Feb 22, 2024
नारीवादी

पाहिले न मी तुला! भाग -22

Read Later
पाहिले न मी तुला! भाग -22

पाहिले न मी तुला..!
भाग - बावीस.


वॉव! द्याट्स ग्रेट न्यूज यार!" तिने आनंदाने त्याला मिठी मारली. "दादू, आय एम सो हॅपी."


त्याने केवळ मंद स्मित केले.

"आता तू सांग, तू कसला विचार करते आहेस?"  तो.


"डॉक्टर निशांत!"  ती हलकेच म्हणाली


"त्याच्याबद्दल काय? हृदयात वगैरे वसला नाही ना तो?"  तिला चिडवत शेखरने विचारले.


"त्यांना जॉईन करायचा विचार मनात डोकावतोय."  ती हसून.


"अरे, तुला तर रेडिओलाजिस्ट व्हायचे होते ना? मग मध्येच हे बालरोगतज्ञ डॉक्टर निशांत कुठून आले?"   शेखर.


"ही इज सच अ नाईस गाय! खूप डॅशिंग आणि पॅशनेट आहेत ते. त्यांच्यासोबत काम करायला मला नक्की आवडेल." पल्लवी हसली.


"ओहो! कुछ तो गडबड है पल्लवी." तोही हसला.
"आवडलाय का तो तुला?"


"दादू, कोणालाही आवडतील असेच आहेत रे ते."  ती जराशी लाजली.


"अरेच्चा! तुला लाजताही येते तर. कीप इट अप डिअर!" तो तिच्या डोक्यावर टपली मारून आत गेला.


'काय बोलले मी हे? माझ्या मनात असे काहीच नव्हते. दादूच्या कॉफीचा असर तर नाही ना झालाय?'
तिचे ओठ हळूच रुंदावले.

'तसाही हा विचार चुकीचा नाहीये. डॉक्टर निशांतला जॉईन झाले तर किमान त्या छोटीशी कनेक्टेड तरी राहता येईल.'

'अरे वा डॉक्टर पल्लवी, यू आर जिनियस!' तिने स्वतःची पाठ थोपटली.
मनावरचे ओझे काहीसे हलके झाल्यागत तिला वाटत होते. बागेत दरवळणारा मोगऱ्याचा गंध श्वासात साठवून ती आत गेली.

******

"येस डॉक्टर पल्लवी, काय म्हणताय? तुमच्या दादा आणि वहिनीचे पॅच अप झाले का?"  डॉक्टर निशांत पल्लवीला विचारत होता.


"येस सर, मिन्स नो, मिन्स येस."  त्याच्या अशा डायरेक्ट प्रश्नाने तिची तारांबळ उडाली.
आज डॉक्टर निशांतला भेटायला ती हॉस्पिटलमध्ये आली होती. कॉफी टाइम असल्यामुळे तो थोडा निवांत होता.

तिच्या त्या गोंधळलेल्या उत्तराने त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू आले पण तसे न दाखवता तो शांतपणे तिच्याकडे बघत होता.


"ऍक्च्युअली सर, मला त्याच विषयावर बोलायचे आहे पण त्यापूर्वी दुसऱ्या विषयावर बोलायचे आहे." स्वतःला सावरत पल्लवी बोलत होती. चेहऱ्यावर गोंधळ होताच.


"हं, कॅरी ऑन."  निर्विकारपणे डॉक्टर निशांत.


"सर, तुमची काही हरकत नसेल तर मी तुमच्याकडे प्रॅक्टिसला येऊ शकते का?" शेवटी कशीबशी तिने विचारलेच.


" चाईल्ड डिपार्टमेंट इज नॉट एन इजी टास्क!"  तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे नजर टाकत तो म्हणाला.


"मुळात डॉक्टर बनणे हे सुद्धा सोप्पे नाहीये ना? प्रत्येक डिपार्टमेंट तेवढेच क्रिटिकल असतात पण शिकवणारे जर तुमच्यासारखे पॅशनेट आणि इंटेलिजन्ट डॉक्टर असतील तर मग कोणीही शिकेल."  ती.


"कोणीही कसा शिकेल डिअर? विदाउट इंटरेस्ट नो वन बी गूड लर्नर. पेडीयॅट्रिक्स मध्ये तुझा इंटरेस्ट आहे ना?"  तो.


"पूर्वी नव्हताच. आता मात्र हंड्रेड परसेन्ट इंटरेस्ट निर्माण झालाय." तिचा कॉन्फिडन्स थोडा वाढला होता.


"ओके, देन वेलकम टू डॉक्टर निशांत्स पेडीयॅट्रिक्स हॉस्पिटल." त्याने हसून तिचे स्वागत केले.

"थँक्स अ लॉट सर!"   ती आनंदून म्हणाली.

