Login

पाहिला पंढरीचा चोर :(

It's A Story Of Thief In Vaari



अंगात सदरा आणि शाळेची खाकी चड्डी घातलेला तो समोरून येणाऱ्या दिंडीकडे बघत होता..

ओ माऊली अहो ओ माऊली, अहो थांबा की, कुठं चाललाय बिगी बिगी ...

अरे लका आम्ही वारीतील मंडळी कुठं जाणार ? पांडुरंगाकडं जातोय .. येतोस का तुबी सोबत ?

मी ? ..मला घेताल का ओ तुमच्या वारीत ?


का ? का नाही घेणार तुला ?.. अरे इथं आम्हीच सगळे एकमेकांना आत्ता आत्ता ओळखतोय त्यात तू जास्त टेन्शन नको घेऊ ,जर मनात विठू असल तर तुलाही अमच्यासोबत विठुची वाट दिसल

हाका ? अहो पण म्या ..

म्या काय रे पोरा ?

अहो म्या खालच्या जातीतील हाय ना वं .. आमच्यात काळ्या विठुला नाही तर गोऱ्या बाबाला पूजतात

हे बघ पोरा ,काळ - गोरं काही नसतं.. मनात भाव असला तर कोणीही आमच्या विठुला आपलंसं करू शकतं

बरं बाबा तुम्ही म्हणताय तर येतो मी ,तसं बी आत्ताच शाळेला सुट्ट्या लागल्यात.. या वर्षी नापास झालोय ना मी ..म्हणून आता सुट्ट्याच सुट्ट्या ,चला घरच्यांना पण त्रास नको मी येतो तुमच्यासंग ..

एक वारकरी : चला चला आता रिंगण तयार होईल ..

तो : हे रिंगण काय असतं बरं ?

बाबा :तू बघ फक्त ,कसे सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदुंग वादक, वीणेकरी गोलाकार उभे राहतात. नामगजर सुरू होतो. टाळ-मृदुंगाच्या एकाच तालात आणि एकाच लयीत पदन्यास करीत वारकरी नाचू लागतात. या तालातच भरधाव वेगाने दिंडी सोहळ्यातील अश्व गोलाकार प्रदक्षिणा करीत पालखीला अभिवादन करतात..


बाबा तुम्हाला असं रोज जेवायला देतात होय गावातील लोकं जागोजागी, बरं झालं मी बी वारीला आलो लोकांची ही छान रुपं पण पहायला मिळतात निस्वार्थी भावनेची..

वाह, सगळे भाविक भक्तगण सोबतच झोपतात व्हय ?
मस्त की ओ बाबा ..

दुसऱ्या दिवशी सकाळी :

"अगं आई गं माझ्या गळ्यातील माळ कुठं गेली ?"

"अहो माझाही फोन नाही सापडते.."

"माझे तर सोबत आणलेले पैसे पण गायब आहे "

त्या गटातील अधिकारी मंडळी : शांत व्हा सगळ्यांनी .. सगळ्यांची झडती घेऊ , सगळे लोकं तर इथेच आहेत ..

बाबा : अहो पण ते काल आलेलं बारकं पोर दिसत नाहीये..कुठं गेलं असेल एकटं? बिचारं चुकलं तर नसेल ना ?

अधिकारी : राहुद्या बाबा नका जास्त विचार करू ,तुम्ही भोळे भाबडे लोकं विठूच्या दर्शनासाठी आतुर असता आणि पापभिरू लोकं तुमचा फायदा घेतात त्यातीलच ते बारकं पोरगं होतं..