पाहिलं प्रेम (भाग 12) न विसरता येणारी आठवण

Love story

पाहिलं प्रेम(भाग 12) 

(माघील भागात आपण पाहिले सुजित च्या वाढदिवसाच्या दिवशी सुनीता दुखावली गेली आता पुढे)

मला सतत या गोष्टी ची जाणीव होत होती की मी चुकले, 
पुन्हा पुन्हा राहून राहून तेच आठवत होत मला, पण मी काहीच करू शकत नव्हते, 
केलेल्या चुका आठवून फक्त डोळ्यात पाणी आणू शकत होते, 
मी होस्टेल वर पोहोचले 
आता जेवण तर दूर साधे पाणी पिण्याची देखील ईच्छा नव्हती, 
पण तरीही मनाला वाटत होते, त्याचा कॉल येईल गेली का विचारायला, 
का काय माहीत पण अजूनही मनाची अपेक्षा ठेवायची सवय गेली नव्हती, 

विचारा विचारातच झोप लागली कळले पण नाही, 
जेव्हा सकाळ झाली तेव्हा सहा वाजले होते , 
वेळ बघण्यासाठी मोबाईल हातात घेतला तर त्यावर सुजित चे 18 कॉल, मी बघून शॉक झाले इतके कॉल का केले असेल त्याने, 
मी क्षणाचाही विलंब न लावता पुन्हा कॉल लावला, 
दुसऱ्याच रिंग ला कॉल उचलल्या गेला, जसा काय माझ्याच कॉल ची वाट बघत होता तो,

हॅलो, मी 

अग कुठे आहेस, व केव्हा गेलीस, मग सांगून जाता नाही आले का??
मी किती घाबरलो, 
काही अक्कल आहे की नाही, 
तुला शहाणपना कुणी करायला सांगितला, बिनडोक कुठली काही झालं असत मग, तो रागात म्हणाला, 

काही होत नाही मला व मी लहान नाहीये आता, तसेही तू बिझी होतास तुला कुठे वेळ होता, साधे बोलायला वेळ नव्हता मग सोडवायला काय येणार, 
मी रागात प्रतिउत्तर दिले, 

हो ग बाई, 
पण सांगून तरी जायचे ना, व तसेही मी नसतो आलो पण कुणाला पाठवले तरी असते, तो, 

हम्मम्म्मम , झालं कुणाला तरी पाठवले असते पण हा नसता च आला आपल्या साठी, मी मनातल्या मनात म्हणाले, जाऊ दे , 

जाऊ दे, मी विषय टाळण्यासाठी म्हणाले, 
पकडलय कुठे तुला सोडायला, तो हसत म्हणाला, 
याला प्रत्येक गोस्ट मजाक वाटते, समोरच्याच्या भावना पण जाऊ दे, मी मनाला समजावले, 
बाकी तुझा प्रोग्राम छान झाला बर, मी 

हो का????
थँक्स, 

अग दीपिका ने केलं होतं सगळं, तो आनंदाने म्हणाला, 


हो माहीत आहे, कोण आहे ती, मी चोकशी पूर्वक विचारले, 


दीपिका,,
त्याने थोडा वेळ घेत सांगितले
ती माझ्या खुप जवळची व्यक्ती आहे , तो

आता पुढे ऐकून कशाला स्वतः ला त्रास करून घ्यायचा म्हणून मी ठेऊ का म्हणाले, 

का ग बोल ना, दीपिका बद्दल विचारत होती ना , तो 

हम्मम्म्मम मी पुन्हा विषय थांबवण्यासाठी बोलले, 


आता त्याला हे कोण सांगेल माझी ऐकायची ईच्छा नाही पुढे, 
मला सहनच होत नाही तुझ्या जवळ कुणी आलेले, 
कितीही प्रयत्न केला तरी शक्य नाही मला ते, 
मी मनातल्या मनात म्हणाले, 