"सर, आणि दुसरी गोष्ट सांगायची राहिलीच. माझी थोडी गफलत झाली होती."  पल्लवी.

निशांत तिच्याकडे प्रश्नार्थक पाहत होता.

" ती छोटी, आय मिन ती छवी. ती माझी कोणीच नाहीये. माझा थोडा गैरसमज झाला होता. नॉऊ एव्हरीथिंग इज क्लिअर फॉर मी."  ती बोलत होती.

त्याला तिचे बोलणे फारसे कळले नाही पण ही काहीशी अँटिक पीस आहे हे मात्र त्याच्या ध्यानात येत होते.

"बरं, येऊ मी? उद्यापासूनच तुम्हाला जॉईन करेन."  ती उठत म्हणाली. उत्तरादाखल निशांतने केवळ एक स्मित केले.

'उफ्फ! काय कातिल अंदाज आहे याचा. स्माईल तरी किती गोड! एखाद्याने एवढेही स्वीट असू नये.' मनात त्याचा विचार घेऊन आपल्याच तंद्रित जात असताना केबिनच्या दरवाज्याला ती जोरात धडकली.

"डॉक्टर पल्लवीऽऽ"  तिला सावध करायला निशांत ओरडणारच त्यापूर्वीच तिच्या तोंडून "आई गं ऽऽ" असे विव्हळणे बाहेर पडले. त्याने हसून आपले दोन्ही हात डोक्यावर ठेवले. ती तशीच उभी आपले मस्तक चोळत होती.


"डॉक्टर,आर यू ऑलराईट?" आपले हसू दाबत त्याने तिला विचारले.


"हं? हो सर."  ती उत्तरली. "निघते मी."  म्हणून जवळजवळ तिने बाहेर पळ काढला.

ती बाहेर गेली तसे इतका वेळ दाबून ठेवलेले हसू निशांतच्या ओठातून उसळून बाहेर आले.

******

"मम्मा, उद्या हॉस्पिटलला जायचं आहे तर मग मला परत मागच्यावेळी सारखे मॅजिक औषधं देणार आहेत का गं?"

दवाखान्यात जाण्यासाठी म्हणून बॅग भरत असलेल्या आसावरीला छवी विचारत होती.


"हम्म!" आसावरीने केवळ हुंकार भरला.


"पण मला नेमके काय झालेय? त्या फायटिंग करणाऱ्या सोल्जर सेल्स अशा गं कशा? त्यांना नीट वागायचं कसे कळत नाही गं?" ती निरागसपणे विचारत होती. तिचे टपोरे घारे डोळे आसावरीवर खिळलेले होते.


"बच्चू, काही लोकं बघ कशी असतात रे? एकदम हट्टीपणाने वागतात, अजिबात ऐकत नाहीत.तशाच ह्या सेल्स सुद्धा फार हट्टी असतात. कुणाचं म्हणजे कुणाचं ऐकत नाही. म्हणून मग डॉक्टर अंकल त्यांना वठणीवर आणण्यासाठी पनिशमेंट करणार आहेत." बॅग ठेवत आसावरी.


"आशू, पनिशमेंट मुळे त्यांना त्रास नाही का गं होणार?"  ती काळजीने म्हणाली.


"त्यांच्या त्रासाचे माहीत नाही पण माझ्या पिल्ल्याला त्रास होतोय त्याचं काय?"  ती.


"मम्मा, मला पुन्हा त्रास होईल का गं?" तिने तसे विचारताच आसावरीच्या काळजात चर्रर्र झाले.

"कधी कधी काही चांगले होण्यासाठी थोडा त्रास होतोच ना गं? आपल्याला बरे व्हायचेय ना तर थोडेसे सहन करावे लागेल आणि त्रास झाला तरी तुझी आशू आहे ना, ती कायम तुझ्या सोबत असेल बरं. तुझी लढाई आपण मिळून लढू."  तिला प्रेमाने कुरवाळत आसावरी.

"वॉव! लढाई. ढिशुम ढिशुम! मजा येईल ना गं आशू?" तिच्यातील कुतूहल परत जागे झाले.

"ही लढाई लढताना कोणालाच मजा येत नाही. आपण जरा वेगळे, हटके आहोत ना, आपण नक्कीच खूप मजा करू." आसावरी ओल्या डोळ्याने म्हणाली.

"थँक यू मम्मा. आय लव्ह यू."  छवीने तिला गच्च मिठी मारली.

"माझं शहाणं गं बाळ ते. लव्ह यू टू बच्चा." तिच्या माथ्यावर आपले ओठ टेकवत आसावरी.
"चल झोप आता. मी तुला छानशी गोष्ट सांगू का?" तिचे डोके मांडीवर घेऊन आसावरी तिला थोपटू लागली.


"ये मम्मा, ती गोष्ट सांग ना गं, तुझ्या मैत्रिणीची."  छवी.

