पहिलं प्रेम भाग १ (भूतकाळात डोकावताना)

प्रेम की आकर्षण


"सौम्या.. अगं चल आवर लवकर!" मनीष हातात कारची किल्ली घेत बोलला.

"हो हो झालच.. फक्त गॅस चेक करते थांब.." वन साईड घेतलेला पदर खांद्यावर उडवत पटकन वाकून गॅसचा नॉब आणि किचनची खिडकी बंद करत सौम्या बाहेर आली.

"किती गं तो उशीर! चल ये पटकन बाहेर, मी लॉक करतो दार.." मनीष दार लॉक करतो आणि पार्किंग मधे जातो.

"आणि हे बघ मिहिर..तिकडे गेल्यावर जास्त मस्ती करायची नाही आणि आगाऊपणा तर अजिबातच नाही समजल!"सौम्या तिच्या चार वर्षाच्या लेकाला दाटावत बोलली.

"काय हे समू... लहान आहे तो; मस्ती केल्याशिवाय राहणार होय.. जस्ट चील माय बॉय.. मम्मा तर काय रोजचं ओरडत असते आपल्याला.."मनीष लेकाकडे बघत बोलला.

"हो मग,मला वेड लागलेल असत म्हणून बोलत असते मी आणि मगापासुन तर तुला उशीर होत होता ना आता नाही होत आहे का?" सौम्या डोळे बारीक करून बोलली.

"हो मग, होतोच आहे उशीर. हा बघ निघालोच मी.. काढलीच गाडी.." मनीष गाडी गिअर वर टाकता बोलला आणि गाडी पार्किंग मधून बाहेर काढली देखील.

सौम्या त्याच्याकडे बघत हसून बाहेर पाहू लागली. बाहेर पाहत असताना छोट्या मिहिरला प्रेम वजा दटावण तीच चालूच होत.

"काय रे मनीष, मस्त पैकी ड्रेस किंवा जीन्स घातली असती ना रे मी! हे साडी वैगरे.." सौम्या थोडी हिरमुसून बोलली.

"आज कोणाचा वाढदिवस आहे? माझा.. मग आज माझ्या आवडीच व्हायला हवं ना! आणि माझी बायको मला साडीत जास्त..म्हणजे जरा जास्तच आवडते. तुझे ते एकदम सरळ सुळसुळीत केस, हलकासा मेकअप, छोटीशी टिकली आणि गळ्यात नाजूक मंगळसूत्र.. तुला जेंव्हा या गेटअप मधे बघतो ना.. दिल को सुकून मीलता हे मेरी जान.." मनीष ड्राईव्ह करत अधून मधून सौम्या कडे पाहत बोलत होता.

नवऱ्याच्या तोंडून स्वतःच्या सौंदर्याचं एवढं कौतुक ऐकून सौम्या सुद्धा लाजली. त्याने सौम्याचा हात गिअर वर ठेवला आणि तिच्या हातावर हात ठेवत तो पुन्हा गाडी चालवू लागला. मिहिर पण त्याच्या खेळण्यांसोबत खेळतं बसला होता.

दोन तासातच तिघेही लोणावळ्याच्या त्यांच्या बुकिंग केलेल्या रिसॉर्ट वर पोहोचले. मनीष ने सामान काढून तिथल्या माणसांकडे दिलं आणि तो रिसेप्शन जवळ बाकी फॉर्मालिटी पूर्ण करण्यासाठी गेला. सगळ क्लिअर झाल्यावर रुमची चावी घेऊन तिघेही रुमकडे गेले. गरम पाण्याने आंघोळ करून सौम्या ने त्या दोघांसाठी कॉफी आणि क्लब सँडविच ऑर्डर केलं. प्रवासामुळे थकलेला मिहिर फ्रेश होऊन झोपी गेला. संध्याकाळी पप्पांचा बर्थडे आहे म्हणून स्वारी खुशीत होती.

रूम अगदी प्रशस्त होती. सौम्याच्या स्वप्नातली जशी. बाल्कनीत येऊन सौम्या.. उभी असतांना तिची नजर खाली भांडत असलेल्या एका कपल वर जाते आणि क्षणात तिला काहीस आठवत.
क्रमशः..
@श्रावणी लोखंडे..


🎭 Series Post

View all