पार्वती - जगण्यासाठी चा संघर्ष - (भाग 3 ) अंतिम भाग...

Paarvati Life lesson

पार्वती ची मोठी मुलगी 10 वी ला चांगल्या मार्कांनी पास होते तेव्हा पार्वती तिला विचारते, आता पुढे कस काय करायचं ठरवलं आहेस. तेव्हा ती म्हणते आई मी विज्ञान शाखेला जायचं ठरवलं आहे. पण त्याला थोडा खर्च येईल, त्यावर पार्वती बोलते तू खर्चाची चिंता करू नकोस, तू शिकून मोठी हॊ.... मी अजून 2 घरची जास्तीची काम करेन पण तुम्ही शिका गं मुलींनो..

मागच्या दोघीं पण आता चांगल्या शिकत असतात. छोटीशी थोडी आभ्यासात मागे असते पण मोठ्या दोघीं नेहमी तिचा अभ्यास घेत असतं. असेच दिवस जातं असतात. मोठी ला डॉक्टर व्हायचं असतं ती चांगले मार्क्स मिळवून वैद्यकीय कॉलेज ला प्रवेश मिळवते..

आणि डॉक्टर होते. ती जेव्हा डॉक्टर ची पदवी मिळवून घरी येते तेव्हा पार्वती खूप रडते तिला तिने मुलींसाठी केलेले कष्ट आठवतात. सर्व घरची काम करून स्वतः च्या घरी रात्री उशिरा जेवण बनवून मुलींना वाढलेले जेवण आठवते. दिवसभर राब राब राबून केलेल्या कष्टाचे चीझ होते, 2 no.. ची मुलगी पण 15 वीला चांगल्या मार्क्स नीं पास होऊन नोकरीला लागते, आणि छोटी सुद्धा 12 वि पास होऊन पुढे कसला तरी कोर्स  करायच्या विचारात असतें.

मोठी मुलगी आणि 2 no.ची . मुलगी दोघीं पैसे साठवून एक घर घेतात, पार्वती ला अचानक एके दिवशी घर दाखवायला नेतात. तेव्हा तर पार्वती ला खरंच वाटत नसतं.. कालांतराने 3 no.. ची मुलगी पण नोकरीला लागते आता तिघी मिळून घर चालवू लागतात, पार्वती ला नोकरीं करू देत नाहीत..

अशाच एका निवांत संध्याकाळी बसल्यावर पार्वती ला सासू ने तिला अचानक एका संध्याकाळी घरातून मुलींना घेऊन बाहेर काढलेले दिवस आठवतात . ज्या पार्वती ला 3 मुली असल्यामुळे सासू ने घराबाहेर काढलेले असते त्याच मुली आज चांगल्या पदावर पोचतात...

कालांतराने मोठ्या मुलीचं तिच्या च क्षेत्रातल्या डॉक्टर मुलावर प्रेम जडत, पार्वती हसत मुखाने त्यांचं लग्न लावून देते. मागच्या  दोघीं घर व्यवस्थित सांभाळत असतात.....मुली ही घर सांभाळू शकतात हे आज पार्वती च्या मुलींनी सिद्ध करून दाखवले...

क्रमश.....

नमस्कार.. सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे.. ( देवरुख - रत्नागिरी )

🎭 Series Post

View all