'स्व'तःचा शोध (भाग 15)

As A Female

शेजारची ताई तर आल्या पावली निघून गेली पण तिच्या येण्याने साक्षी आणि तिच्या आईच्या डोक्यामध्ये प्रकाश पडायला सुरुवात झाली होती.

साक्षीच्या आईला तर अनुभव होताच , ' एकदा का संसारात पडलं की खर्च हा वाढतच जातो ' .

पण खेड्यामध्ये तेवढी तीव्रता जास्त दिसून येत नाही. शहरांमध्ये हा खर्च खूप दिसून येतो.

खेड्यामध्ये पुरुषाने जरी फक्त कमावले तरी घर चालू शकते पण शहरांमध्ये तसं होत नाही.

शहरामध्ये दोघंही कमावते असले तरी पण कमीच पडते. महागाई भरमसाठ वाढली आहे आणि स्वतःचे घर नसले तर फरपट च होत जाते.

गावाकडून काही पाठिंबा नसेल तर दोघा वरती भार खूप पडला जातो. त्यात फक्त एकटाच जर कमावता असेल तर त्याच्या नाकी नऊ येते. त्यामुळे समाजामध्ये अशा अनेक ताई सारख्या कथा असतात.

वेळीच ओळखून एकट्या कमावत्या माणसाला असा आधार मिळावा की जेणेकरून येणारी ही कमावती असायला हवी.

नोकरी म्हणा किंवा कोणतीही आवडती कला जोपासून चार पैसे मिळावे अशीच शोधायला हवी.

लग्न जुळवताना त्या गोष्टीचा विचार न करता लग्न करून नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा सगळ्या गोष्टीचा विचार करून मग लग्न करावे. कारण सत्य परिस्थिती सगळ्यांच्या समोरच आहे.

तशी चर्चा करूनच संमती असेल तरच लग्नासाठी तयारी दर्शविली जावी.

कोणताही मागे पुढचा विचार न करता लग्न करून मोकळे झाल्यावर परत या गोष्टीवरून भांडणे तर होणारच. त्यापेक्षा विचार विनिमय करूनच निर्णय घ्यावा.

शहरात राहणाऱ्यांना  दोघांनाही नोकरी शिवाय पर्याय नसतो. त्यामुळे सारासार विचार करावा.
                               
साक्षीने गावातच एम एस सी आय टी कोर्स लावला होता. दोन महिने कोर्स सुरू असणार होता.

सेंटर मध्ये " टायपिंग करून घे " , असं सुचवलं होतं. सरकारी नोकऱ्यांमध्ये लिपिक पदासाठी बऱ्याच जागा निघतात तर ते उपयोगी पडेल.

ते लोकं त्यांचा फायदा करून घेण्यासाठी सुचवत असतात. पण तिला त्यामध्ये इंटरेस्ट नव्हता.
                           
घरचं सगळं काम आवरून ती कोर्सला जात होती. तसं तर काम्पुटर तिने लांबून पाहिलं होतं पण हातात कधी घेण्याची वेळ आली नव्हती.

तिला सतत नवीन गोष्टी शिकण्यात इंटरेस्ट असायचा.पण घर कामा मधल्या नवीन गोष्टी तिला कधी शिकण्यात रस नव्हता.

तिची आई तिला समजावून सांगत होती की , " मुलीच्या जातीने सगळा स्वयंपाक शिकून घ्यायला हवा " .

तिने जबरदस्तीने स्‍वयंपाक शिकून घेतला होता पण तिला मनापासून करावासा वाटत नसे.

तिला पण वाटत होते की , ' मला असेच का वाटते. मला स्वयंपाकाची आवड का नाही ?

एकदा स्वयंपाक शिकला की आई मला सारखेच करायला लावेल ' .

यामुळे ती टाळाटाळ करत असायची.

पण टोमणे खाऊन -खाऊन एकदाचा तिने स्वयंपाक शिकून घेतला.

तिला वाटलं आता आई काही बोलणार नाही. पण जेवढा आपण शिकू तेवढं ते वाढतच जातं.

