Sep 25, 2020
प्रेम

पहिलं प्रेम (भाग 26) न विसरता येणारी आठवण

Read Later
पहिलं प्रेम (भाग 26) न विसरता येणारी आठवण

पहिलं प्रेम (भाग 26) 

( माघील भागात आपण पाहिले सुजित व सुनीता बीच वरती होते) 

आता पुढे ...........

सूर्याची ती कोवळी किरणे, 
पाण्याचा तो आवाज, 
त्याच्या पाऊलखुणा व त्यात अडकलेल माझं मन 
सगळंच विलक्षण होत, 

आज माझी सगळी स्वप्न पूर्ण झाली होती, 
ती इतक्या लवकर होतील असे वाटले देखील नव्हते, 

तिथे जवळ असलेल्या बाकावर आम्ही बसलो, 
मी त्या शांत वाटणाऱ्या पाण्याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करत होते,

त्याप्रमाणे सुजित च्याही मनात खुप काहितरी चालू होते पण काय ते कळायला मार्ग नव्हता,

आता हा असाच गप्प राहणार हे मला माहित होतं म्हणूनमी देखील गप्प राहण्याचा निर्णय घेतला तितक्यात तो बोलू लागला, 

सुनीता आता मी जे सांगतोय ते शांतपणे ऐक,

त्याप्रमाणे सुजित च्याही मनात खुप काहितरी चालू होते पण काय ते कळायला मार्ग नव्हता,

आता हा असाच गप्प राहणार हे मला माहित होतं म्हणूनमी देखील गप्प राहण्याचा निर्णय घेतला तितक्यात तो बोलू लागला, 

सुनीता आता मी जे सांगतोय ते शांतपणे ऐक,
मी खुप लहान होतो बाबा आम्हाला सोडून गेले मग बाबा चे
प्रेम काय असते हे मी नाही अनुभवले, 
माझा सांभाळ आई नेच केला, तिने च मला आई व बाबा ची माया लावली, 
मला कुणी मित्र/मैत्रीण देखील नव्हत्या, 

पण तू माझ्या आयुष्यात आलीस 
आणि माझे आयुष्य च बदलून गेले,
तुझ्यामुळे मी जगायला शिकलो एकटं राहणारा मी मित्रा मध्ये रमू लागलो, 

खुप बदल झाले माझ्यात जे मला आयुष्य जगायला मदत करतील, 

पण तू हे सगळं आता का सांगतोय, मी म्हणाले, 

त्यालाही कारण आहे, 
असे म्हणून तो शांत झाला, 
काय कारण असेल बर, 
मी विचार करत बसले, 

 

आणि तो बोलू लागला, 
काल तुझ्या दादा चा कॉल आला होता, 
आमचा खुप जवळचा मित्र तुला रविवारी बघायला येणार आहे, 
  रमाकांत  नाव आहे त्याचे, घरी खुप चांगले आहे व त्यांने तुला बघितलेलं आहे, फक्त औपचारिकता म्हणून तुला रविवारी बघणार आहे, 
त्याच्या डोळ्यात ले पाणी आज त्याला लपवता आले, नाही त्याला पुढे शब्द सुचेना, 
तो फक्त खुश राहा म्हणून शांत झाला, 


मी अजूनही त्या पाण्याकडे च बघत होते त्याच्या चेहऱ्याकडे बघण्याची हिम्मत होत नव्हती माझी, 
नेहमी छोट्या छोट्या गोष्टी वर गंगा यमुना वाहणारी मी आज शांत होते, 
डोळ्यातून एकही थेंब न काढता
मी बोलू लागले, 
अरे वेड्या सारखे काय करतोस,
विसरलास एक कमिटमेंट केली होती आपण, 
आपले नातेच नाव नसलेले होते रे मग त्याला अस्तिव कसे असेल, 

प्रेम म्हणजे तू माझा च व्हावे असे नाही, तर जिथे राहशील तिथे सुखात राहा, 

मला इतके समजदार झालेले बघून तो देखील सावरला, 

चल निघुयात, मी 

हो , तो 

आम्ही घरी आलो, 
एका रात्रीने आयुष्य बदलून टाकले होते, 

दुसऱ्या दिवशी सगळे आवरून मी तयार झाले, 
आई चा निरोप घेऊन आम्ही निघालो, 

किती कमनशिबी आहे ना मी, 
मी पहिला असा मुलगा असेल जो स्वतः च्या प्रेमाला मुलगा बघण्यासाठी घेऊन जात असेल, 

मी फक्त हसले, 
आता त्याला काय सांगणार होते, 
अरे तू जे करतोय ते मला कधीच जमले नसते व पुढेही जमेल की नाही माहीत नाही, 

शरीरावर अधिराज्य गाजवणारे हजार मिळतील पण मनाचे काय ते तर तुझाच शोध घेत राहील
आयुष्य भर, 

मी प्रॉमिस करते मागे काढून वळून बघणार नाही पण आठवणीतले हे क्षण विसरू देखील शकणार नाही, 

मला आयुष्य लागले स्वप्न बघायला आणि तू एका रात्रीत ती सगळी पूर्ण केलीस, 
मी आज पूर्ण झालेय, 
तुझ्या प्रेमाच्या सहवासाने, 
हे नाते अनंत राहील असेच चिरकाल टिकणारे, 


तुझ्या आठवणी 
सदैव राहील सोबत 
तू नसताना या 
हृदयात जपत 


तुझ्या विचाराने हृदय 
हे कासावीस होत 
हक्क नसताना देखील 
तुझच होऊन बसत 


बघेल कधी परतोनी 
मी तू येत ध्यानी 
तू सतत हसत राहावं 
हीच ईच्छा मणी 

मनात विचार चालू होते व ओठावर मी गप्प 
माहीत नाही इतकी शक्ती कुठून
आली होती माझ्यात 

नाव नसलेल्या नात्याचा शेवट पटलाय , 
 पण
 रुचेल का मनाला, ???


जाणून घेण्यासाठी सोबत राहा,

Circle Image

Geeta Suryabhan Ughade

Teacher

नमस्कार मी गीता उघडे M.A(english) मी व्यवसायाने शिक्षिका आहे .व 10 वर्षांपासून लेखन क्षेत्रात काम करते , मला लेखन करायला खुप आवडते विशेषतः समोरच्याच्या मनाचा वेध घ्यायला त्यामुळे जास्तीतजास्त कथा माझ्या या जीवनाशी निगडित असतात, ज्या कधीतरी कुणीतरी अनुभवलेल्या असतात, वाचून बघा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा Attitude नाहीये माझ्यात फक्त स्वाभिमानाने जगायला आवडते मला,