पाहिलं प्रेम (भाग 21) न विसरता येणारी आठवण

Love

पहिलं प्रेम (भाग 21) 

( माघील भागात आपण पाहिले सुनीता ने सुजित च्या घरी प्रवेश केला होता) 

आता पुढे.............

मनोमन मी खुप खुश होते, 
जणू लग्न करून च सासरी आले याचे फिल मला येत होतं, 
मी रोज देवाचे आभार मानायचे 
जरी नसेल दिली त्याने मला आयुष्यभर साथ, 
जरीही नसेल माझा त्याच्यावर हक्क , 
पण त्याने प्रेम दिले होते मला भरभरून, 
आणि आता त्याच्या घरी जाऊन राहण्याचा अनुभव देखील अजून काय पाहिजे एखाद्या प्रेम वेडी ला , 
आता तो दिवसाचे चोवीस तास माझ्या सोबत होता, 
माझी काळजी घ्यायचा, 
मला गोष्टी सांगायचा, 
त्याच्या आवडीचे पुस्तक वाचून दाखवायचा, 
माझ्या गोळ्या औषदा चा तर तो आवर्जून लेखाजोखा बघायचा कारण मी नजर चुकवून  गोळ्या फेकून देते 
त्याची रूम , 
त्याचे कपडे, 
त्याचे ते रॅक भरून पुस्तकं, 
त्याला मिळालेले मेडल्स, 
त्याचा तो कौतुक सोहळा बघून मी पुन्हा त्याच्या प्रेमात पडले, 

म्हणजे हा बाहेर जसा राहतो मुळात तसा नाही खुप हुशार व स्वाभिमानी आहे, 

आई ची व त्याची खुप छान मैत्री होती, 
त्यांचं एकमेकांशी भांडणं 
मग त्याने लाडाने आई च्या मांडीवर झोपणं, 
आई ने त्याला जेवण भरावण, 
आणि त्याने रोज न चुकता आई च्या दर्शना सोबत तिला घट्ट मिठी मारणं खुप विलक्षण होतं, 
त्यांचं नातं बघून मन सुखावून जायचं , मी देवाला फक्त एकच मागायचे यांच्या नात्याला कुणाची नजर लागू नये, 

त्याची आई माझी खुप काळजी घ्यायच्या , 
मला देखील त्याच्या सोबत नाष्टा ,जेवण असायचे, 
दोघे मिळून मला जबरदस्ती खाऊ घालायचे, 

हे दिवस संपूच नयेत असे वाटायचे कधी कधी तर, 


आता मी हळूहळू बरी होत होते
स्वतः ला थोडा बदल म्हणून मी आई ला मदत करण्यासाठी किचन मध्ये गेले, 

तू का आलीस, आई 

सहज, मी 

तू जा अगोदर रूम मध्ये
सुजित आला तर ओरडेल मला, 
आई नि हक्काने मला 
दम भरला, 

बर ठीक आहे, 
फक्त उभा राहते तुम्हांला सोबत
मग तर झालं, मी 


हो चालेल, पण जास्त वेळ नको तुला अजून पूर्ण बरे नाही वाटत, 
आई 

हो, मी 

आई काय करताय, मी 

मेथीच्या वड्या, सुजित ला खुप आवडतात, तुला काय आवडते, म्हणजे मी तुला देखील करून देईल, आई 


काहीही चालेल तुम्ही जे बनवताल ते, तसेही तुमच्या हाताला खुप चव आहे, मी 


माझा सुजित पण असेच म्हणतो, 
आई 

आम्ही दोघी बोलत च होतो व सुजित येतो, 

वा.......
कसला वास येतोय...
मस्त, छान 
आई मी चव बघू का ??
त्याला जमल्या की नाही सांगतो, 

त्याने वडी घेण्यासाठी हात 
पुढे केला आणि आई ने पटकन त्या हातावर हात मारत जा अगोदर कपडे बदल ,फ्रेश हो मग देते, म्हणाल्या 


असा गेलो व असा आलो, 
ये आई सुनीता ला देऊ नको बर 
मी आलोच ........
असे बोलून तो निघून गेला, 


मी आई ला थोडी मदत म्हणून सगळं टेबल वर ठेवलं, 
सुजित आला व कोण  देईल याची वाट न बघता, 
हाताने घेऊन सुरू पण केलं, 

असेच करतो हा लहान बाळाप्रमाणे, आई 

मी फक्त हसले, 


मी जाऊ का आता हॉस्टेल वर मी म्हणाले, 

तसे दोघेही एकटक माझ्याकडे बघू लागले, 
म्हणजे बर वाटतय आता मला म्हणून म्हणाले,  मी 


नाही इतक्या लवकर नको 
थोड्या दिवसांनी जा, 
आई 


ये .....
आई...
इतके दिवस सेवा करून घेतली ईने तिची आपल्या कडून 
आता आपली बारी, 
पूर्णपणे बरी झाली 
तरी तिच्याकडून काम करून घेतल्याशिवाय मि जाऊ देणार नाही, 
तसेही तिला नीट स्वयंपाक येत नाही तुझ्या हाताखाली शिकली तर शिकली, सुजित माझ्याकडे बघत म्हणाला, 

मग ठरलं तर जोपर्यंत सुनीता ची ट्रेनिंग पूर्ण होत नाही 
तोपर्यंत तू इथेच राहणार, आई किचन मध्ये जात म्हणाल्या, 

मी मनातून जास्त खुश होते तसेही मला कुठे जायचे होते 
पण त्या काय विचार करतील म्हणून म्हणाले जाऊ का??? 


आता मी रोज आई ला मदत करू लागले, त्यांची व सुजित ची काळजी घेऊ लागले, 
त्यांना काय हवं काय नको 
बघू लागले, 
त्यांचे औषध,
लाईटबील 
फोन बिल, 
किराणा, 
भाजीपाला, 
हे सगळं मी त्यांच्या नकळत सांभाळू लागले, 
घर घरासमोरील बाग मी सुशोभित केली होती 
आता सुजित खुप वेळा घरात मीटिंग घेऊ लागला, 
माझ्या व्यवस्थित व टापटीप पणामुळे मी त्या दोघाच्या मनावर अधिराज्य गाजवत होते, 

त्यांची प्रत्येक गोस्ट मला आवडत होती व मला त्यांची , 

होत  का प्रेमात असे, 

जी व्यक्ती आपल्याला आवडते नकळत तिच्या आवडीनिवडी देखील आपल्या आवडीच्या होतात, 
माणूस प्रेमात स्वतः ला विसरतो म्हणतात 
तसे असेल का हे ?? 

समोरच्या व्यक्ती च्या आवडीनिवडी सांभाळण्यासाठी आपण जीवाचे रान करतो, 

मग तो पदार्थ असो 
की , 
रंग असो,
गाणे असो की मूव्ही 
सगळ्याच गोष्टी एक होतात मनाप्रमाणे, 

अशीच सुजित च्या आवडीनिवडी मध्ये अडकलेली सुनीता 
करू शकेल का स्वतः ला त्याच्यापासून दूर, 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा 
कथा आवडल्यास लाईक करायला विसरू नका, 
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा, 
क्रमशः ....…....

धन्यवाद

🎭 Series Post

View all