" नवीन-नवीन अशा बऱ्याच रेसिपी असतात, आता ते शिकून घे " , असं घरातील तिच्या मागे लागले.

तिला खरंच मनापासून स्वयंपाक करायला आवडत नसे पण बऱ्याच नवीन रेसिपी टेस्ट करायला मात्र आवडत होते.

ती विचारच करत होती की, ' माझं लग्न झाल्यावर कसं होणार आहे ?

रोज -रोज स्वयंपाक कंटाळवाणे वाटते.

सर्व बायका कशा करत असतील ?

खरंच त्यांचं कुटुंबावर प्रेम आहे म्हणून करतात की जबरदस्तीने त्यांना करायला लावतात ?

हा एक गूढ प्रश्न च आहे .

जाऊ दे .  त्यांच्या -त्यांच्या मनाप्रमाणे त्या करतात पण मला मात्र स्वयंपाक करण्याची अजिबात इच्छा नाही.

मला स्वयंपाकासाठी कोणीतरी बाहेरून स्वयंपाकीण बाई च ठेवावी लागेल. तिला ठेवण्यासाठी मला कमावते बनावे लागेल.

कारण आपण एका सामान्य कुटुंबात आहोत तर लग्नानंतर ही मला काही खूप गर्भश्रीमंत कुटुंब मिळणार नाही.

त्यामुळे एक तर स्वयंपाकाची आवड करून घ्यावी लागेल किंवा कमावते बनावे लागेल .

काही ही काम न करता नुसतं बसून राहणे पण योग्य होणार नाही.

रिकामं मन सैतानाचं घर असं म्हणलं जातं. ते काही खोटे नाही.

तसे घरातील कोणी ही मला निवांत रिकामटेकडे बसू ही देणार नाहीत . त्यामुळे काही ना काही तरी करतच राहावे लागणार आहे ' .
                         
साक्षी ची सुट्टी अशीच संपत चालली होती.

शहरातील मैत्रिणींचा संपर्क ही तुटला होता.

फोनवर कधी तरच मेसेज येत असे. त्यावरून तिला कळत होते की रिझल्ट कधी लागेल, ऍडमिशन प्रोसेस कधी चालू होईल.

पण सगळ्यांचे वेगवेगळे मार्ग असल्यामुळे कोण कुठे जाणार आहे हे निश्चित नव्हते.

तिला कोणाचे मार्गदर्शन घ्यावे हे घरी बसून समजत नव्हते.

तिला तीव्रतेने असे जाणवत होते की , ' सरकारनेच काहीतरी मुलांसाठी करायला हवे. सरकार तर्फे एक सेंटर प्रत्येक गावागावांमध्ये उभी राहायला हवेत. ज्यामध्ये दहावीनंतर प्रत्येक क्षेत्रात जाणाऱ्या संधीची माहिती मिळायला हवी.

घरची परिस्थिती नसेल तर शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या योजनेबद्दल ही माहिती मिळायला हवी. जेणेकरून गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या संधी मुकणार नाहीत.

अशा काही संस्थाही असतात त्या मदत करतात त्याबद्दल ही माहिती मिळायला हवी.

रोज कॉलेजला न जाता फक्त परीक्षेपुरता जाऊ शकतो, अशा ही कॉलेजची माहिती मिळायला हवी.

शिक्षणाबरोबरच पुढील नोकरीच्या संधीबद्दल ही माहिती मिळायला हवी .

जेणेकरून खेड्यातील विद्यार्थी हा सारासार विचार करूनच त्या दृष्टीने पाऊल टाकेल ' .
                       
' प्रत्येक खेडं जर सक्षम बनत जाईल तर आपला पूर्ण भारत देश नक्कीच आर्थिक दृष्ट्या सक्षम व साक्षर ही बनेल.

प्रत्येक पालकाचे आपल्या मुलाबद्दल फक्त लग्न करून देणे एवढेच ध्येय न राहता त्यांना त्यांच्या पायावर उभे करून देणे हेच ध्येय असायला हवे. हाच विचार समाजामध्ये रुजवायला हवा.

त्यासाठी सरकारनेही समाजप्रबोधन करायला हवीत.

