पाहिलं प्रेम (13)
(माघील भागात आपण पाहिले सुजित सुनीता ला भेटण्यासाठी आला असतो)
आता पुढे .....................
मी माघे बसण्यासाठी दरवाजा उघडला,
तर तो म्हणे समोर बस ना,
मी खाणार नाही तुला,
नाही नको माघेच बरी आहे मी,
मी नाराजीच्या स्वरात म्हणाले,
मी काही केल्या पुढे येत नाही हे कळताच ,
ठीक आहे बस ,
माघे तर माघे तो म्हणाला,
मी माघे बसले,
आज दोघेच होतो
व वेळ पण होता पण नव्हत वाटत मला त्याला बोलावं कारण तो आता असा तर दुसऱ्याक्षणी वेगळं वागेल,
त्याने गाडी चालू केली,
आता गाडी चालू होऊन 15 मिनिटं झाले होते, पण अजूनही आम्ही शांतच होतो,
कोन बोलेल ना ??
नेहमी माझा पुढाकार असायचा पण आता नको ,
म्हणून मी शांत होते,
निरव शांतता असताना त्याने गाणे लावले,
गाण्याचे बोल असे होते की हसावं की रडावं तेच कळेना गाणे वाजत होते व मी फक्त बघत होते काचेतून बाहेर,
कधी कधी आरशात एक नजर झाली की पटकन खाली बघून घ्यायचे,
असे कसे बोलायचे
न बोलता आता .............
तुझ्यासवे तुझ्याविना हसायचे आता........
डोळ्यात या रोज तुला
जपायचे रे आता......
सांग जरा असे कसे लापायचे
रे आता,
मन धागा धागा जोडतो नवा
मन धागा धागा रेशमी दुवा .......
गाण्याने मी भानावर आले खुप वाटलं बोलावं ,
तो पुन्हा टाळून नेईल म्हणून शांत राहिले,
तो फक्त गाणे बदलत होता एका माघे एक
एक कडवे झाले की गाणे बदलायचा,
त्याचे काय चालू आहे हेच मला कळेना, नेमकं काय चालू आहे याचे, गाणे तर अर्थपूर्ण लावतोय मग मला इकडे इतक्या दूर का???
घेऊन आला,
पण आता मी ठाम होते ,
काही झाले तरी बोलायचे नाही,
आता त्याने गाण्याचा आवाज वाढवला, म्हणजे गाणे टाळता च येणार नाही इतका,
त्यातील शब्द न शब्द हृदयावर कोरला जात होता,
वेड्या मना सांग ना
व्हावे खुळे का पुन्हा
तुझ्या सवे सारे हवे
प्रेमात फसने नाही रे
धुक्यात जसे चांदणे
मुक्याने तसे बोलणे
हो सुटतील केव्हा उखाणे ,,,,,
नात्याला काही नाव नसावे
तुही रे माझा मितवा,
नात्याचे काही बंध न व्हावे
तुही रे माझा मितवा,
.........................
......................
ओ.....................
वेड पांघरावे, ना व्हावे शहाणे
ठेच लागण्याचे कशाला बहाणे,
हूर हूर वाढे गोड अंतरीही
पास पास दोघात अंतर तरीही
चुकून कळले जसे
कळून चुकले तसे
ओ.....
ऊन सावलीचे खेळ हे,
नात्याला काही नाव नसावे
तू ही रे माझा मितवा,
नात्याचे काही बंध न व्हावे
तूही रे माझा मितवा,
लावलेले गाणे,
त्याचे सतत मला आरशात बघणे
काही तरी खुणावत होते,
जाऊ दे हा नाही बोलणार
घेऊ आपणच कमीपणा
असे म्हणून मी बोलू लागले,
काय चालले तुझे, मी
कुठे काय ,तो
तू अगोदर गाडी थांबावं बर मी,
त्याने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली,
मी दरवाजा उघडून बाहेर आले,
आता बोलून टाकू सगळं
उगाच नको मनात प्रश्नचिन्हं
एखादाचे हो की नाही ते तरी कळेल,
मी तो बाहेर येण्याची वाट बघू लागले,
बाहेर येण्यापूर्वी त्याने जॅकेट काढून ठेवण्यासाठी चैन ला हात लावला,
आता ठरवलंय ना ठाम राहायचं
म्हणून मी तोंड फिरून उभी राहिले,
तो गाडीतून उतरून माघे येऊन उभा राहिला,
बोल काय म्हणतेस,
तो म्हणाला,
मी त्याला बोलण्यासाठी
वळून बघितले तर काहीवेळ माझाच माझ्यावर विश्वास बसत नव्हता,
आता काय बोलणार होते मी
तो कृती च अशी करतो की मी पुन्हा पुन्हा वेडी होते त्याच्यासाठी,
ओठावर आलेले शब्द मी पुन्हा गिळले व शांत उभी राहिले,
का??
आता काय झालं,
बोल ना
की शर्ट बघून राग गेला सगळा,
तो हसत म्हणाला,
काही नाही,
त्या दिवशी का नाही घातला,मी
अग वेडाबाई आमचे मित्रमंडळी वाढदिवसाला घातलेला शर्ट पार्टी संपली की ओढून ओढून फाडून टाकतात, ही आमची कॉलेज पासून ची परंपरा आहे,
आणि मला माहित होतं की तू त्या दिवशी कशीच जवळ येणार नाहीस, व हा शर्ट मला फाटू द्यायचा नव्हता, म्हणून दीपिका ने आणलेला घातला,
आता मला माझी च लाज वाटू लागली किती सिम्पल होत यार सगळं व मी याच्या बद्दल काय विचार केला, कितीवेळा मला लाजवणार आहेस,
आता दोघांतील अंतर नकळत कमी झाले होते,
त्याने मी वरती बघावं म्हणून केसांना हात लावला,
मी सॉरी म्हणून तशीच त्याच्या मिठीत सामावले,
त्याला ही कळेना काय झालं व मलाही पण तो क्षण अनुभवावा वाटलं तेव्हा फक्त इतकच,
खुप वेळा प्रेमात असेच होते ना ,
समोरचा आपल्यासाठी खुप काही करतो नकळत पण आपल्याला ते कळतच नाही, व आपण काही गोष्टी पकडून ठेवतो मनात,
पण नेहमी समोरच्याच्या बदलेल्या वागण्याचे सर्वेक्षण करण्यापेक्षा स्वतः च्या चुकांचे मूल्यमापन करा,
आयुष्य सुखात जाईल,
प्रेम म्हणजे फक्त सोबत नव्हे तर प्रेम हे जाणिवेत देखील असावं,
त्याला जपावं
त्याला उमलू द्यावं
त्याला आठवावा
निरंतर,
क्रमशः ......…....................
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा