पायरी ओळखून रहावे
मुलीला काही शिकवतेस हे असे म्हणत येतील तुझे बाबा बघच तू राशी...आई म्हणाली
प्रेरणा राशीला आत्ताच काय शिकवतेस हे करायला ,वय आहे का तिचे हे करायचे..अभ्यासाचे दिवस आहेत हे तिचे...हे करायला आयुष्य पडलंय समोर
प्रेरणा लगेच म्हणाली आज हळूहळू शिकवते ,पुढे तिला कामी येईल हेच...नवऱ्यासाठी सासुसाठी इतरांसाठी तिला हे शिकायला हवे रे...
इतक्या लांबचा विचार करून तिचे आयुष्य आणि भविष्य बरबाद करू नकोस...आणि नवरा सासू आणि इतरांना स्वतःच्या हाताने करून खाता येणार नाही का? त्यासाठी माझी लेकच का पाहिजे ?? तिनेच का शिकायचे हे सगळे ,आता तर मुलांनी ही शिकावे..बायकोला हातभार लावायला ,आणि सासू ही तर सोबत कश्याला राहू देईल...नवरा बायकोचा संसार सुरुवातीला तर दोघांनी स्वतःला वेळ द्यावा..हे जॉईंट फॅमिली प्रकरण बाजूला ठेवून स्वतःकडे ,स्वतःच्या नात्याला वेळ द्यावा...
नवरा तिला लेकीच्या दृष्टीकोणातून सगळे सांगत होता...त्याने लेकीचे भविष्य मोठे असेल हे स्वप्न पाहिले होते ,तिला मोठी नामांकित डॉक्टर बनवायचे होते ,त्यासाठी तो आपार मेहनत घेत होता ,तिला घरातल्या कोणत्या ही कामात पडू देत नव्हता ,तिचा हातात सगळे आयते कसे येईल हे बघत होता...
बायको आणि राशी वडिलांकडे बघतच होत्या ,राशीला आई इशाऱ्याने काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होती...म्हणून राशी जरा आईच्या सांगण्या नुसार आज स्वयंपाक घरात काही तरी शिकण्याचे निमित्त करून आली होती..
आईने लगेच राशीला पडलेले भांडे घासून ते व्यवस्थित पुसून ट्रॉली मध्ये लावण्यासाठी सांगितले ,राशी तर ते ही निमूटपणे करत होती ,वडील बायकोची गम्मत बघत होते..
अग हे काय मी तुला सांगत आहे की तिला काम करायला लावू नकोस तर तू काहीच ऐकत नाहीस ,पडू दे हे काम..नाही आले कोणते ही काम तिला तरी।चालेल ,ती सर्व कामाला बाई लावेल इतकी मोठी होईल ,आणि तू बघतच रहाशील...तिच्या नवऱ्याला ही तिचा हेवा वाटेल अशी असेल...तो तिला काही काम करू देणार नाही...त्यात तिला त्याच्या घरच्यांचा त्रास होऊ नये म्हणून वेगळे घर घेऊन राहील...तू बघ तिला असाच नवरा बघून देऊ.. पण मी लेकीला असे छूट पुट काम करू देणार नाही...तिच्या नवऱ्याला ही सांगेन तिने असे काही काम केले नाहीत ,आम्ही तिला लाडात वाढवली आहे..तिने कसले ही काम करू नये ,वाटले तर मी कामवाली चे पैसे देईल पण तिला कोणते ही काम कोणी ही सांगायचे नाही.
हे अति होत असतांना राशीचा आता तोल सुटला होता ,आपले वडील आहे म्हणून त्यांचे बोलणे ठीक आहे पण हेच त्यांनी आईच्या बाबतीत का केले नाही ,का करावे वाटले नाही..आई ही मोठी डॉक्टर आहे.नामांकित आहे ,पण तिला घरातले सगळे काम यायला हवे ,तिने एकत्र कुटुंबात रहायला हवे...सर्वांचे उणे धुणे करायला जमायला हवे...स्वयंपाक करायला हवा...कामवाली करते ठीक आहे पण तू लक्ष द्यायला हवे हेच करत आले होते...का नाही स्वतः एकत्र कुटुंबातुन वेगळे राहिले बाबा ?? का आईला तिचे करिअर करू दिले नाही ?? तिच्या ही बाबांनी सांगितले होते तिला अभ्यास करण्याचा नादात घर काम करू दिले नाही तर घर काम जमणार नाही..तेव्हा तर बाबाच म्हणाले की करिअर ठीक आहे पण माझ्या घरी सर्व काम आई करते तर तिला ही करावे लागेल...बाकी करिअर करत राहो...मी आडवा कुठे येतो..त्यात आम्ही वेगळे राहू शकणार नाही...आणि आता लेकीच्या संसारात लेक काय करेन ,तिच्या नवऱ्याला आपण काय सांगायचे हे ही बाबाच ठरवणार हे कसे..?
"बाबा माझ्या करिअर साठी मी पूर्ण प्रयत्न करेन पण मी आता आईच्या आदर्शावर चालणार आहे ,जरी एकत्र कुटुंब असेल आणि नवऱ्याला आवडत असेल सोबत रहायला तर त्याच्या निर्णयासोबत मला रहावे लागेल...तुम्ही आजोबांना म्हणाला तसे मी म्हणते की तुम्ही माझ्या सासरी फक्त पाहुणे म्हणून यायचे आणि चहा पाणी जेवण करून जायचे...इतकाच तुमचा ही रोल असेल ,आणि असावाच.."
वडिलांना आठवले एकदा सासऱ्यांना आपण असेच बोललो होतो ,तेव्हा त्यांनी ही स्वतःची पायरी ओळखली होती आणि आता आपण ही ओळखून रहावी...
©®अनुराधा आंधळे पालवे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा