पहिलं प्रेम भाग २(भूतकाळात डोकावताना)

प्रेम की आकर्षण


आठ वर्षांपूर्वी...
विक्रांत... पोपटी रंगाचा शर्ट आणि लाईट ब्राऊन कलरची पँट.. फॉर्मल ड्रेसिंग मधेच होता. जिम करून कमावलेली फिट बॉडी..सिल्की केस.. ज्यावर डावा हात सारखाच जात होता.. जणू हाताला केसांवाचून आणि केसांना हातावाचून करमेचना.. एक हात केसांवर सेट करण्यात बिझी तर दुसरा मोबाईल चाळण्यात.. घाईतच होता तो. वाऱ्याच्या वेगाने आला आणि तिच्या बाजूने निघूनही गेला बहुतेक त्याची वाट बघत असलेली राणी त्याला न घेताच निघून जाण्याचा तयारीत होती आणि याला तिला जाऊ द्यायची नव्हती. (म्हणजे त्याची नेहमीची लोकल..)

त्याच्या पर्फ्युमचा सुगंध त्याच्या मागे तिच्या मनात दरवळू लागला होता. गेले दोन महिने एकाच वाटेवरून जात होती पण तेंव्हा हा दिसला नाही आणि नेमका आज दिसला म्हणजे नवीनच रहायला आला असेल बहुदा... ती मनातच स्वतःला प्रश्न विचारून उत्तरही स्वतःच देत होती. तो मात्र मनातच होता.

पंधरा दिवस..गेले पंधरा दिवस ती रोज तो यायच्या आधीच तिथे पोहोचायची आणि दुरूनच त्याला पाहून मग पुन्हा चालू लागायची.. थोडावेळ जास्त पाहता याव त्याला म्हणून तो जवळ येऊ लागला की चालण्याचा स्पीड ती कमी करायची. कधीच चुकीच्या गोष्टी न करणारी त्याच्या रूपाच्या मोहात अडकु पाहत होती. शेवटी एक दिवस तिने गुलाबाच फुल घेतल आणि तडक त्याला जाऊन भिडली.

"एक्सक्युजमी..." ती

"येस.."तो

"थोडा वेळ आहे का?मला बोलायचं होत!"ती

"हा बोल ना.."तो

"आर यू मॅरीड?"ती

"नो..."तो

"मग...तुझी गर्लफ्रेंड वैगरे आहे का?"ती

"न..नाही; का?"तो

"तुझ नाव..." तिने अडखळतच विचारलं."ती

"विक्रांत..."तो

"ओके..विक्रांत.. मला तू आवडतोस.." तिने एकादमात बोलून टाकल.." ती

"ओके....आपण यावर उद्या बोलू ठीक आहे. आता माझी ट्रेन मिस झाली तर उशीर होईल."तो

"ओके... "ती

"ओके..बाय.."तो

"बाय..."ती
तो गेला आणि ती मात्र स्वतः च्या मूर्खपणावर कधी हसत होती तर कधी तू हे काय केलस म्हणून डोक्यावर हात मारून घेत होती. त्याच्यासाठी आणलेलं गुलाबाच फुलही तिने त्याला आवडतोस अस सांगून देऊन टाकल होत. आता तर तिला खूप एम्बरिस वाटू लागत होत. पण या सगळ्याचा आता काय उपयोग.. म्हणून ती तिच्या क्लास साठी निघून गेली.

दुसऱ्या दिवशी ती नेहमीपेक्षा लवकरच आली पण आठ वाजूनही गेले होते पण तो काही दिसला नाही. मनातच गोंधळ चालु झाला .. शिट उगाच बोलले.. नसते बोलले तर बर झालं असतं निदान दिसला तरी असता. मूर्ख...निव्वळ मूर्खपणा केलाय मी काल... अस स्वतःलाच ती सारखं सारखं म्हणून घेत होती.

********************
"काय ग...अशी काय डोक्यावर मारून घेतेस!" मनीष.. सौम्याला मागून मिठीत घेत बोलला.

"अं...काही नाही असच काहीतरी आठवलं..."सौम्या गडबडत बोलली.

"बर, चल आता आराम कर जरा.. मग संध्याकाळी मस्त फिरून येवू आणि मग केक कटिंग करू.."मनीष

"हो चल.."सौम्या..
क्रमशः...
@श्रावणी लोखंडे...



🎭 Series Post

View all