही ती बया अर्धा तास झाला तरी त्याला आत सोडायला तयार नव्हती तेव्हा त्याने नाईलाजाने आपली पावर वापरण्याचे ठरवले. त्याने आपल्या हातातील कार्ड तिच्यासमोर धरले.
'मिस्टर शेखर राजवर्धन. सीईओ, सर्वोदय ग्रुप.'
कार्ड वरचे नाव वाचून रिसेप्शनिस्टच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.
कार्ड वरचे नाव वाचून रिसेप्शनिस्टच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.
"सॉरी सर, हे तुम्ही काल सांगायला हवे होते ना? मी आत्ताच बॉसला सांगते." म्हणून ती आतमध्ये पळाली.
त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित झळकले. ती बाहेर येईपर्यंत सकाळपासून घडलेला घटनाक्रम त्याच्या डोळ्यासमोर उभा राहीला.
त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित झळकले. ती बाहेर येईपर्यंत सकाळपासून घडलेला घटनाक्रम त्याच्या डोळ्यासमोर उभा राहीला.
*********
"सर, तुम्ही आत जाऊ शकता. बॉसने बोलावलंय आणि हो आसावरी मॅडम देखील आत आहेत." बाहेर येत तिने शेखरला जादाची माहिती पुरवत आत सोडले.
"सर, तुम्ही आत जाऊ शकता. बॉसने बोलावलंय आणि हो आसावरी मॅडम देखील आत आहेत." बाहेर येत तिने शेखरला जादाची माहिती पुरवत आत सोडले.
"वेलकम मिस्टर शेखर राजवर्धन. सीईओ, सर्वोदय ग्रुप. आपल्या अपोझिट टीमला भेटायला आलात, तेही न कळवता? आश्चर्य आहे." शेखर कडे बघत सागर म्हणाला.
"ॲक्च्युअली मी इथे ऑफिसच्या कामासाठी नव्हे तर खाजगी कामासाठी आलोय." आतापर्यंत पाठमोरी असलेली आसावरी शेखरच्या आवाजाने वळली. तो तिच्याचकडे पाहत बोलत होता.
'हा इथे कसा?' त्याला बघून ती गोंधळात पडली.
"खाजगी काम? मुद्द्याचे बोलाल का? तसेही आत्ताच मला कोणीतरी आपली ऑफिशियल आणि पर्सनल काम मिक्स करायची नसतात हे शिकवत होते." शेखरची आसावरीवर गढलेली नजर बघून सागर त्याला म्हणाला.
"हो, मुद्द्याचेच बोलतो. मला आसावरी मॅडमशी थोडे पर्सनल बोलायचे आहे. अर्ध्या तासासाठी त्यांना माझ्यासोबत पाठवाल का?" तो आत्ताही आसावरीकडेच पाहत होता.
"अर्ध्या तासासाठी आसावरी हवी आहे? एवढं कोणतं पर्सनल काम? आणि मुळात आसावरी अशी कामं करते?" आसावरी आणि त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत सागर कुत्सितपणे पाहत हसला.
"मिस्टर सागर, माईंड युअर लँग्वेज!" त्याच्या बोलण्यावर शेखरचा हात उठला.
"माझ्याच ऑफिसमध्ये येऊन माझ्यावर हात उगारतोस? हाऊ डेअर यू?" सागरने त्याचा हात झिडकारून लावला.
"सागर मला तिला सोबत घेऊन जाऊ दे. माझे महत्त्वाचे काम आहे." शेखर.
"माझी होणारी बायको आहे ती. असे तुझ्यासोबत का पाठवू मी? कोणत्या नात्याने?" सागर चिडून म्हणाला.
"माझ्या मुलीची आई आहे ती. तुझ्या परवानगीची आवश्यकता नाहीए मला." शेखर आसावरीकडे जात म्हणाला.
"एक मिनिट, काय म्हणालास? आसावरी तुझ्या मुलीची आई आहे? म्हणजे आसावरी तू माझ्याशी डबल गेम खेळलीस? इथे काम करून इथले सीक्रेट याच्या कंपनीशी शेअर करत होतीस ना?" सागर आसावरीकडे वळला.
खरे तर ती भांबावली होती. आरोप प्रत्यारोप.. तिला काहीच कळत नव्हते. ती काही बोलणार तोच शेखरने तिला अडवले. "एवढया हीन पातळीची ती नक्कीच नाहीए. ती असे काही करेल असे वाटले तरी कसे तुला?" आसावरी आणि सागरच्या मध्ये येत तो म्हणाला.
"ते मला माहीत नाही, पण मी हिला आत्ताच्या आत्ता माझ्या कंपनीतून बडतर्फ करतोय." सागरच्या डोळ्यात आगीचा डोंब उसळला होता.
"बडतर्फ करण्याची काहीच गरज नाहीए. मुळात तीच ही नोकरी सोडतेय. शेखर राजवर्धनच्या मुलीच्या आईला नोकरी करण्याची काहीही गरज नाहीय. चल आसावरी." तिचा हात पकडून तो निघालाही.
त्याच्याशी नव्हतेच जायचे तिला. पण त्याच्या घाऱ्या डोळ्यात काय जादू होती कोण जाणे, तिची पावले आपसूकच त्याच्यासोबतीने चालायला लागली.
.
.
क्रमश :
********
पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*******
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार!
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार!