पार्वती - जगण्यासाठी चा संघर्ष ( भाग - 2 )

Paarvati Lifelesson

भाग - दुसरा...

पार्वती स्टॅन्ड वर साफसफाई च्या कामासाठी हॊ तर म्हणते, पण राहायचं कुठे, हा प्रश्न तिच्या समोर असतोच, आजची रात्र स्टॅन्ड वर काढून उद्या सकाळी कुठे तरी साधं स घर मिळत का ते बघू असा विचार करून पार्वती मुलींना घेऊन स्टॅन्ड वरच बसून राहते. थोड्याच वेळात रात्र होते तशा मुली झोपायला येतात. मुलीनां घेऊन स्टॅन्ड वर रात्र काढणे तस तिला भीतीदायक वाटत असतं पण तिच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो... ती तशीच बसून राहते..

बघता बघता सकाळ होते, आता काय करायचं असा विचार करत असताना तिला स्टॅन्ड वर च्या बाजूच्या रस्त्यावर एक बाई भाजी च दुकान उघडत असताना दिसते, पार्वती मुलींना तिथेच बसवून त्या बाई ला जाऊन विचारते ताई कुठे राहायला भाड्याने घर मिळेल का ती बाई म्हणते इथे जवळ 1 झोपडपट्टी आहे तिथे जाऊन विचारा, पार्वती मुलींना घेऊन निघते आणि त्या वस्तीत जाते, तिथे चौकशी केल्यावर तिला 1 साधीशी, छोटीशी रूम मिळते. पार्वती मनोमन सुखावते, चला तात्पुरता निवार्याचा प्रश्न तरी मिटला असं पार्वती मनातल्या मनात म्हणते.

पण ह्या नवीन वस्तीत मुलींना एकटं सोडून स्टॅन्ड वर कामाला जायला तीच मन कचरत असतं, पण तिच्या पुढे दुसरा पर्याय पण नसतो. एकतर् तिच्याकडे काहीच जेवण करायचं सामान नसतं मग ती विचार करते मंगळसूत्र मोडून जे काही पैसे येतील त्यातून थोडं फार सामान घेईन.

ती मुलींना त्या दिवशी एकट्याच सोडून कामावर जायला निघते, मुलींना समजावून सांगते कि मी तुम्हाला खायला घेऊन येते दुपारपर्यंत तो पर्यंत कुठे ही जाऊ नका, खरंतर तिला खूप रडायला येत असतं असं मुलींना सोडून जाताना , पण ती निघते.आणि स्टॅन्ड वर जाऊन आधी त्या बूट पॉलिश वाल्या मुलाला भेटते, तो तिला स्टेशन  मास्तर कडे घेऊन जातो, आणि मास्तर तिला साफसफाई च्या कामासाठी ठेवून घेतात.ते सांगतात दिवसातून 2 दा यावे लागेल, सकाळी आणि संध्याकाळी.. पार्वती मनातल्या मनात म्हणते निदान दुपारी तरी मुलीनं जवळ राहता येईल आणि हा विचार करून ती हॊ म्हणते..

पार्वती तीच  काम आटपल्यावर सोनाराकडे जाऊन मंगळसूत्र विकून त्याचे पैसे घेते आणि त्या पैशातुन एक छोटा  स्टोव्ह आणि थोडं स जेवणाचे सामान घेते, आणि घरी जाताना मुलींना थोडं खायला घेऊन जाते, घरी पोचताच मुली तिला पाहून मिठी  मारतात.

पार्वती त्यांना खायला देऊन तिने आणलेले सामान काढून ठेवते. आणि संध्याकाळ साठी जेवण करून ठेवते. आणि मग ती विचार करत बसते कि मुलींना इथेच जवळ च कुठली मुल्सिपाल्टी ची शाळा मिळाली तर बरं होईल. आणि ती शेजारच्या एक बाई  ला विचारायला जाते, त्या बाई कडून पत्ता घेऊन पार्वती दुपारी मुलींना घेवून शाळेत जाते. आणि त्यांचं ऍडमिशन घेते.छोटी मुलगी पहिलीला, दुसरी तिसरी ला आणि मोठी पाचवीला असं ती मुलींना वर्गात दाखला घेते.

आता रोज पार्वती सकाळीच लवकर उठून मुलींचे डबे करून त्यांचं सर्व आवरून मुलींना शाळेत सोडून मग कामावर जातं असे, आणि दुपारी येताना मुलींना शाळेतून घेऊन येत असे. असेच दिवस जात होते, मुली पण व्यवस्थित शिकत होत्या, मोठी मुलगी अभ्यासात खूपच हुशार होती, पार्वती कमी शिकलेली असली तरी काही ही करून मुलींचं शिक्षण झाले च पाहिजे ह्या विचाराची होती. बघता बघता मुलींच्या शिक्षणाचा खर्च वाढायला लागतो, तेव्हा पार्वती आजूबाजूच्या च्या वस्तीत 2,3 ठिकाणी घरकाम पण करायला पण सुरवात करते.

हळूहळू मुली मोठ्या होत जातात, पार्वती आता 4,5 घरात स्वयंपाक करून देण्याची काम पण करू लागली होती. घरखर्च  आणि भाड  हे सर्व पार्वती च्या पगारात व्यवस्थित भागत होत. मोठी मुलगी आता 10 विला गेली होती.. खूप मन लावून ती अभ्यास करत असे आणि सारखी पार्वती ला म्हणतं असे आई किती कष्ट करतेस तू आमच्यासाठी, दिवस भर  जरा बसत नाहीस, पार्वती म्हणायची तुम्ही खूप शिकून मोठ्या व्हा, मला कष्टाचं  काही वाटत नाही.

आणि मोठ्या मुलीने पार्वती च्या कष्टाच चीझ केल, कुठलाही क्लास नां लावता 10 वि ला 85% मिळवले. पार्वती ला खूप आंनद झाला, तिने देवाचे  खूप आभार मानले. आणि देवाला म्हणाली,  पाठोपाठ 3 मुली झाल्यावर माझा नवरा टेन्शन ने दारू पिऊन मेला. त्याने आज हे माझ्या मुलीचे  कौतुक  बघायला हवे होते.

चला... आज इथेच थांबते, पुढच्या  भागात आपण बघणार आहोत, पार्वती च्या मुली शिकून खूप मोठ्या होतात, तेव्हा त्यांना कुठल्या परिस्थिती तुन जावे लागते ते....

नमस्कार.   सौ... सोनल गुरुनाथ शिंदे. ( देवरुख - रत्नागिरी )

🎭 Series Post

View all