Feb 26, 2024
नारीवादी

'स्व'तःचा शोध (भाग 17)

Read Later
'स्व'तःचा शोध (भाग 17)

साक्षी आता मोठी झाली होती.

तिच्या मनामध्ये वादळ थैमान घालत होते.

करिअरची पण तीच वेळ आणि लग्न जमवण्याची पण तीच वेळ.

' कोणत्या वाटेने गेले म्हणजे आपण आपल्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचतो ' , हे काही साक्षीला समजत नव्हते.

कधी-कधी आई- बाबांचे बोलणे एकूण तिला वाटत होते की , '  आपण लग्नाला संमती देऊन तिकडे गेल्यावर करिअर करावे ' .

पण आपण तर काहीच नाही बनलो तर होणारा नवरा कसा असेल. सध्या आपण तर काहीच पसंती सांगू शकणार नाही. आपण काही बनलो तरच बोलू शकणार आहोत आपल्या जोडीदाराबद्दल. सध्या तरी समोर जे आहे ते स्वीकारणे एवढेच आपल्या हातात आहे. आई-वडिलांची पसंती तीच आपली पसंती असणार आहे. कारण मी कोणताही निर्णय ठाम घेऊ शकणार नाही. मी अजून अपरिपक्व च आहे. साक्षीचे मन बेचैन होत होते. लग्न हा नकोसा विषय वाटत होता.पण तिला समाजामध्ये सगळीकडे दिसत होते की मुलगी मोठी झाली की फक्त तिच्या लग्नाचा च विषय प्रत्येक जण करतो. शिक्षणाविषयी कमीच बोलले जाते. असे का?
                      साक्षीने ठरवले होते की होता होईल तेवढा विषय टाळलेला च बरा. घरून खूपच प्रेशर आले तरच विचार करावा. सध्या तरी आपण CET व NEET वरच लक्ष केंद्रित करावे.साक्षीने कॉलेजमध्ये शिक्षकांनी जे काही शिकवले होते त्यानुसारच अभ्यास सुरू ठेवला होता. खरंतर प्रश्नपत्रिकांचा सराव ,जे टॉपिक व्यवस्थित समजले नसतील त्यासाठी शिक्षकांची वारंवार मदत घेणे अशा गोष्टी कोणत्याही स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी कराव्या लागतात. पण साक्षीला मात्र स्वतःच्या अभ्यासावरच जोर द्यावा लागणार होता. पण स्वतः करून- करून तरी किती अभ्यास असा करणार होती. तिला तरी कुठे माहीत होते की कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत. सरावासाठी प्रश्नपत्रिका कुठून आणणार होती.मार्केटमध्ये त्यासाठी खूप पुस्तके उपलब्ध असतात पण त्याची माहिती साक्षीला नव्हती. तिच्या मैत्रिणींनी ही तिच्याकडे पाठ फिरवली होती. कारण त्यांना माहीत होते की साक्षी मुळातच हुशार आहे. तिचा लगेच नंबर लागू शकतो. ती आपल्या पुढे जाईल. अशी भीती प्रत्येक मैत्रिणीच्या मनामध्ये होती. त्यामुळे तिला कोणीही मदत करत नव्हते. त्याचे गाणे जर तिचा कोणी मित्र असता तर त्याने नक्कीच दिलदार मनाने तिला मदत केली असती. हाच फरक आहे मित्र आणि मैत्रीण मध्ये. पण समाज हा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो मुलगा- मुलीच्या मैत्री कडे.
                        साक्षीला वाटत होते की जशी आपली कॉलेजची परीक्षा होती तशीच CET व NEET पण असेल. तिच्या परीने अभ्यास पूर्ण केला. एम आय सी आय टी ची पण परीक्षा पंधरा दिवसावर आली होती. अभ्यासामध्ये थोडी गुंतल्यामुळे तिच्या डोक्यामध्ये इतर विषय येणे तरी बंद झाले होते. तेवढाच तिच्या डोक्याला आराम.
                         साक्षीच्या नकळत तिच्या घरच्यांनी मुले पाहणे चालू केले होते.आत्या- मामा -मावशी- काका सगळ्यांना सांगून ठेवले होते. नजरेत एखादे चांगले स्थळ असेल तर सांगा. मुलगा नोकरी करणारा असावा. तिच्या घरच्यांची जास्त काही अपेक्षा नव्हती. मुलगा कमावता आणि निर्व्यसनी असावा फक्त एवढेच होते. स्वभाव तर सगळ्याच नवरा मुलांचे चांगले असतात हा गोड गैरसमज समाजामध्ये असतो. फक्त लग्नानंतर तो उघड पडतो.
                       साक्षीने कॉलेजमध्ये जाऊन CET व NEET चा form online भरला. शिक्षकांना माहिती विचारूनच तिने भरला. फॉर्म भरते वेळी त्यामध्ये एक कॉलम होता "जात(cast)". तिने तेव्हा एवढं काही लक्ष दिले नाही. त्या कॅटेगरी या कॉलम कडे.पण जात कॅटेगरीमुळेच तिच्या करीयरची स्वप्नं धुळीला मिळणार होती. तिच्या आयुष्यामध्ये वादळी यायला सुरुवात झाली होती. आतापर्यंत सगळं शांत सुरळीत आयुष्य सुरू होतं. समाजातील अशा बऱ्याच प्रथेमुळे तिचं आयुष्य ढवळून निघणार होतं.
