Login

पाहिलं प्रेम (भाग 4) न विसरता येणारी आठवण

A story about love

पाहिलं प्रेम (भाग 4)

(आपण माघील भागात पाहिलं की दिव्या तिच्या आई ला समजावत असते की मी तुमच्यासाठी माझ्या प्रेमाचा त्याग करत आहे )

आता पुढे .............

दिव्याचे बोलणे ऐकून मी तर शुध्द च हरपून गेले.
माझे लेकरू इतके मोठे 
इतके समजदार कधी झाले.

मी तिला पोटाशी कवटाळून रडू लागले 
तिने माझे डोळे पुसले. 
व म्हणाली आई तू please रडू नको ना ग  
मी तुमच्या मनाविरुद्ध काहीच नाही. करणार विश्वास ठेवा ग माझ्यावर please 
मी तुला मला जन्म दिल्याचा पाश्छताप कधीच नाही होऊ देणार. 

मी तिला पुन्हा कडकडून मिठी मारली 
आणि म्हणाले माहीत आहे ग बाळ मला तू कधीच नाही चुकणार.

पण तिला कसे सांगू की पहिल्या प्रेमाचे चटके काय असतात. 
माणुस पाहिलं प्रेम कधीच विसरत नाही 
आणि मला माझ्या लेकीचं भविष्य कळून चुकलं होत तिला कितीही त्रास झाला तरी ती शब्द बोलणार नाही.
तिला कितीही आठवण आली 
तरीही ती सांगणार नाही पण मनाचे काय ते तर वेध घेतच राहील त्या चेहऱ्याचा जो जडलाय या हृदयात. 
कधी वास्तवात तर कधी स्वप्नात 
कधी नजरेने तर कधी मनाने 
व झालीच कधी आठवण अनावर
 तर डोळ्यावाटे त्याला वाट मोकळी करून देणार. 
हेच सत्र आयुष्यभर चालत राहणार.

आज मी दिव्या च्या बाबतीत न्यायाधीश झाले होते. 
दुसऱ्याला दोषी ठरवण्यासाठी स्वतः निर्दोष असावं लागतं.
मग मी त्या पात्रतेची होते का??

आज मला दिव्याची वाटणारी काळजी 
तिची जाणवणारी तगमग 
तिची अवस्था
ती त्या मुलाला आयुष्यभर विसरू शकणार नाही हा विश्वास.

हे एका आईचे मन होते 
की 
सम दुःख ?????

आता भावनांनी माझ्याच मनात गोधळ माजवला.
आज काही झालं तरी मी दिव्या ला एकटीला झोपू देणार नाही हा मी मनाशी निर्धार केला होता. 

आमच्या दोघीची ताट 
हातात घेऊन 
मी पुन्हा येते दरवाजा लावू नको 
असे दिव्या ला सांगून मी किचनकडे निघाले. 

किचन मधील 
सर्व आवरून मी यांच्याकडे गेले. 

अहो मी आज दिव्या सोबत झोपू का??
,असे घाबरत च विचारले. 

हो झोप 
पण फक्त झोपू नको 
लेकीच्या डोक्यात काही प्रकाश पाडता आला तर बघ
ते रागा नेच म्हणाले 

मला त्यांच्या अशा टोचून बोलण्याची सवय होती. 
ते नेहमीच माझे माहेर व माणसे यांच्याबद्दल असे बोलतात 
त्यात नवीन काही नव्हते.


मी त्यांच्याकडे लक्ष न देता दिव्या च्या रूम मध्ये गेले.
रूम मध्ये तर आले होते 
पण नेमकं तिच्या सोबत बेड वर झोपावं की मी खाली झोपू 
आज मला इतके प्रश्न का पडत होते 
मीच तिचा जास्त अवघडल्या सारखे तर नाही वागवत आहे ना 
छे छे .........
मी काहीही विचार करते 
तेवढ्यात दिव्या म्हणाली 
आई ये ना झोपायला 
तिने तिच्या शेजारी जागा दिली 
मी शांतपणे जाऊन झोपले 

बेड वर पडल्या पडल्या दिव्या पटकन झोपी गेली 
पण मी आणखी त्या शब्दासोबतच होते 

आई खुप आठवण येते ग त्याची.

आठवणी या अशाच असतात 
आयुष्यात माणूस पुढे निघून जातो पण आठवणी पुढे नाही नेता येत 
त्या फक्त आठवतात 
वेळी अवेळी ...........

माझे विचारचक्र चालू असतानाच डोळ्यांची कड ओलावली नकळतपणे
व मी भूतकाळात रमले ................

10 वीची परीक्षा चांगल्या मार्क्स ने पास झाले होते. 
घरात सगळीकडे आनंदी आनंद होत माझ्या खानदनातील पहिली मुलगी मॅट्रिक पास झाले होते. 
बाबा तर जो दिसेल त्याला सांगत होते पोरगी मॅट्रिक पास झाली. 
आई ने गोडाधोडाचे जेवण केलं 
आणि माझा थाट तर विचारूच नका आज जग जिंकल्याची अनुभूती येत होती 
सगळं कसं मस्त झालं होतं.

आता पुढे काय ?????

गावात चौथी पर्यंत शाळा 
पुढील शिक्षण बाजारगावी 
पण तिथेही फक्त मॅट्रिक पर्यंत शाळा होती जर पुढे शिकायचे असेल तर शहरात जावे लागेल.
मग पुन्हा हजार प्रश्न 
मुलगी आहे 
एकटीला कशाला पाठवायचे 
लोकांच्या वाईट नजरा 
नातेवाईक काय म्हणतील 
बोलणारे तोंड हजार 
पण बाबा नि सांगून टाकले 
काही होत नाही 
पोरगी शिकायचं म्हणते तर शिकू देऊ व दोन तर वर्षाचा प्रश्न आहे 
कुठे आयुष्यभर शिकणार आहे.

एकमताने तालुक्याला ठेवायचे ठरले 
मग आता पुन्हा रूम की होस्टेल.

दादा ने स्वतः ला पोरी बघताना इतकी काळजी नसेल घेतली इतकी तो मला रूममेट बघताना घेत होता 
सगळ्या पाहुण्यांना 
त्यांच्या मित्रांना कॉल करून विचारपूस करून झाली पण पाहिजे तशी रूम कुठेच मिळेना.

शेवटी दादा चा मित्र होता सुजित 
तो म्हणे माझ्या घराजवळ एक मुलीचे होस्टेल आहे.

येऊन बग तुला आवडते का ???
दादा स्वतः जाऊन हॉस्टेल बघून आला त्याला खुप आवडले. 
मग माझी रवानगी त्या हॉस्टेल ला 
करण्याचे ठरवण्यात आले. 

मी माझे सगळे आवरून बाबा व दादा सोबत हॉस्टेल वर पोहोचले. 
घरापासून दूर राहणे हा माझा पहिलाच अनुभव होता.

माझे सामान हॉस्टेल ला ठेऊन दादा मला व बाबा ना गेट वर घेऊन आला. 
आम्ही येण्यापूर्वी च तिथे कुणीतरी उभा होते कोण असेल ते.
मनात प्रश्न पडला 
आम्ही जसे जसे जवळ आलो तसा तसा माझ्या मनात गोधळ माजला. 

क्रमशः ................


कोण असेल ती व्यक्ती 
काय काम असेल तिचे यांच्याकडे जानून घेण्यासाठी सोबत राहा
व मला फॉलो करा

🎭 Series Post

View all