पहिलं प्रेम ( भाग 22)
(माघील भागात आपण पाहिले सुनीता ला सुजित ची प्रत्येक गोस्ट आवडत होती)
आता पुढे ............
आता मी पूर्णपणे बरी झाले होते, त्यांच्या घरात स्वतः चे घर समजून वावरत होते,
प्रत्येक काम मी आवडीने करायचे
तुझ्यामुळे घराला घरपण आले, अस आई नेहमी म्हणायच्या,
सुजित ची वाट बघणे
त्याच्यासाठी जेवायला थांबणे
त्याला काय हवं नको ते बघणे
यात माझा वेळ कसा निघून जात होता , माझे मलाच कळत नव्हते,
एक दिवस मी रूम मध्ये असताना, बाहेर कुणीतरी चकरा मारत असल्याचे जाणवले, मी जवळ जाऊन बघितले तर सुजित होता,
का रे झोप नाही येत,
कसले टेन्शन आहे का??
तो काहीच बोलला नाही,
मी तुझ्याशी बोलतेय,
काही नाही ग,
असेच सहज, तो टाळत म्हणाला,
तो काहितरी लपवतोय
हे माझ्या लक्षात आले होते
पण मी देखील त्याला काही कळू न देता त्याच्या जवळ जाऊन बसले,
मला नाही सांगणार,
मी
तू पण ना माघेच लागते,
बर ऐक ना तुला चांदण्या रात्रीत लॉंग ड्राइव्ह वर जायचे होते ना ,
विषय बदलू नको
मुदययाचे बोल,
तुला काय झालं कळेल का???
व ही चांदणी रात्र कुठून आली मध्येच , मी
मध्येच काही नाही
चल आपण जाऊयात,
सुजित
वेडा आहेस का??
आई काय म्हणतील
मी बोलतो आई सोबत
तू तयार हो, सुजित
मी तशीच उभा होते,
तू नाही ऐकणार
थांब अगोदर आई ला सांगून येतो,
मग येशील तू,
तो आई कडे गेला,
इकडे माझे ठोके वाढले
काय सांगेल हा आई ला,
आई मान्य करतील का??
याला सगळा खेळच वाटतो,
आई कशा परवानगी देतील,
मी विचार करत होते,
तोच आई व तो दोघेही सोबत बाहेर आले,
त्याच्या व आई च्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते,
बग म्हणालो होतो ना , आई जा म्हणेल, सुजित
जा ग, हा माझा तुझ्यावरील विश्वास सांगतोय, आई
इतक्या सहजासहजी परवानगी मिळेल हे माहीत नव्हते मला,
मी पटकन आतमध्ये गेले व तयार होऊन आले,
आता रात्री बाहेर जायचे म्हणल्यावर मी मोठ्या गाडी जवळ जाऊन उभी राहिली,
तोच
त्याने आवाज दिला
ये वेडे इकडे ये ,
बाईक घेऊन तो उभा होता
अरे वा .............
म्हणजे आपण बाईकवर जाणार, मी उत्सुकतेने म्हणाले,
नाही ढकलत ढकलत घेऊन जाऊ, तो हसत म्हणाला,
आता बाईक घेऊन तुझ्यापुढे उभा आहे म्हणल्यावर बाईकवर च जाणार ना, काहीपण विचारतेस,
तो पुन्हा हसू लागला,
हो घे हसून,मी
आता तो काहीतरी पुटपुटला पण मला ऐकायला आले नाही,
काय म्हणत होता ते,
मी म्हणल जाऊ दे याचे नेहमीचे असते,
असे म्हणून आम्ही निघालो,
सगळीकडे अंधार मधेच येणारा तो रातकिड्याचा आवाज, अचानक एखादा काजवा चमकायचा दूर,
आणि बाईकवर आम्ही दोघे,
ती रात्री भटकण्याची मजा काही वेगळी होती,
मी यापूर्वी कधी सात च्या पुढे अशी रस्त्याने कधीच नव्हते गेले, माझ्यासाठी हा अनुभव खुप विलक्षण होता,
आता घरापासून बरेच अंतर आलो होतो आम्ही ,
मी दूर बघितले तर आता त्या निर्मनुष्य रस्त्यावर लाईट दिसत होते,
ते वेगवेगळ्या रंगाचे लाईट दुरूनच मनाला मोहिनी घालत होते,
वाव ,,,,,,,,,,,,किती छान .........
काय आहे ते
ये सुजित आपण जाऊयात ना तिकडे
Plz plz plz
मी कधीच नाही पाहिले असे काही,
जाऊयात ना ....
मी चालू गाडीवर त्याचा हात ओढून हट्ट करत होते लहान लेकराप्रमाणे,
अग हो हो
हळू
पडू आपण दोघे पण
जर तुला ते दाखवायचे नव्हते
तर कशाला आणले असते मग मी , तो म्हणाला
ये हो
Thank you so much,
L u
मी खुशीत नकळत म्हणून गेले,
आता तो शांत झाला,
मला मी काय बोलले याचे जेव्हा मला भान आले तेव्हा मी मनातल्या मनात च लाजले,
काय मूर्खा सारखं करतेय मी
तो काय म्हणेल,
कधी लाईट बघितले नाही का??
नाहीतरी मी बावळट च आहे,
मी स्वतः ला च दोष देत
सुरक्षित अंतर ठेवून माघे सरकले,
होत का प्रेमात कधी कधी असेही ही मानूस भान हरवून जातो,
त्याला कोणतीही तमा राहत नाही,
फक्त ती व्यक्तीच दिसते चोहीकडे
आणि त्या व्यक्ती भोवतीच सारे विश्व फिरत असते,
सुनिता चे देखील असेच झाले होते,
दिसेल का तिला सुजित सोडून दुसरे जग
करेल का मन त्या बदलाचा
स्वीकार,
का आजच आणले असेल सुजित ने तिला बाहेर,
त्याच्या अबोल्यात नेमकं दडलंय काय जाणून घेण्यासाठी
सोबत राहा,
लाईक करा व फॉलो करा,
धन्यवाद