                            पहाटे लवकर उठून ती अभ्यास करीत असे. आईने तर घरातील कामे स्वतःवर ओढवून घेतली होती. त्यामुळे साक्षीला घरातील कामातून थोडा आराम मिळत असे. आईने पण स्वतःचे काम वाढवून ठेवले होते.मेहंदी व उन्हाळी कामं करून स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा तिचा विचार होता. तिच्या पुढच्या शिक्षणा ची तयारी करण्यासाठी ती धडपडत होती. पण साक्षी म्हणत होते की पुढचे शिक्षण घेण्यासाठी मला पहिली पायरी तर चढावी लागेल. अगोदर NEET तर पास होऊ दे. त्यासाठी तो थोडासा तुझं आवडीचं काम बाजूला ठेव. नी फक्त घरातील कामावरच लक्ष दे. त्यामुळे मला फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित करता येईल. कारण आजी -आजोबांची कामे मला अभ्यासात उठवून करायला लागतात. भाऊ पण टी.व्ही. लावून बघत बसतो कधी ही.आजी-आजोबांना पण काही घेणे-देणे नसल्यासारखे सतत टी. व्ही. लावून बसतात. फक्त म्हणतात मुलांना अभ्यास करा पण ते स्वतः कधीही मनोरंजन कमी करत नाहीत. प्रत्येक सामान्य कुटुंबांमध्ये हीच परिस्थिती असते. कमावता एक असल्याने त्या ठिकाणी छोटासाच घर असते. अभ्यासासाठी स्वतंत्र अशी खोली नसते.आजी-आजोबा हे वयाने म्हातारे झाल्यामुळे त्यांनी तरी दुसरं काय करायला हवं म्हणून त्यांना टीव्ही पाहण्यासाठी स्वातंत्र्य मिळते. ते ही त्याचा पुरेपूर फायदा घेतात. साक्षीच्या मनाला हे पटत नव्हते. ज्यांचे सुशिक्षित कुटुंब असते त्या घरामध्ये प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी ही वेगळ्याच प्रकारे केली जाते. त्या घरामध्ये प्रत्येक सदस्य हा जशी काय आपलीच परीक्षा आहे असाच वागत असतो. त्यामुळेच त्या घरातील मुलांना सहज यश प्राप्त होतं. यश असं सहजासहजी कुणाच्या पदरात पडत नाही.त्यासाठी विद्यार्थ्याचे तर अपार कष्ट पाहिजेत पण सोबत जोड घरातील सदस्यांनी ही द्यायला हवी. मग विजय हा आपलाच असणार आहे.
                            साक्षी च्या हातामध्ये आता फक्त थोडाच अवधी राहिला होता. सकाळी वातावरण शांत असते. त्यामुळे ती पहाटे उठून अभ्यास करत असे. नंतर तिला घरातील थोडीफार कामे करावीच लागत होती. आई सोडून इतर कोणीही तिच्या अभ्यासाचा विचार करत नसे. प्रत्येक जण आपल्या मनाला येईल तसे वागत होते. साक्षी कधी दुपारी टीव्ही बंद करून अभ्यासाला बसली तर आजी तिच्याकडे अशा अर्थाने बघत होती की शिकून मोठी दिवाच लावणार आहे ही.आजी मनातलं बोलून जरी दाखवत नसली तरी साक्षीला तिचा स्वभाव असल्यामुळे तिचे मन ती ओळखू शकत होती. एक वेळ आजोबा समजून घेत होते आणि ते निवांत झोपा काढायचे. पण आजी मात्र हार मानत नसायची. तिच्या वर चढ घरामध्ये कोणी केलेली आवडत नसे. आईने तर तिच्यासमोर आपली सगळी हत्यारे अगोदरच खाली ठेवली होती. आजीचा तर इतर वेळी शरीरात प्राण नसल्यासारखे वागत असे. पण आत्या आले की तिला कुठून ऊर्मी मिळते ठाऊक नाही. इतर दिवशी एका जागेवरूनअजिबात न हलणारी आजी आत्या आल्यावर एका जागेवर ती बसतच नसे. असे का करतात सगळ्या आजी(सासवा). हा एक गुढ प्रश्न च असावा.
                        घरोघरी मातीच्या चुली. कोणी कसे वागावे यांना मात्र कोणीही आळा घालू शकत नाही सासरच्या लोकांवर. फक्त त्या घरी दिलेल्या मुलीवर आळा कसा घालता येईल तेवढं बघितलं जातं. कोणी ही पद्धत काढली असेल लग्न करून मुलीनेच मुलाच्या घरी जाऊन राहायचं. साक्षी थांब परीक्षा दोन दिवसावर आली आहे जास्त विचार करू नकोस. तिचे डोके तिलाच प्रश्न विचारत असे. एकदाची माझी करिअरची गाडी सुरू होऊ दे मग मी ह्या कडे लक्ष देईन. कधी ना कधी मला संसारात तर पडावेच लागेल. पण जे योग्य आहे तेच मी स्वीकारेन. कोणत्याही अयोग्य गोष्टीकडे मला कानाडोळा करता येणार नाही. आई जसं सहन करते तसं मला ते शक्य होणार नाही.माझ्या आईसारख्या अशा कितीतरी आहे असतील ज्या सहन करत असतील. पण आता माझ्यासारख्या साक्षीने त्यांच्याही पोटी जन्म घेतलेल्या सर्व साक्षीने ही बंधने तोडून टाकायला हवीत. आता नाही तर कधीच नाही. जेणेकरून पुढे जन्म घेणाऱ्या अशा अनेक साक्षीसाठी मोकळा श्वास घ्यायला मदत होईल. साक्षी ने तात्पुरते हे विचार थांबवले व अभ्यासाला लागली.

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Jyotsna Gaikwad

Electronic Engineer

Hobby to write articles

//