पाहिलं प्रेम (भाग 19) न विसरता येणारी आठवण

Love story

पाहिलं प्रेम (भाग 19) 

( माघील भागात आपण पाहिले सुजित व सुनिता ने एकमेकांना वचन दिले होते हे नाव नसलेले नाते सांभाळण्याचे, )

आता पुढे ...................

आयुष्यात कधी एकमेकांचे नाही होता आले तरी चालेल पण आता फक्त एकमेकांसाठी जगुयात हा विचार आज आम्ही केला, 

मला माहित नव्हते हे चुकीचे आहे की बरोबर , 
पण मला असलेली त्याची ओढ कदाचित त्याच्या सहवासात आल्याने कमी होईल म्हणून मी हा निर्णय घेतला होता, 

मला जीवापाड प्रेम करायचं होतं त्याच्यावर,
 त्याला खुप जवळून अनुभवायचं होत, 
त्याच्यात गुंतून जायचं होतं,
माझं त्याच्यासाठी असलेल वेड प्रेम त्याला सांगायचं होत, 
त्याला जपायचं होत या जगापासून,
त्याची काळजी घ्यायची होती स्वतः पेक्षा पण जास्त
 कारण ते माझं पाहिलं प्रेम होतं 

कदाचित तो मूर्खपणा असेल
समाज अमान्य देखील असेल
 पण मला तेव्हा जे वाटले ते मी केलं, बाकी काही नाही, 


माझी निर्णय क्षमता कमी असेल पण माझे हृदय जे सांगत होते तेच मी ऐकत होते, 


चल निघुयात का ??
तो 

मी फक्त हम्मम्म्मम , 

आम्ही गाडी जवळ आलो, 
त्यांनी गाडी स्टार्ट केली व आमचा प्रवास चालू झाला, 

दोघेही पुन्हा शांत, 
नेहमी प्रमाणे, 
पण आज मनावरील एक बोझ कमी झाले होते त्याच्याही व माझ्याही, 

आज जिंकून पुन्हा हरले होते मी पण त्यातही मी आनंदी होते, 

माझ्या हॉस्टेल समोर त्याने गाडी उभा केली, 
दोन मिनिटं फक्त माझ्याकडे पाहिले, 
चल येऊ, 
तो 

मी काहीच बोलले नाही, जर हा खरच प्रेम करत असेल तर अव्यक्त भावना देखील कळतील, 

मी फक्त बघत होते त्याच्याकडे, 
त्या सिरीयल प्रमाणे मुलगा मुलीला हग करून by करतो असे काही नव्हते माझ्या मनात पण उत्सुकता होती जेव्हा याला माझ्या भावना माहीत आहेत तर हा रिऍक्ट कसा होतो, 

त्याने पुन्हा चल निघतो म्हणून माझ्याकडे पाहिले, 

मी फक्त शांत, 


आता त्याने डोक्यावर हात ठेवला, 
चल काळजी घे, 
छान अभ्यास कर 
काही गरज लागली तर कॉल कर 
म्हणाला, 


आता माझ्या भावनाचा बांध फुटला होता , हेच तर वेगळेपण होत त्यांच्यामध्ये ज्यामुळे मी ओढली जात होते, 
माझ्या आयुष्यात माझे बाबा व माझा दादा यांच्या नंतर तोच होता माझ्या डोक्यावर हात ठेवणारा, 


तो डोक्यावर ठेवलेला हात खुप काही सांगून केला, एक क्षणात माझ्यावर त्याच्या प्रेमाची सावली करून गेला, 
डोळ्यातून पाणी वाहू लागले, 
मी तसेच पाणावलेले डोळे घेऊन माघारी फिरले, 

तो केव्हा गेला त्याचे भान देखील नव्हते मला, 


तशीच रूम मध्ये आले व कॉटवर पडले, 

पण मी खुश होते, काही का असेना माझे प्रेम मला मिळाले होते,

प्रेमात माणूस आंधळा होतो हे ऐकले होते पण आज ते अनुभवले, 

स्वप्नरंजित ती आजची  भेट
नयनसुखाऊन जाते 
येणारी वाऱ्याची झुळूक देखील
त्याच्या स्पर्शाने मोहित होते


त्याच्या नजरेच्या स्पर्शाने देखील
माझी मीच लाजते 
बंध कुठलाच नसताना 
त्याच्यासाठी च सजते 


हृदयातील  प्रेम 
डोळ्यात त्याच्या दिसतं
मनात खुप काही असताना 
ओठांवर निःशब्द असतं


न विचारलेल्या प्रेमाचा 
होकार डोळ्यातून च मिळाला
भावनेला शब्दाची गरज नसते 
आज अर्थ कळला


शेवटी नजरेतील प्रेम नजरेतच राहील
या नयनांनी ते अश्रूसोबत वाहील


खरच भावनेत इतकी ताकद असते का की शब्दही कमी पडावेत???

नजरेतल्या प्रेमात इतकी ओढ असते का की न सांगता कळावं ????

त्याच्या विचारात कधी झोपी गेले माझे मलाच कळले नाही , 

जाणून घेण्यासाठी या नाव नसलेल्या नात्याचा प्रवास , सोबत राहा, लाईक व कमेंट्स करत राहा, 
कथा कशी वाटली हे नक्की सागा, 
अनुभवत जगण्यासाठी पहिलं प्रेम, मला फॉलो करा, 

धन्यवाद 


क्रमशः ........

🎭 Series Post

View all