पाहिलं प्रेम (भाग 3) न विसरता येणारी आठवण

A story about love

पाहिलं प्रेम (भाग 3)

(माघील भागात आपण पाहिले दिव्या चे बाबा व आजी तिचे शिक्षण बंद करणे या निर्णयावर आले होते )

आता पुढे ..................

रमा भाजून टाक पोरीला 
आई चे हे शब्द, 
माझ्या काळजात कट्यार सारखे गुसले.

कसे असते ओ स्त्री चे आयुष्य 
तिच्या आयुष्यातील निर्णय तिला कधी घेऊ  दिले जातील, 
लग्न असो की शिक्षण सगळं आई वडील ठरवतात.
अजूनही खुप मुलींना तिचा होणारा नवरा आवडला की नाही हेही विचारले जात नाही. 
मलाही विचारले नव्हते तो भाग वेगळा 
पण तो काळही वेगळा होता व आत्ता चा वेगळा आहे. 

आज माझी परीक्षा होती 
आई, 
पत्नी, 
सून ,
या सगळ्या भूमिका एकत्र निभवायच्या होत्या, 

मी सगळ्यांना जेवायला वाढले आणि दिव्या चे व माझे ताट घेऊन तिच्या रूम कडे निघाले 

अगोदर आम्हाला जेऊ घाल
 मग जेवा मायलेकी सावकाश 
तशीही लेक झेंडा लावून आलीये 
आई म्हणाल्या.

तसे आई नि मला कधी कुठल्याही गोष्टी ला आडवे लावले नाही 
पण दिव्या च्या बाबतीत त्यांचे अंदाज नेहमी चुकीचे असतात 

मी त्यांचे सगळ्यांचे जेवण होईपर्यंत
तिथेच थांबले 
मनात खुप कालवाकालव चालू होती पण मी ती दाखवू शकत नव्हते

त्यांचे जेवण झाले 
मी सगळे आवरून ठेवले आणि माझे व दिव्या चे ताट घेऊन तिच्या रूम कडे निघाले 
मी शब्दात सांगू शकत नाही मी किती खुश होते 
नेमकं काय खर काय खोटं हे आता मला कळणार होते 
मी झपझप पाऊले टाकत तिची रूम गाठली 
रूम बाहेर उभा राहून मी आवाज दिला 
मी आवाज थोडा हळू च दिला 
बाकीचे झोपण्यासाठी गेले होते म्हणून 
पण हळू आवाजाने दिव्या काही दरवाजा उघडेना 
माझे हात गुंतलेले असल्यामुळे मी दरवाजा वाजवू ही शकत नव्हते 

मी पुन्हा आवाज दिला 

ये बाळ उघड ना ग दरवाजा 
तुला माझी शपथ 

आता मात्र दरवाजा उघडला गेला 
मी रूम मध्ये प्रवेश केला 
रूममधील प्रत्येक वस्तू जागेवर होती म्हणजे दिव्या तेव्हापासून फक्त एका च जागी बसली असावी असा मी अंदाज लावला 

चल जेवण करून घे 

बाबा जेवले का ग ? 
दिव्या प्रश्नार्थक नजरेने म्हणाली 

हो सगळे जेवले 
व तू पण जेऊन घे 
मी समजावून सांगत बोलले 

मी दोघींना जेवणाचे ताट घेतले 
व त्यापूर्वी चल तुझ्या कानात औषध टाकते 
म्हणून 
तिच्या जवळ गेले 
मी जवळ जाताच ती थरथर कापायला लागली तिला शब्द फुटत नव्हते पण तिचे डोळे खुप काही बोलत होते 
मला देखील खुप प्रश्न विचारायचे होते पण तिची अवस्था बघून मी शांतच राहिले 
कोण असेल तो मुलगा 
कुठे भेटला असेल 
जात कोणती असेल 
व दिव्या चे पुढचे पाऊल काय असेल 
हे व असे खुप काही 

आम्ही दोघीनि जेवनाला सुरवात केली 
दोघीचेही जेवणाकडे लक्ष नव्हते पण जेवायचे म्हणून जेवत होतो 

माझे विचार सत्र मात्र चालूच होते 
विचारू का ????
की नको 
ही वेळ नाही 

माझ्या चेहऱ्यावरील भाव दिव्या ने ओळखले बहुतेक व म्हणाली 
आई मला बोलायचे आहे तुला 

मला आनंद झाला 
बोल ना ग राणी 
मला पण खुप बोलायचे आहे तुला पण कसे बोलावे कळेना 
मी थोड चाचरत च बोलले
आई तुला माझा राग आला का ग 
पण आई मी चुकले नाहीये 
व मला चुकायचे देखील नाहीये 
मला कळतंय 
आपल्या घरातील परिस्थिती कशी आहे मुलीच्या शिक्षणाच्या बाबतीत 
बाबा व आजी चा तुला होणारा त्रास तो देखील मला माहित आहे 
त्यांनी तुला माझ्यामुळे सतत घालून पाडून बोलावं हे देखील मला आवडत नाही 
मला सगळं कळतंय ग आई 
तुझी घालमेल 
तुझी तळमळ 
तुझं माझ्यावरील प्रेम 
तू मला दिलेलं स्वातंत्र्य 
पण मी काय करू ग आई 
सुजित चा विचार च डोक्यातून जात नाही जितकं त्याला विसरेन म्हणते तितका तोच आठवतो 
आता तर मला स्वतः ची च लाज वाटतेय 
असे काय आहे त्याच्यात की मी तुमचे 20 वर्षाचे प्रेम विसरले 
तो दिसला की अचानक ओढली जाते मी त्याच्याकडे 
त्याच्याशी बोलताना मला जगाचे भानच राहत नाही 
मी माझीच राहत नाही ग आई 
मला बाबा ना तुला आजी ला कुणालाच दुःख वायचे नाही व मी त्याला पण विसरू शकत नाही 
कधी तर वाटते 
स्वतः ला च संपवावे मग सगळे प्रश्न सुटतील त्याच्या आठवणी, तुला होणारा त्रास,माझी घालमेल 
व त्याच्यात अडकलेला स्वास सगळं संपेल. 
ती बोलत होती व मी ऐकत होते माझ्यासाठी हे खुप वेगळं होत 
माझं हे पिल्लू कधी इतकं मोठं झालं आणि या प्रेमाच्या आगीत होरपळून निघालं मलाच कळलं नाही.

क्रमशः ............…

प्रेम करण जेवढं सोपं असते त्यापेक्षा हजार पटीने ते विसरणं 
पण प्रेम विसरण्यासाठी आयुष्य संपवणे हा मार्ग कितपत योग्य आहे 
जो स्वतः च्या आयुष्यावर प्रेम करू शकत नाही तो दुसऱ्यावर काय करणार 
काय असेल,
दिव्या च्या आयुष्यात पुढे संपेल अडकलेला शेवटचा स्वास 
की मिळेल त्याला नवीन वाट 

जाणून घेण्यासाठी सोबत राहा माझ्या व मला फॉलो करा.
धन्यवाद

🎭 Series Post

View all