"कोण? अनू?"  आसावरी.

" हां, तीच. खूप गोड होती ना गं ती?"  छवीने विचारले.


"हो गोड तर होतीच. अगदी तुझ्यासारखी. तुला माहितीये छवी, ती जर आता इथे असती ना, तर तुलाही खूप आवडली असती, माझ्यापेक्षाही जास्त."  तिचे गाल ओढत आसावरी.


"नो आशू, छवीला तुझ्यापेक्षा जास्त कोणीच आवडत नाही. तुला तुझी फ्रेंड माझ्यापेक्षा जास्त आवडते का गं?"  तिने आपले गोबरे गाल फुगवून विचारले.


"छवी, तू तर श्वास आहेस माझा. अविरत धडधडणाऱ्या माझ्या हृदयाची स्पंदने आहेस तू. तुझ्यापेक्षा जास्त प्रिय मला कोणी असेल का?" तिचा हात हातात घेत आसावरी उत्तरली. त्या उत्तराने छवीची कळी लगेच खुलली.


"मम्मा, यू आर सो स्वीट!" तिच्या गळ्यात हात गुंफुन ती झोपून गेली.


'छवी, तू माझ्या हृदयाचे स्पंदनं असलीस तरी अनू म्हणजे माझे अख्खे हृदय आहे गं. तुम्हा दोघींना मी कसे वेगळे करू शकते?'
झोपलेल्या छवीकडे बघत ती स्वतःशी बोलत होती.


"आसावरी, झोपलाय का गं माझा गुलाब?" रजनीताई आत येत म्हणाल्या.


"हो काकू, आत्ताच झोपलीये." ती उठत म्हणाली."उठू नकोस गं. बस. तुझ्याशीच बोलायला आलेय." त्यांच्या मनाची घालमेल चालली होती.


"उद्या तुम्हाला हॉस्पिटल मध्ये यायचे आहे हेच सांगायचे आहे ना?"  त्यांच्याकडे बघत आसावरीने विचारले.


"कसली मनकवडी आहेस गं आसावरी. माझ्या मनात तेच होतं. खरंच येऊ मी?"
त्यांनी हळवे होत विचारले.


"काकू, तुमच्या गुलाबासाठी तीळतीळ तुटणारे तुमचे मन मला दिसत नसेल का हो? पण हॉस्पिटलला चाललो ना आपण, तिथे का गर्दी करायची न? मी तुम्हाला फोन करत राहील, व्हिडीओ कॉल करेन मग तर झालं ना?"
तिच्या बोलण्याने त्यांच्या डोळ्यात पाणी आले.


"असे क्षणाक्षणाला डोळ्यात पाणी आणाल तर मग तुमच्या गुलाबाला मी काय उत्तर देणार? ती काय म्हणते ते माहितीये न?" आसावरी.


"आय हेट टीअर्स! माहिती आहे मला." त्या डोळे पुसत म्हणाल्या.

"तू म्हणतेस तर नाही येणार बाई, पण मलाही तुझ्याकडून एक वचन हवेय. डॉक्टरांनी काहीही सांगितले अगदी काहीही, तरी मला न लपवता सर्व सांगायचे. शब्द न शब्द." त्या तिच्याकडे पाहत म्हणाल्या.


"काकू, काय हे लहान बाळासारखं?" त्यांचा हात हातात घेत ती म्हणाली.
"तुमच्यापासून मी कधीच काही लपवणार नाही. दिलं वचन, खूष?" ती हलके हसली.


"आसावरी!" त्यांनी आवेगाने तिला मिठी मारली.
" तू आहेस म्हणून छवी आहे गं. तिला काही होऊ देऊ नकोस बाळा." त्यांचे रडू पुन्हा सुरू झाले.


"तुम्ही चुकता आहात काकू. छवी आहे म्हणून तर मी आहे ना? नाहीतर माझ्या आयुष्याला काय अर्थ उरला असता. काकू, ती श्वास आहे हो माझा. तिला काही होईल तर मी तरी जगू शकेन का? मला जगायचेय, खूप खूप जगायचे आहे अगदी जीर्ण म्हातारी होईपर्यंत जगायचे आहे. त्यासाठी तरी मला माझा श्वास जपावाच लागेल ना? कोणी स्वार्थी बोलेल तरी मला चालेल. माझे जीवन माझ्या छवीपाशी येऊन संपत असेल तर होय, आहे मी तेवढी स्वार्थी."
ती हसून म्हणाली. हसताना डोळ्यांच्या कडा कधी पाणावल्या तिलाही कळले नाही.
.
.
क्रमश :

*********
पुढील भाग लवकरच. तोवर हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा आणि वाचत रहा तुमची आवडती कथामालिका पाहिले न मी तुला..!


©Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

******


*साहित्यचोरी गुन्हा आहे*

********


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//