पाहिलं प्रेम (भाग 5) न विसरता येणारी आठवण

A story about love

पाहिले प्रेम(भाग 5) 

( माघील भागात आपण पाहिले सुनीता तिचे बाबा व दादा गेट कडे येत होते व गेटजवळ अगोदरच कुणीतरी उभे होते) 

आता पुढे ..................

मी, बाबा व दादा जसे जसे गेटकडे येत होतो तसे तसे मनाला हुरहुर लागली होती कोण असेल ते ???
आम्ही तिथं पोहोचलो, 

हा माझा मित्र, सुजित 
व सुजित ही माझी बहिण सुनीता 
दादा ओळख करून देत म्हणाला. 

नावातच एस, एस जुळलं होत आमच्या. 
मी त्याच्याकडे बघितले ,
छान गोरा 
उंच पुरा दिसत होता तो,
त्याचे डोळे तर इतके बोलके होते की पटकन आपलेसे वाटले 
तो ही न लाजता म्हणाला 
हे बग सुनीता. 
तू नवीन आहेस 
तुला काही लागलं तर मला सांग 
मी तुझ्या दादा सारखाच आहे ना?????????? 

मी पुन्हा फक्त हो म्हणाले,
दादा सारखा आहेस पण दादा नाहीस, 
मी मनाशीच म्हणाले, 

दादा, बाबा व सुजित मला होस्टेल मध्ये जायला सांगून निघून गेले.
मी माघारी तर फिरले होते पण मन अजूनही तिथेच होते, 
तो चेहरा माझ्या नजरे समोरून जात नव्हता. 
का इतका आवडला होता तो मला 
माझ्या ध्यानी मनी मला तोच दिसत होता.
काय काम काढावं आणि त्याची मदत मागावी हाच विचार करत होते मी,
असे करत करत तीन दिवस झाले 

मी मात्र त्याच्या प्रेमात पडले होते 
पुन्हा पुन्हा मला तो आठवत होता 
तेवढ्यात दादा चा कॉल आला म्हणाला 
तू  जेवढे सामान सांगितले होते त्यातील काही त्या दिवशी मिळाले नाही. 
सुजित ला सांगतो त्याच्या सोबत जा व घेऊन ये. 

माझ्या खुशीचा ठिकाणाचा राहिला नव्हता, 
माझे मन वाऱ्याच्या वेगाने पळत होते, 
कोणता ड्रेस घालू ,
हा घालू की तो ,
त्याचा आवडता रंग कोणता असेल??????? 
त्याला कसे आवडेल ???
केस तर चार वेळा विचारून वेगवेगळ्या हेअर स्टाईल ट्राय करून झाल्या होत्या ,

शेवटी मी निळ्या रंगाचा
ड्रेस काढला 
त्याला आवडतो की नाही माहीत नाही पण माझ्यासाठी खुप लकी होता तो रंग.
मी तयार झाले तोच गेटवरील अंकल ने निरोप पाठवला 
सुनीता ला बाहेर पाठव, 

मला तशीही बाहेर येण्याची घाई च झाली होती .
मी निरोप देणाऱ्या मावशी सोबतच बाहेर आले, 
हळूहळू मी गेट जवळ आले 
तर तो समोर उभा होता 
त्याचा तो प्रसन्न चेहरा, 
वाऱ्यावर उडणारे समोरील केस, गाडीवर बसण्याची स्टाईल सगळंच वेड करत होत मला 
साधा पांढऱ्या रंगाचा शर्ट 
तोही भरीईईईईई च दिसत होता त्याला. 

चल लवकर तुला सामान आणायचे आहे ना ?????
तो म्हणाला; 

मी हो म्हणाले ,

बस, 
पॅक पकडून बस 
मी फोर व्हिलर चा ड्रायव्हर आहे ,
टू व्हिलर जास्त चालवत नाही मी 
तो प्रामाणिक पणे म्हणाला. 

मला सवय आहे 
आम्ही नेहमी बाईक वरच जातो 
मी म्हणाले, 

त्याच्या माघे बसताना 
काहीतरी जाणवत होतं 
पण त्याला काय वाटेल ,
आपण किती मूर्ख आहोत 
किती बावळट सारखे  करतेय मी 
एक ना हजार प्रश्न मनात आले. 

