पाहिलं प्रेम (भाग 6) न विसरता येणारी आठवण

A love story

पाहिलं प्रेम (भाग 6) 

(माघील भागात आपण पाहिले सुजित सुनीताला गेट वर सोडतो व निघून जातो ) 

आता पुढे.........

त्याने मला गेटवर सोडले व तो दिसेनासा झाला, मी तरीही त्याला बघत बसले होते, पाय निघत नव्हते माझे पण आले रूम मध्ये 
खुप छान गेला होता माझा आजचा दिवस हृदयात बंद करून ठेवावा असा, 
तो सोबत असला की खुप भारी वाटायचे मला, 
माझे कॉलेज चालू झाले, 
घरून रोज कॉल यायचा विचारपूस करण्यासाठी 
मस्त चाललं होतं सगळं 
सुजित चा व्यवसाय होता स्वतः चा 
त्याला जास्त वेळ मिळत नसे, 
पण मी बोलावले की यायचा भेटायला, 
मी हॉस्टेल वर रुळले होते 
परीक्षा जवळ आली म्हणून अभ्यासाला देखील लागले होते, 
दोन दिवसावर पेपर होता 
मी गॅलरी मध्ये वाचत होते, तर अचानक गावाकडून मैत्रिणी चा कॉल आला आई ला हृदय विकाराचा झटका आलाय व मुंबई ला नेलंय 
मला काही कळेना 
हातातील फोन ने मी सुजित ला कॉल केला मला काय बोलावे ते देखील कळत नव्हते , 
तू ये फक्त एवढेच आठवत होते मला व पुस्तक गळून पडले, 

माझे रडणे ऐकुन  सुजित जसा होता तसाच होस्टेल ला आला, 
तो समोर दिसताच मी त्याच्याकडे धाव घेतली माहीत नाही पण मला आज त्याच्या आधाराची गरज होती, 
कुठलाही विचार न करता मी त्याच्या मिठीत सामावले, 
कदाचित चक्कर आली होती मला
पुढे काय झाले मला काही आठवेना 
शुद्धीवर आले तेव्हा हॉस्पिटल मध्ये होते व सुजित जवळ होता,

मी उठण्याचा प्रयत्न करत होते 
पण उठता येत नव्हते तर तो पटकन जवळ आला 

तुला काही हवंय का ???
मी देऊ का ??
असे म्हणाला 

मी बोटानेच पाणी दाखवले 

त्याने त्याच्या हातानेच पाणी पाजले 

तशी मी खुप आजारी नव्हते 
किंवा मला जास्त काही झालेही नव्हते 
पण त्याला काळजी घेताना बघून असेच आजारी राहावं 
व त्याने साथ द्यावी असं वाटत होतं 


मी पूर्णपणे शुद्धीवर येताच 
तो जवळ येऊन म्हणाला 
काय ग किती घाबरवलस, 
असे कुणी चक्कर येऊन पडते का ?

मी तर खुप घाबरलो होतो 
म्हणलं तुला काही झालं तर मी काय सांगू घरी 

चिमणे तू जबाबदारी आहेस माझी, 
व हसू लागला 

मी शॉक झाले 
कारण मला चिमणी फक्त दादा म्हणत होता व हे नाव दुसरे कुणाला माहीत देखील नव्हते मग हा कसा काय बोलला 
विचारू का ?? 
नाही नको पुन्हा त्याला दुसरेच काही वाटायचे 

मी विचार करतेय 
हे बघून तोच म्हणाला 
जास्त विचार करू नको 
तुझ्या दादा ला कॉल करून सांगितलं होतं तू चक्कर येऊन पडलीस म्हणून 
तर तोच म्हणाला माझ्या चिमणी ची काळजी घे 
तिला एकटं सोडू नको 

त्याचे उत्तर ऐकून माझी मीच सुखावले 
म्हणजे माझे मन कळते तर याला, 
मग माझ्या मनात काय चालू आहे हे ही कळेल का ??
परिस्थिती काय आहे आणि 
मी काय वेड्यासारखा विचार करतेय, 

आई कशी आहे 
मी म्हणाले, 

ठीक आहे 
तो म्हणाला, 

मला इथे कुणी आणले, 
मी म्हणाले, 

उडत उडत आली तू 
तो हसत म्हणाला , 

आज मी त्याला नकळत का होत नाही पण एकेरी नावाने बोलत होते, 

सांग ना मला कुणी आणले 
मला खरच काही आठवत नाहीये 
मी म्हणाले, 

मग तुला शेवटचं काय आठवत ते सांग ,
मग मी सांगतो पुढे 
तो मनमोकळे पणाने बोलला. 

मला शेवटचं तुझ्या मिठीत विसावल्याच आठवत असं थोडीच सांगू शकत होते त्याला, 
मी फक्त त्याच्याकडे बघितलं व मनातच लाजले, 
आमची एक नजर झाली व कदाचित त्याने देखील ओळखले होते मला शेवटचं काय आठवलं, 
आज त्याच्या चेहऱ्याचा रंग वेगळा होता, 
आम्ही तो विषय अर्धवट सोडून, 
डॉक्टर ने डिस्चार्ज दिला म्हणून आम्ही निघण्याची तयारी करू लागलो, 
 
होस्टेल ची वाट धरली, 
मला होस्टेल ला 
नेहमी गेट वर सोडणार तो आज हॉल पर्यंत आला, 

गोळ्या वेळेवर घे, 
पुन्हा त्रास जाणवला तर मला लगेच कॉल कर, 
काही खाऊनच गोळ्या घे, 
आणि हो आता थोडे दिवस कॉलेज ला जाऊ नको, जर मॅडम काही बोलल्या तर मला सांग मी कॉलेज मध्ये भेटून येतो त्यांना, 
तो मोठ्यामाणसाप्रमाणे सूचना देत होता, 
माझे फक्त त्याच्या चेहऱ्याकडे लक्ष देत होते,
माझे सामान व मला मावशीकडे देत 
रूम पर्यंत नीट घेऊन जा सांगून  तो दादा शी कॉल वर बोलत बोलत निघून गेला,

मी रूम मध्ये जाऊन 
त्याला बघण्यासाठी गॅलरी मध्ये आले, 
मी वरतून त्याच्याकडे बघत होते व तेवढ्यात त्याने वरती पाहिले 
पुन्हा नजरेला नजर झाली, 
मी हसून टाळून नेलं व आतमध्ये निघून आले, 

कॉट वर बसल्या बसल्या मी च विचार करू लागले त्याने का पाहिले असेल वर, 
त्याला काही जाणवले असेल का ,?
मला तो आवडतो 
हे कळले असेल का त्याला , 
आज नकळत मीच जोडले होते त्याच्याशी एक नाव नसलेलं नातं जे घट्ट केलं होतं त्या एका मिठीने 

खरच

आयुष्यात एक तरी नातं 
अस असावं
ज्याला नाव नसले तरी चालेल
अस्तित्व मात्र असावे,


ध्येयं नसले तरी चालेल 
प्रवास मात्र असावा, 

साथ नसली तरी चालेल 
जाणीव मात्र असावी, 


शब्द नसले तरी चालेल 
भावना मात्र असावी, 

त्याग नसला तरी चालेल 
ओढ मात्र असावी,

रोज बोलणे नसले तरी चालेल 
विश्वास मात्र असावा, 

अनंत नसले तरी चालेल 
जिवंत मात्र असावे 
आयुष्यात 


एक तरी नाते असे असावं, 

काय होईल या जपलेल्या नाव नसलेल्या नात्याचे, 
खरच प्रत्येकाच्या आयुष्यात अस एक तरी नातं असतंच ज्याला नाव नसते पण अस्तित्व मात्र असते, 
जे जपलं जात आयुष्यभर 
कोणत्याही अटीशिवाय 
ज्यात असतो फक्त विश्वास व प्रेम, 

जपलेल नातं टिकेल की फक्त जपूनच ठेवलं जाईल एका कोपऱ्यात, 

क्रमशः ...............


कथेच्या पुढील भागासाठी 
सोबत राहा 
धन्यवाद

🎭 Series Post

View all