पाहिलं प्रेम (भाग 1) न विसरता येणारी आठवण

A story about love

पाहिलं प्रेम (भाग 1) न विसरता येणारी आठवण 

नमस्कार मी गीता उघडे आपण नवनवीन कथा घेऊन नेहमी भेटत असतो पण यावेळी थोडं वेगळं आहे कथेसोबत जागाऊया काही गोड आठवणी मनातल्या मनात ज्या बंद  केल्यात काळजाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात कायमच्या 

चला तर मग ..............

मी राधिका एक सुशिक्षित आई, 
प्रत्येक गोष्टीत चोक मग ते काम असो की व्यवहार. 

मला दोन आपत्यआहेत.
एक दिव्या माझी मुलगी तर सोहम माझा मुलगा.

मुलगी कॉलेज ला शिकते 
तिने तिच्या गुणवत्तेवर मेडिकल ला ऍडमिशन मिळवलं व मुलगा आयुष्याच्या टर्निंग पॉईंट वर आहे म्हणजे 10 वीत  आहे.


आज रविवार चा दिवस.
मी नेहमी प्रमाणे माझी देवपूजा आटोपून 
 स्वयंपाकात गुंतले होते 
मी इतकी गुंग झाले  होते की, 
रमाकांत ( माझे पती )
यांनी दिलेले चार आवाज माझ्या कानी देखील पडले नाही.

राधिका ........

रमाकांत जोरात ओरडले, 
मी शिकलेली बायको यासाठी केली की तिला मुलांना नीट वळण लावता यावे.
मी तुला नोकरीसाठी नाही म्हणालो कारण मुलांकडे दुर्लक्ष नको. 
आणि तू काय केलेस ?????
तू करते काय मग दिवसभर घरी?? 

यासाठी माझी आई म्हणते मुलगी म्हणजे परक्याचे धन तिला जास्त शिकवू नये नाहीतर ती आपल्याला शिकवते. 

अगोदरच दिव्या च्या शिकक्षणाची आवड नसलेल्या रमाकांत चे हे शब्द ऐकून माझे हातपाय जागेवर चं थंड पडले.
 आता काय केलं असेल पोरीने,
 जर काही चूक केली असेल तर रमाकांत तिला माफ करणार नाही हेही मला माहित होतं.


रमकांत म्हणजे आमच्या आई (सासूबाई)ची झेरॉक्स कॉपी 
त्यांना मुलींनी जास्त शिकलेल आवडत नसे, 
मुलीने घरकाम शिकावं 
व घरातील माणसे सांभाळावी या विचारांचे ते 
त्यांनी लहानपणापासून दिव्या ला खुप बंधने लावली 
मुलाशी मैत्री नको 
केस कापायचे नाही 
वेणी घालायची,
कमी कपडे नको 
मोठयाने बोलायचे,हसायचे नाही 
कधी कुठला क्लास नाही की कुठले समरकॅम्प नाही 

फक्त घर व शाळा यातच तिचे बालपण गेले 
ते तिला आजोळी देखील पाठवत नसे 
तिथे माझ्या बंधू चे तिच्या वयाचे मुलं होते म्हणून 


रमाकांत च्या जोरजोराने ओरडण्याचा आवाजाने मी भानावर आले 

अहो काय झालं ते तरी सांगा मला 
मी घाबरतच विचारले कारण रमाकांत चिडले की ते कुणाचेच ऐकत नाहीत 
व समोर कोण आहे याचे भान देखील राहत नाही 


मला काय विचारते 
विचार तुझ्या लाडक्या लेकीला 
तुझ्या प्रेमाने वाया गेलीये ती 
बर झालं लवकर कळले 
नाहीतर काय दिवे लावले असते काय माहीत 
रमाकांत ओरडून म्हणाले 


तुम्ही अगोदर शांत व्हा
मग आपण बोलू 
मी त्यांना शांत करत बोलले 

काय शांत होऊ 
तू तुझ्या पोरीला विचार अगोदर 
ते काहीही ऐकण्याच्या मनास्तिथी मध्ये नव्हते 

मी दिव्या ला आवाज दिला 

तशी ती थरथरत कापत बाहेर आली 
तिचा चेहरा बघून मी ओळखले काहीतरी भयंकर झाले होते 

मी काही विचारणार तोच रमाकांत पुन्हा कडाडले 
सांग तुझ्या आई ला कुणाचा फोन होता 
तू कुणाशी बोलत होतीस 
सांग लवकर 
नाहींतर थोबाड फोडीन तुझे 


आता मी व दिव्या दोघी घाबरलो होतो 
मी समजून चुकले होते काय झाले असेल पण बोलून दाखवू शकत नव्हते 

मी धीर एकवटून विचारले 
काय झालं बाळ 
कुणाचा फोन होता 

तिने लगेच रडायला चालू केले 
तिला शब्द फुटत नव्हते 
ती फक्त मित्र होता आई 

हेच तीन शब्द बोलली 

तसेच रमाकांत वाऱ्याच्या वेगाने पुढे आले 
त्यांनी कुठलाही विचार न करता सनकन 
तिच्या कानामाघे ठेऊन दिली 
मी मध्ये पडणार तोच मला जोराचा धक्का देत दूर केलं 

त्यांनी इतकी जोरात कानामाघे मारली की दिव्या च्या कानातून रक्तश्राव होऊ लागला 

क्रमशः 

पहिल्या प्रेमाची पहिली खून जेव्हा घराज्यांच्या तावडीत सापडते तेव्हा प्रत्येकाची अशीच अवस्था होते 

काय होईल पुढे दिव्या सोबत जाऊन घेण्यासाठी सोबत राहा व मला फॉलो करायला विसरू नका 

धन्यवाद 


पुन्हा भेटू लवकरच ................

🎭 Series Post

View all