बर ऐक ना आज भेटणार का????
तो 

आता मला कशालाच बळी पडायचे नव्हते, 
कारण त्याचे दूर जाणे मला सहन होत नव्हते,

नाही नको, काम आहे मी 
काय काम आहे तो 
असेच काही पण ,मी 
असेच काही पण काय तेच विचारतोय, तो 

त्याला काय सांगणार ना की बाबा रे गुंतत चाललेय तुझ्यात व तुला त्याचे भान नाही please दूर राहा, मी माझे भान हरपण्यापूर्वी 

पण तो देखील हट्टाला पेटला ये च म्हणून, 
आता माझ्यासमोर पर्याय नव्हता,

चला शेवटचं भेटून घेऊ म्हणून मी 
हो म्हणाले, 

आता कसं, 
माझी लाडकी चिमणी तो हसत म्हणाला, 

मी मात्र हरवले होते त्या कालच्या विचारात , विचारू का शर्ट का नाही घातला, की पहिला देखील नाही, की अवडलाच नाही, की दीपिका चा घातला म्हणून माझा नाही घातला, नाही नको आपला काय अधिकार त्याच्यावर, पुन्हा स्वतः ला सावरत भानावर आले, 

संध्याकाळी भेटू म्हणून कॉल ठेऊन दिला, 

आज त्याला भेटण्याची नेहमीप्रमाणे ओढ लागली होती पण मी स्वतः ला सारखे सारखे सांगत होते की आता पुन्हा चूक नको, मी जास्त तयारी देखील केली नाही फक्त त्याला आवडतो म्हणून एक निळ्या रंगाचा फिकट शेड चा ड्रेस घातला व तयार होऊन बसले, 

आता काहीच नव्हते ना नेहमीची घालमेल, ना उत्साह, 
ना विचारांचा गोधळ ना भावनांचा गुंता, प्रश्न हजार होते मनात पण विचारायची हिम्मत होत नव्हती, 
मन पुन्हा पुन्हा घाबरत होत की माझा नाही झाला तरी चालेल पण माझ्या डोळ्यासमोर दुसऱ्या कुणाचा होऊ नकोस, मला ते सहनच होणार नाही, 

संध्याकाळ झाली व तो गेट वर आला, 
नेहमीप्रमाणे प्रसन्न चेहरा,  चेहऱ्यावर स्माईल, ते वाऱ्यावर उडणारे केस,
आज पहिल्यांदा त्याने फोर व्हिलर आणली होती, 
पण जवळ जाऊन बघते तर त्याने जॅकेट घातले होते, 

हे काय एक तर फोर व्हिलर मध्ये कुणी जॅकेट घालते का????

थोडं हसू आले पण मी सावरले, 
व माघे बसू लागले, 
हो मागेच बसू उगाच नको पुढे , 
आता दूरच बरे, 
नको जास्त स्वप्नं 
व नको स्वतः ला त्रास, 
होत ना खुप वेळा असे, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिच्यापासून आपण जाणून बुजून अंतर ठेवून राहतो त्या व्यक्तीला त्रास नको म्हणून, पण बरोबर असतो का आपण, जसे आपल्या ला तिच्या प्रत्येक क्षणाची ओढ असते तशी तिला नसेल का आपल्या, 
आपले दूर जाणे कळतं असेल का तिला, 

कशी सांगू तुला 
या हृदयातील आस
रात्रंदिन लागलेला असतो 
मज तुझाच ध्यास, 

खुप कष्टी होते 
तुझ्या विरहाने मी 
आठवतो जेंव्हा झोपताना 
रोज मला तू 

तुझं असणं तुझं नसणं 
सगळं काही परिणाम करत 
डोळ्यातल्या पाण्यासोबत 
अस्तित्व माझं झुरत 
अस्तित्व माझं झुरत 

तसेच काय असेल सुजित च्या येण्याचे कारण जाणून घेण्यासाठी सोबत राहा माझ्या व मला फॉलो करा, 
धन्यवाद

🎭 Series Post

View all