Sep 25, 2020
प्रेम

पहिलं प्रेम (भाग 24) न विसरता येणारी आठवण

Read Later
पहिलं प्रेम (भाग 24) न विसरता येणारी आठवण

पहिलं प्रेम (भाग 24)

(माघील भागात आपण पाहिले सुनीता व सुजित त्या हिरव्यागार लॉन वर चालत होते) 

आता पुढे ..................


तेवढ्यात त्यांना आकाशात एक तारा तुटताना दिसला, 

तुटत्या ताऱ्याकडे जे मागितले ते मिळते,

असे मी ऐकले होते पण सुजित चा यावर विश्वास असेल असे नव्हते वाटले, 

तो तुटणारा तारा 
व त्याच वेळी डोळे बंद करून 
काहीतरी मागणारा माझा तारा दोन्ही ही आज माझ्यासाठी स्वप्न पूर्ती करणारे च होते,


मला नव्हतं वाटलं तुझा या सगळ्यावर विश्वास असेल, मी 

का???
यात विश्वास न ठेवण्यासारखे काय आहे, तो 


विश्वास ठेवावा असे देखील काही नाही, मी 

तुम्हा मुली चे असेच असते तुम्हांला प्रत्येक गोष्टी चे लॉजिक लावायची खुप घाई असते,
 मग तो माणूस असो की त्याचे मन, 
त्याच्या भावना असो की त्याचा स्वभाव, 
आपल्या मनानेच समोरच्यावर लेबल लावून मोकळे होता, 
पण समोरच्याचा विचार केला का??
 कधी, 
त्याच्या मनाचा झालेला चुरा तो कसा बसत असेल नेहाळत ,

अग तुम्ही मुली पाहिजे ती गोस्ट हट्टाने माघू शकता, 
नाही काही तर डोळ्यातून भावनांना वाट तरी मोकळी करून देऊ शकता पण आमचे काय ग, 

जिथे पानावलेल्या डोळ्यात कचरा गेला म्हणून पाणी लपवाव लागत, 
याच दुःख कसं सांगू ????

खुप ईच्छा असून देखील दूर जावं लागतं, 
मनात वादळ माजलेल असताना चेहऱ्यावर हास्य ठेवावं लागतं, 
खुप प्रेम असताना देखील प्रेम नाही हे दाखवावं लागत, तो खुप भावनिक झाला होता आता, 


अरे देवा याला काय झालं , 
म्हणजे याला रडता देखील येत 
हे आज पहिल्यांदा अनुभवलं होत मी, 

चूप रे काही पण नको बोलू, मला कळते तुझी भावना, 
बर ते जाऊ दे 
तू आता काय माघीतल त्या ताऱ्याकडे सांग ना, मी 

काही नाही 
सोड , तो 


पकडलय कुठे सोडायला, मी त्याचा मूड ठीक करण्यासाठी म्हणाले, 


पकडू पण नको, 
तुलाच त्रास होईल, तो 

काय यार,
 मी याचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करतेय व तो आहे की आणखी बिघडतोय, 
काय करू बर , मी 


मी माझी च विचारमग्न होते व तो मधेच बोलू लागला, 

सुनीता प्रेम म्हणजे एक अशी भावना असते जी कधीच संपत नाही, 
ते ठरवून नाही होत अग आपोआप होत, 

प्रेम म्हणजे विश्वास, 
प्रेम म्हणजे आधार 
प्रेम म्हणजे दोन जीव व त्यांचा जडलेला स्वास एकमेकात, 
प्रेमाला कुणी संपवू शकत नाही ते निरंतर असते हृदयात, 

एकादी व्यक्ती आपली असणे, तिचा प्रत्येक क्षण आपला असणे, 
ही भावना च खुप छान असते, 
कुणीतरी आपली वाट बघतय 
फक्त आपली,
 ही ओढ खुप विलक्षण असते, परंतु प्रत्येक प्रेमाला किनारा मिळतोच असे नाही काही फक्त आठवण्यासाठी 
असते एकटे असताना 
 डोळ्यातील पाणी हाताने टिपताना, 
प्रेमात जग सुन्दर दिसते फक्त आयुष्यात प्रेम असावे, 
तशी तू माझ्या आयुष्यात आलीस, 

प्रेमाला कुठल्याही मर्यादा नसतात किंवा बंधने देखील नसतात, 
बंधने असतात तर ती प्रेमातील नात्याला जे आपण जोडलेले असते,

त्याचे बोलणे मधेच तोडत मी म्हणाले, 
म्हणून तर आपण जोडले
 नाव नसलेले नाते, 
कुणालाच त्रास नको 
फक्त हे जे क्षण मिळालेत ते भरभरून जगू, 
आयुष्यात काही तरी राहिले असे नको वाटायला हो ना , 


हो , पण या क्षणाला  देखील मर्यादा आहेतच की, तो 

असेल तेव्हा असेल ना 
तू का सतत तेच ते सांगतोय, मी  चिडून म्हणाले, 

तुझ्या चिडण्याने वास्तव बदलणार आहे का, तो 

नसेल ही बदलनार पण तू नको ना पुन्हा पुन्हा आठवण करून देऊ परके पणाची, 

जे क्षण मिळालेत तेच जग ना 
नाही काही तर आठवणी तरी राहतील, मी 

हो , डोळ्यात वेळीअवेळी पाणी आणायला, तो चेहरा पाडून म्हणाला, 

मी फक्त बघत होते त्याच्या त्या निरागस चेहऱ्याकडे .......

असतात का प्रेमातील आठवणी इतक्या गोड की त्या सतत आठवतात?????

मग जर गोड असतात तर डोळ्यात पाणी का आणतात????

मुळात डोळ्यात येणारे प्रत्येक अश्रू दुःखा चे च असतात का ???
की कधी  कधी आनंदही ओसंडून वाहतो या अश्रुत 

काय असेल सुजित च्या डोळ्यातील पाण्याचे कारण??

जाणून घेण्यासाठी 
सोबत राहा 
आवडल्यास लाईक करा, 
धन्यवाद

Circle Image

Geeta Suryabhan Ughade

Teacher

नमस्कार मी गीता उघडे M.A(english) मी व्यवसायाने शिक्षिका आहे .व 10 वर्षांपासून लेखन क्षेत्रात काम करते , मला लेखन करायला खुप आवडते विशेषतः समोरच्याच्या मनाचा वेध घ्यायला त्यामुळे जास्तीतजास्त कथा माझ्या या जीवनाशी निगडित असतात, ज्या कधीतरी कुणीतरी अनुभवलेल्या असतात, वाचून बघा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा Attitude नाहीये माझ्यात फक्त स्वाभिमानाने जगायला आवडते मला,