आणि मी जाणूनबुजून दोघांमधील अंतर वाढवले, 
म्हणलं उगाच काही सांगायचा दादा ला. 

आम्ही मार्केट मध्ये पोहोचलो .

तुला पाहिजे ते घे पैशा चा विचार करू नको तुझ्या दादा ने दिले आहेत,
 तो म्हणाला 

मी पुन्हा फक्त हो म्हणाले .

तुला बोर होतेय का ग माझ्या सोबत
 फक्त मी एकटाच बोलतोय 
तसे असेल तर साग नेक्स्ट टाईम नाही येणार सोबत,
 तो

नाही तसे काही नाही ,
ती

मी काहीच बोलत नाही हे बघून तो ही शांत झाला 

खुप वेळ झाला 
सगळी शॉपिंग झाली 
आम्ही दोघेही शांत च होतो .

मग मला आठवल दादा चा वाढदिवस आहे 
त्याच्यासाठी शर्ट घेऊयात 
मी एक शर्ट काढला व त्याला आवाज द्यायचा होता पण काय म्हणावं. 
दादा म्हणून मी स्वतः ला फसवू इच्छित नव्हते मग काय करू 
काय म्हणू
सुजित म्हणू का ???
पण ते कसे वाटेल ?
मग ओ म्हणू का फक्त 
पण ते खुप ऑड वाटेल 
मग काय करू ??
विचार करत असतानाच तो अचानक समोर आला 
व मी नकळत हातातील शर्ट त्याला लावून बघितला 
तो थोडा दचकला तो काही बोलेल तोच 
मीच बोलले दादा ला कसा दिसेल 
बसेल का त्याला नीट, 
आता त्याने सुटकेचा निश्वास सोडला व म्हणाला हो छान दिसेल, 
तुमचा फेव्हरेट कलर कोणता आहे मी सहज विचारले 
निळा तो ही सहज सांगून गेला .

रंगाचे नाव ऐकताच मी मनात खुप खुश झाले, 
आरशात मीच माझी मला पुन्हा पुन्हा बघून लाजत होते.

सगळी शॉपिंग करून आम्ही बाईककडे येण्यासाठी निघालो 
खुप गर्दी होती 
आम्ही त्या गर्दीतून मार्ग काढत होतो. 
गर्दी ला चुकवताना 
त्याचा होणारा स्पर्श 
मनाला सुखावत होता. 
मला बॅग घेऊन नीट चालता येत नाहीये हे कळताच 

घे इकडे मी बॅग घेतो 
तो म्हणाला

मी देखील बॅग पुढे केली 
जसा काय तो माझी बॅग घेण्यासाठी आला होता .

एका हातात माझी बॅग व दुसऱ्या हाताने 
मला पटपट चालण्यासाठी खुणावत होता. 

मी आपली चालले होते जिकडे वाट दिसेल तिकडे .

अचानक मी चुकीच्या रस्त्याला वळले 
ये अग तिकडे कुठे इकडे चल 
तो काळजीने म्हणाला .

मी इतकी गर्दी पहिल्यादा च बघितली होती.

आमच्याकडे फक्त गावाच्या यात्रेत गर्दी जमते ती पण या गर्दी पेक्षा कमी असते.
इथे  माणसे फक्त घड्याळाप्रमाणे चालतात .
मी गर्दी बघून बावरले हे कळताच त्याने हात पकडला व घाबरू नको मी आहे. 

मनाला एक आधार वाटला 
अचानक विजेचा झटका बसावा अशी मी भानावर आले. 

त्याने मला हॉस्टेल ला सोडलं 
व कधी पण काही गरज लागो निसंकोच कॉल कर व काळजी घे 
म्हणून तो निघून गेला 
मी त्याच्या पाठमोऱ्या प्रतिकृती कडे बघत बसले 
मन तर केव्हाच त्याच्या माघे गेलं होतं वेध घेत 

क्रमशः ..........................


बघताच क्षणी कुणाचं होणं मग हे प्रेम की आकर्षक ??????
जर मनाला बंध नसेल कोणतेही
 मग प्रेमाला का असावे ???
निखळ मनाने केलेलं प्रेम पोहोचेल किनाऱ्यावर की या भावनेच्या डोहात बुडून गुदमरेल 
जाणून घेण्यासाठी 
सोबत राहा व मला फॉलो करा 

धन्यवाद

🎭 Series Post

View all