पाहिलं प्रेम (भाग 7) न विसरता येणारी आठवण

A love story

पाहिलं प्रेम(भाग 7)

(माघील भागात आपण पाहिले सुजित,
सुनीता ला होस्टेल ला  सोडून निघून जातो, )

आता पुढे ..........

मी माझ्या मनाशीच खुप खुश होते एका नाव नसलेल्या नात्याने, 
बघताच क्षणी कुणी आवडणे हे आकर्षक असू शकते, पण एकाच व्यक्ती च्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडणे हे कसे आकर्षक असेल, 
ती व्यक्ती दिसली जरी तरी मन समाधानी होते, 
काही दिवस हॉस्टेल ला आराम करून, 
मी पुन्हा कॉलेज ला जायला लागले, 
या काही दिवसात सुजित चा न चुकता रोज तीन वेळा कॉल असायचा, 
जेवलीस का?
गोळ्या घेतल्यास का?
काळजी घे, 
काही लागले तर सांग, 
आता आमच्या बोलण्याचा वेळ 2 मिनिटं वरून 5 मिनिटं वर गेला होता, 
मला खुप आवडायचे त्याच्याशी बोलायला, 
त्याच्या मेसेज ची वाट बघायला, 
मी मनापासून निभावत होते ते नाव नसलेलं नात, एका बाजूने , 

त्याच माझी काळजी करणं, 
सतत मी लहान आहे हे सांगण
हे दादा नि सोपवलेली जबाबदारी होती की दुसरं काही, 

पण मला त्या बाजूने विचारच करायचा नव्हता, म्हणजे या नात्याचे भविष्य काय ??
हा 
कारण मला फक्त माझा आज त्याच्यासोबत जगायचा होता 
उद्या चे कुणी पाहिले काय होईल, 

असेच एका संध्याकाळी मी मैत्रिणी सोबत बसले होते, तर दादा चा कॉल आला , 

काय ग चिऊ काय करते, 
दादा 

काही नाही मी 

तब्बेत कशी आहे, दादा 

मस्त, पण तू बोलू नको मला 
मी 

का?? 
आता मी काय केलं दादा, 


काही नाही , आई कशी आहे मी 

छान आहे, 
ये रडू बाई सांग ना मी काय केलं दादा 


त्या सुजित ला का सांगितली माझी चीड, मी 


दादा हसू लागतो ,,,,,,,,,,
तुझी चीड, अग मी प्रेमाने म्हणतो तुला चिमणी 
तू माझी चिमणी नाहीस का ?????

हो ना , पण फक्त तुझी आहे ना मग तो पण चिडवतो मला , मी 

हो का, थांब त्याची सोय बघतो दादा 

ये ..…...............
नको उगाच त्याला वाईट वाटेल मी 

दादा पुन्हा हसतो 
तू खरच वेडी आहेस मी काय 
खरच सोय बघणार नव्हतो त्याची, अग तुझी गंमत केली मी , 

बर ऐक, 
उद्या तुला घ्यायला येतोय, 
बाबा च्या मित्राची मुलगी बघायला जायचे आहे आपल्याला, 
तू, मी व सुजित 
माझ्या पायातील त्रानच गेला, सुजित चे नाव ऐकून मला वाटलं त्याला मुलगी बघायची आहे, 

मग मी कशाला येऊ 
तुम्ही दोघेच जा, 

तू कशाला म्हणजे, 
घरातील कुणी नको का???

मुलगी नेमकी कुणाला बघायची मी

अग चिऊ , मला आणखी कुणाला 
तुझ्यासाठी तर मुलगा बघावा लागेल ना , 


व तो हसू लागला माझा सगळा गोधळ झाला , नेमका मला मुलगा शोधतोय की त्याला मुलगी, 

पण सुजित सोबत राहील म्हणून मी खुश होते, 

मी लगेच वरती जाऊन उद्याची तयारी चालू केली, नेहमी ओढणी चे ड्रेस घालणारी मी या वेळी पहिल्यांदा लेगिन्स टॉप घेतले होते, 
म्हणलं तेच घालू आता, 
पण दादा असल्यामुळे हिंम्मत होईना, 
मग पुन्हा काढला आपला ड्रेस
तसेही कपड्याचे काय असते, 
एकदा मन जुळले की त्यापुढे बाकी सर्व काही फिके असते, 
दुसऱ्या दिवशी मी कॉलेज ला सुट्टी टाकली  व आवरून बसले, 
दादा,सुजित व मी मुलीच्या घरी गेलो, 


सगळी औपचारिकता झाल्यावर 
मुलीचे बाबा म्हणाले आमच्याइथे 
खुप फेमस महादेवाचे मंदिर आहे, 
तुमची ईच्छा असेल तर जाऊन या, 

तशी दादा ला मुलगी आवडली होती पण तो नाही नको म्हणाला , 


मला बघायचे आहे मंदिर 
जाऊयात ना दादा please 
मी हट्ट करत म्हणाले,


नेहमी 
,हो नाही 
हो नाही म्हणणारा दादा 
आज पटकन तयार झाला, 
त्याच्या तयार होण्यात त्याचा होकार होता, 
हे मला कळून चुकले , 

ती मुलगी ,मी, सुजित व दादा निघालो, 
दादा त्याची स्वतः ची गाडी घेऊन आला होता, 
मी येताना देखील मागेच बसले होते व सुजित पुढे म्हणून मी ,
अगोदरच माघे जाऊन बसले, 

ते तिघे सोबत च बाहेर आले दादा ड्रायव्हिंग करायला बसला,

सुजित समोर बसेल व ती माघे, 
असे वाटत असतानाच .

तुम्ही समोर बसा 
मी माघे बसतो.

व सुजित ने तिच्यासाठी दरवाजा उघडून दिला, 
याने का केले असेल असे, 
याला खरच दादा व तिला सोबत बसवायचे होते की माझ्या शेजारी बसता यावे म्हणून त्याने असे केले, 
मी या विचारानेच खुप खुष होत होते,

कसे असते ना ........

आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीचा सहवास देखील हवा हवा सा वाटतो, 
मग ती आपली असो की नसो, 
हृदयाला फक्त आवड कळते, 
आपले व परके थोडी, 
हो ना ................

काय असेल सुजित चे माघे बसण्याचे कारण?????

जाऊन घेण्यासाठी सोबत राहा, 
क्रमशः ...............…........

🎭 Series Post

View all