जर समाजाची विचाराने प्रगती झाली तरच अन्यायकारक गोष्टी कोणत्याही स्तरातील स्त्रींयावर होणार नाहीत.

समाजातील प्रत्येक व्यक्ती हा पोशाखाने सुशिक्षित न दिसता तो विचाराने सुशिक्षित दिसायला हवा.

तरच आपला भारत देश हा सुजलाम-सुफलाम बनेल.

सगळेजण सुख- समाधानाने गुण्यागोविंदाने नांदतील .

ह्या आपल्या भारत मातेलाही त्याचा अभिमान वाटेल ' , असे तिला तीव्रतेने जाणवत होते.
                         
' प्रत्येक जण जन्म घेतो. पिढी ने पिढी पुढे जाते पण विचारांमध्ये मात्र हवी तशी क्रांती होत नाही.

जशी डिजिटल युगामध्ये क्रांती झाली. तशी विचारांमध्ये ही क्रांती व्हायला हवी.

नाहीतर आजकाल समाजामध्ये आपण आजूबाजूला बघतच असतो. सुशिक्षित लोकं ही विचारहीन दिसतात . त्यामुळे समाजामध्ये जे काही अन्यायकारक घटना घडतात त्या चांगले विचार न रुजल्यामुळे च होतात .

त्यामुळे आपल्या मुलांचे जडणघडण होताना विचारांवर ही काम करायला हवे.

नाहीतर मग जे मनात येईल ते सोशल मीडियावर तर व्यक्त होताना दिसतातच. नंतर त्याचे परिणाम ही भोगावे लागतात.

त्यामुळे आपले विचार हे श्रेष्ठच असायला हवेत .

प्रत्येक माणूस हा विचार अगोदर करतो आणि त्यानंतर त्याच्याकडून कृती केली जाते. त्यामुळे आपल्या विचारावर स्वतःचा कंट्रोल असावा ' , असे तिला वाटत होते.
                             
जगामध्ये स्पर्धा तर खूप वाढली होती.

तिला ला वाटत होते की , ' माझ्या मैत्रिणी मला पुढे आयुष्यामध्ये मदत करतील की नाही.

प्रत्येक जण आपल्याला संधी मिळावी म्हणून प्रयत्न करणार.

ऍडमिशन पासून होणारा प्रवास हा नोकरी पर्यंत जाऊन लग्नापर्यंत थांबणार.

त्यामुळे आपली जिवलग मैत्रीण आपल्याला मार्गदर्शन करेल की नाही माहित नाही.

मी जसा विचार करते तसं माझ्या बाबतीत ही लागू होते.

कारण माणूस हा विकार विषयाने बनलेला आहे . त्यामुळे त्याच्याकडे कधी ना कधी स्वार्थ हा भाव उभा राहणारच.

जगामध्ये अशी कमी लोकं असतील जी निस्वार्थी मनाने राहतात .

माझ्या अनुभवातून तरी पुरुषांमध्ये जास्त स्वार्थी स्वभाव दिसत नाही .

बायकांमध्ये तो तीव्र का असतो याचे कारण मात्र माहीत नाही.

खरंच यावर कोणी तरी संशोधन करायला हवे ' , असे तिला वाटले.

साक्षीच्या डोक्यामध्ये असे चित्रविचित्र विचार येत- जात असत.

कारण तिला आजूबाजूला तशी परिस्थिती दिसायची. त्यामुळे तिला विचार करणे च भाग पडत होते.

ती त्यातून '  चांगला समाज कसा निर्माण होईल ' , हाच विचार करत असे.

पण तिच्या मध्ये सेवाभावाची इच्छा मात्र नव्हती.

फक्त सेवाभाव मनाने होत होता तो कृतीत मात्र उतरत नव्हता. त्यावर तिला काम करावे लागणार होते.

त्याशिवाय ती डॉक्टर कशी बनणार ?

डॉक्टर बनण्यासाठी सेवाभाव , समर्पण अशा गोष्टी लागतात. फक्त म्हणलं आणि बनलो असे होत नाही. त्यासाठी कृती करणे महत्त्वाचे ठरते.

क्रमशः

                              

🎭 Series Post

View all