Sep 26, 2020
प्रेम

पहिलं प्रेम (भाग 18) न विसरता येणारी आठवण

Read Later
पहिलं प्रेम (भाग 18) न विसरता येणारी आठवण

पहिलं प्रेम (भाग 18) 
(माघील भागात आपण पाहिले सुजित सुनीताला स्वीकारण्यात असमर्थता दर्शवतो ) 


आता पुढे...........


आज माझे प्रेम जिंकूनही हरले होते डोळ्यांतील पाणी थांबण्याचे नाव घेत नव्हते, 

सुजित चे काय तो तर बसला होता अपराद्या प्रमाणे न केलेल्या पापाची शिक्षा भोगत, 

तू please  रडू नको ना ग, 
तुला त्रास होऊ नये म्हणून सांगणार देखील नव्हतो, 

पण पुन्हा मनात ठेवून 
स्वतः ला दोष देत बसलो असतो आयुष्यभर म्हणून बोललो, सुजित 

नाही रे तसे काही नाही 
उलट बोललास तेच खुप छान झाले, 
निदान मी चुकीची नव्हते हे गिल्ट तरी राहणार नाही आयुष्यभर मनात, सुनीता 


पण काय उपयोग ना , 
सगळं काही माहीत असूनही काहीच कळत नाही असे दाखवावे लागलं, 
सगळं जाणवत असूनही दूर राहावं लागतं, 
एकमेकांशिवाय जगन अशक्य आहे तरीही निरोप द्यावाच लागतो, 
सुजित 

आता निरोप हा शब्द ऐकून  माझ्या डोळ्यातील पाण्याने अजून वेग घेतला, 

आता सुजित चे देखील डोळे ओलावले, 
त्याने कुठलाही विचार न करता 
मला जवळ घेतले, 
सुजित च्या कुशीत विसारउन त्या पाण्याचा वेग कमी झाला होता, दोघेही रडत होतो त्या नाव नसलेल्या नात्यासाठी, 

खरच प्रेमात इतकी ताकद असते हे मी आज अनुभवले होते, 
दोन जीव कधी एकत्र येतात व एकमेकांच्या डोळ्यांनी हृदयाचा वेध घेतात ते लक्षात देखील येत नाही, 

त्याचा निर्णय सांगून झाला होता, आता मला निर्णय घ्यायचा होता काय घेऊ मी निर्णय, 

समाजासाठी त्याला सोडू की त्याच्या जबाबदाऱ्या साठी, 

आधार बनून त्याची साथ देऊ की फक्त आजचा क्षण अनुभवू, 

काहीच कळत नव्हते, 

तेवढ्यात तो बोलू लागला 
हे बग प्रेम करण आपल्या हातात असत, ते जपन देखील आपल्या हातात असत पण ते प्रेम आयुष्यात आणण हे नियतीच्या हातात असत, 

प्रेम करण चूक नाही 
पण ज्या व्यक्तीवर प्रेम केलं ती व्यक्ती माझी सोडून कुणाचीच होऊ नये हे चूक आहे, 

प्रेमात एकमेकांना सावरण चूक नाही पण जर एकमेकांचे होऊ शकत नसेल तर आयुष्य संपवून टाकणे चूक आहे, 

आपलं प्रेम जिथे कुठे असावं ते फक्त सुखात असावं हे प्रेम असत, 
प्रेम ही एक सुंदर भावना आहे ती गर्दीतही एकटं करून जाते, आणि एकटं असताना भावनांची गर्दी, 


तुला आता त्रास होईल पण मी कुठे विसर म्हणतोय मला, 

उलट कधी एकांतात हे क्षण आठवून डोळ्यातून आनंदाश्रू येईल तेव्हा कळेल आज केलं ते बरोबर होत, 

तुझ्यासोबत घालवलेला तो प्रत्येक क्षण माझ्या हृदयात जपून राहील, 
सुजित बोलत होता व मी ऐकत 


सगळं तर तोच बोलून गेला, 
रडायला देखील जागा ठेवली नाही, समाजदारपणाचे लेबल लावून,


काही तरी बोल ना 
सुजित च्या या बोलण्याचे मी भानावर आले, 

हम्मम्म्मम, काही नाही मी 


Please अशी गप्प नको राहू तुझी शांतता खायला उठते मला, सुजित 

बोलायचंय मला तुझ्याशी पण कसे बोलावे कळेना, मी 


बोल, आज तुला जे वाटेल ते बोल
सुजित 


तूच आताच म्हणाला ना 
प्रेम म्हणजे लग्न नव्हे, 
प्रेम म्हणजे अशी भावना जी आपण आयुष्यभर जपून ठेऊ शकतो, मी 

हो मग सुजित, 

नाही लग्न झाले तरी चालेल, नाही  सोबत मिळाली तरी चालेल, 
पण मला जगायचंय तुझ्यासोबत, 
भरभरून प्रेम करायचंय तुझ्यावर, 
त्या चांदण्या रात्री तुझ्या कांद्यावर डोकं ठेऊन चांदण्या मोजायचा आहेत, पाण्याच्या त्या लाटा मला अंगावर घ्यायच्या आहेत ज्या तुला स्पर्श करून येतील, वाळूत उमटलेल्या तुझ्या पावलावर पाऊल टाकून मला चालायचंय, 
मुसळधार पाऊस कोसळत असताना मला एका छत्रीतून प्रवास करायचा आहे, 
नात्याचा शेवट माहीत असताना देखील मला जगायचंय ते नाव नसलेलं नातं आयुष्यभर आठवण्यासाठी , 


मला जीवापाड प्रेम करायचंय तुझ्यावर मर्यादा संपेपर्यंत, 

व प्रॉमिस आपल्या वाटा वेगळ्या झाल्यावर मी पुन्हा कधीच माघे वळून बघणार नाही, 
पण आता मला तुझ्यासोबत जगायचंय 
कदाचित नंतर विसरेन मी तुला ......
देशील माझी साथ .....
मी पुढे केलेला हात नेहाळत
तो म्हणाला मला पण हेच म्हणायचं होत पण हिम्मत होत नव्हती, 

व तो माझ्या हातात स्वतः चा हात देतो, 

असते का शक्य 
एखाद्या नात्याच्या मर्यादा माहीत असूनही त्या गुंतने, 

एखादी व्यक्ती आपली होऊच शकत नाही हे माहीत असूनही तिच्यावर जीवापाड प्रेम करणे, 

प्रेमासाठी काहीपण 
हे खरे आहे की मर्यादे चे भान असावे माणसाला, 

सुजित व सुनीता ने घेतलेला निर्णय ठरेल योग्य की होईल आणखी त्रास जाणून घेण्यासाठी सोबत राहा, भरपुर लाईक व कमेंट्स करा, 

प्रतिसादाच्या प्रतीक्षेत ........


धन्यवाद

Circle Image

Geeta Suryabhan Ughade

Teacher

नमस्कार मी गीता उघडे M.A(english) मी व्यवसायाने शिक्षिका आहे .व 10 वर्षांपासून लेखन क्षेत्रात काम करते , मला लेखन करायला खुप आवडते विशेषतः समोरच्याच्या मनाचा वेध घ्यायला त्यामुळे जास्तीतजास्त कथा माझ्या या जीवनाशी निगडित असतात, ज्या कधीतरी कुणीतरी अनुभवलेल्या असतात, वाचून बघा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा Attitude नाहीये माझ्यात फक्त स्वाभिमानाने जगायला आवडते मला,