पाहिलं प्रेम (भाग 8) न विसरता येणारी आठवण

A love story

पाहिलं प्रेम(भाग 8) 

(माघील भागात आपण पाहिले
सुजित समोर न बसता माघे बसतो)

आता पुढे ............................


सुजित ने तिला समोर बसवले व तो माघे बसला, 


माघे दोघेच बसलेले असल्यामुळं 
आमच्यात खुप अंतर होते, 

"कशी वाटली मग मुलगी, 
त्याने जवळ येत विचारले, 

तो जवळ आला हे बघूनच हृदयाची स्पंदने इतकी वाढली, 
की त्याला काय उत्तर द्यावे, 
आणि काय नाही, 
हे मलाच कळेना, 

छान आहे, 
मी थोडे सावरून बसत म्हणाले, 

एक क्षण वाटलं मनात 
त्याला विचारावं ,
तुला कशी मुलगी हवी , 

पण नाही हिम्मत झाली.

आम्ही सगळे शांतच होतो, 
तस नेहमी बोलायचे काँट्रॅक्ट माझ्याकडे च असते, 
पण तो आज इतका जवळ असताना मीच निःशब्द होते, 

भयानक शांतता, 
आणि मनातल्या मनात वाहणारे प्रेमाचे वारे, 
त्या शांततेला भेदून मनाचा वेध घेत होते,
आणि FM वर लागलेले हे गाणे 
जणू योगच जुळून आला होता सगळा, 

मी खिडकी तुन बाहेर बघत गाणे गुणगुणत होते त्या सिंगर सोबत,

तेरे करिब आ राहा हु 
खुद्द से मै दूर जा राहा हु 
ये बेवजह तो नहि
तू जो मिला ।

धिरे धिरे से तेरा हुआ 
........................

समझो जरा समझो ईशारा 
तेरा हु मै सारा का सारा 
जैसे मुझे तुमसे हुआ है 
ये प्यार ना होगा दोबारा ।

दिल मे 'तेरी जो जगह है 
उसकी काई तो वजह है
ये बेवजह तो नही
तू जो मिला ।

धिरे धिरे से तेरा हुआ 
...................

गाणे संपले व मी भानावर आले, 
दादा, ती व सुजित सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रेमळ भाव दिसत होते जणू सगळे हरवून गेले होते गाण्यात, 
आमचे तिघांचे ठीक होते, 
पण सुजित कुणाच्या आठवणीत हरवला असेल ???
या प्रश्नाने मला वेढलं होत आता, 

मंदिर आले व आम्ही दर्शनाला खाली उतरलो, 

मंदिर खुप मोहक होत, 
त्याचं ते सुंदर नक्षीकाम, आजूबाजूला असलेली झाडे, त्यातील फुले मनाला मोहून टाकणारी  होती, 

"मंदिर गाभारा खुप खोल आहे 
मध्ये मध्ये अंधार देखील आहे 
पायऱ्या सावकाश उतरा
तेलकट झाल्यात त्यावर घसरतात पाऊले"
पुजारी काका म्हणाले, 

हो काका, 
दादा म्हणाला, 

दादा ने पूजेचे एक ताट घेतले 
व माझ्या हातात दिले, मी सुजित चा अनुभव पाठीशी ठेवत ते तिच्या हातात दिले व खुणेने दादा सोबत जायला सांगितले, 

तिच्यासाठी सगळेच अनोळखी होते, 
पण दादा जवळचा वाटत असावा ती पटकन त्याच्या माघे चालू लागली, 

आणखी एक ताट द्या, 
सुजित पैसे देत म्हणाला, 

त्याने ताट घेतले 
व चल तू माझ्या पुढे हो, 
मला म्हणाला , 

समोर दादा मग होणारी वहिनी, मग मी व माझ्या माघे तो हा क्षण असाच जगावा अस वाटत होतं, 

थोडे अंतर पार केल्यावर पायऱ्या खुप तेलकट जाणवल्या 
ती घसरणार तोच दादा नि तिला हात दिला व तो मी व सुजित नि बघितला, 

सुजित माझ्याकडे बघून हसला व मला चालण्याचा ईशारा केला, 

आम्ही गाभाऱ्यात पोहोचलो दर्शन केलं,
दादा व ती माघारी फिरले, 
माझ्याकडे कुठे पूजेचे ताट होते 
मग मी फक्त हात जोडले .


तुम्ही घ्या पूजा करून 
सुजित ला म्हणाले, 

कधी तू 
कधी तुम्ही 
माझाच मला ताळमेळ नव्हता, 

ते तुझ्यासाठी घेतलं मी 
व ऐक माझ्यासाठी पण देवाकडे तूच माघ , 
असे म्हणून त्याने ताट माझ्या हातात दिलं 

" मला तर तुलाच मागायचे आहे देवाकडे,
मी ताटाकडे बघत मनातल्या मनात म्हणाले,

मी पूजा करण्यासाठी खाली बसले, 
तर त्याने माझी ओढणी डोक्यावर ठेवली पदरा प्रमाणे, 

देवाची पूजा करताना डोक्यावर काही असावे असं,
आई म्हणते ,"
तो सहज म्हणाला, 


मी मनोमनी सुखावले, 

आम्ही दर्शन घेऊन वरती आलो 
खुप उशीर झालाय, 
आता निघुयात दादा म्हणाला, 

पुन्हा आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, 
मी त्या पदारातच अडकले होते, 
त्याला खरच जाणवत नसेल का माझी ओढ ???
की कळूनही न कळल्या सारखे करत असेल ????
त्याने का घेतले असेल माझ्यासाठी ताट???
सहज की आयुष्यभरासाठी हवी असेल माझी साथ ????

माझे मन अडकले होते त्याच्यात अजूनही ...........

आनंदी असते मन जेव्हा सहवास तुझा असतो ,
दूर असूनही जवलीकतेचा भास तुझा असतो ,

कधी कधी जातो तोल भावनाविवंशतेमुळे ,
प्रत्येकवेळी समजून घेतोस या जाणिवेने पून्हा बंध जुळे

सैरभैर होते मन अस्तित्व तुझे नाकारताना, 
आठवणी ही डोकी वर काढतात कुठेच तू नसताना.

नात्याची वीण जेव्हा विश्वासाने विनते 
गैरसमजांचे वादळ तेव्हा त्यासम कुटे टिकते. 

हक्क तुझ्यावर गाजवताना कधी कधी मी अडखळते,
असणं नसणं सगळं विसरून पुन्हा मी झुरते.

माहीत नाही कोणाचा कुणावर किती हक्क आहे ????
आहे की नाही तेही माहीत नाही 
पण तरीही हक्क गाजवावा वाटतो,
कळतं की चूक आहे हे माहीत  असूनही मन सतत शोध घेत राहते कुणाचा तरी,
कारण मनाला प्रत्येक क्षणाची महिती हवी असते, 
जाणीव आणि उणीव एकत्र आल्या की मग उडतो भावनांचा गोधळ व मग डोळ्यातील पाण्यासोबत वाहतात नकळतपणे, 
कुणाची आठवण इतकी का सवार व्हावी कुणावर की मनावरील आपली पकड हळुवार पने निसटून जावी,
मर्यादा माहीत असूनही का असते सतत ओढ जे कधीच शक्य नाही????

होतं का प्रेमात नेहमी असकाहीतरी ............

पाहिलं प्रेम अनुभवत जगण्यासाठी सोबत राहा व मला फॉलो करा, 
धन्यवाद

🎭 Series Post

View all