दोष कुणाचा - भाग 5

ovi
दोष कुणाचा - भाग 5

संजय ने हे सांगितल्यावर ओवी रडू लागली..त्याच्यावर ओरडून बोलली तुम्ही समलिंगी आहात मग असं असताना कां माझं आयुष्य खराब केलेत...संजय बोलू लागला...आई ला वाटत होत मी बोलतोय त्यात तथ्य नाही आहे. ते माझ्या मनाचे खेळ आहेत......लग्नानंतर सर्व ठीक होईल असा आईचा अंदाज होता ..आई ला कोण समजावणार...
ओवी म्हणाली तरी मला सारखं वाटत होत..कि तुम्ही एवढे शांत कां आहात....तुम्हाला लग्न मान्य नाही कां अस सारख वाटत होत......संजय म्हणाला...ओवी तू आधी रडणं बंद कर आणि शांत हो...मला काय वाटत एकतर तू तुझ्या आई - बाबांकडे परत जावस किंवा माझ्या बरोबर राहावंसं...
ओवी तू माझ्यावर विश्वास ठेव...मी तुला काहीच कमी पडू देणार नाही....तुला अजून पुढे जेवढं शिकायचं आहे तेवढं शिक...तू आयुष्यात पुढे जा... देवाच्या कृपेनें आपली आर्थिक स्तिथी अगदी उत्तम आहे....तुला शिक्षिका व्हायचं आहे ना तुला पाहिजे तर आपण उदयाच जाऊन तुझं बी ए.ड ला ऍडमिशन घेऊ...
ओवी म्हणाली कि किती सहज बोलताय हे..तुम्हाला समजतंय कां ह्यामुळे मी कधीच मातृत्व सुखं अनुभवू शकत नाही...संजय म्हणाला मला मान्य आहे मी तुझा दोषी आहे...पण खरं सांगतो....मी वाईट माणूस नाही आहे...मी तुला फसवलं हे मला मान्य आहे, मी कसं ही करून तुला सत्य सांगायला हवं होत.....पण मी हतबल होतो अग....माझा नाईलाज झाला....ओवी निर्णय पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे...तू चं ठरव काय करायचं ते....
ओवी विचार करू लागली..काय करू माहेरी जाऊन तिथे गेली तर अजून पाच बहिणी लग्नाच्या आहेत..एक बहीण चार दिवसात पुन्हा माहेरी नवऱ्याला सोडून आली असं सगळ्या एरियात होईल..आणि त्या बाकीच्यांच्या लग्नात अडथळा येईल...
इथे सासरी सासू - सासरे चांगली माणसं आहेत आपल्या बरोबर अगदी मुलीसारखं वागतायत...घरं मोठं आहे....सगळं चं अगदी छान आहे..... संजय ही तसा चांगला वाटतोय स्वभावाने, एक ती गोष्ट सोडली तर त्याला नाव ठेवण्यासारखं काहीच नाही आहे...मित्रासारखा राहतोय अगदी माझ्याबरोबर....
मी शिकली तर मी नोकरीं करेन आणि माहेरी पण थोडी फार मदत करू शकेन...अजून पाच बहिणी शिक्षणाच्या आहेत...माहेरी जाऊन तिथे आजी चे टोमणे चं ऐकत राहावे लागेल...आजी ला आधीच आम्ही मुली नजरेसमोर नको असायचो...आणि मी हे संजय चं सत्य आजी ला सांगितलं तरी तिला ते पटणार नाही...बाबा पण एकतर स्वभावाने खूप कडक आहेत.....आजी अजून आई ला बोल लावेल..काय करू ह्या विचाराने चं ओवी ला रडू आवरत नव्हतं...
संजय तिची अवस्था बघून म्हणाला...ओवी तू झोप बरं आता....जास्त विचार करू नकोस..मी तुझ्यासाठी छान कॉफी करून आणतो...संजय पटकन किचन मध्ये गेला पण..आणि पुढच्या पाच मिनिटात कॉफी घेऊन आला पण..ओवी च्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला...रिलॅक्स हो...आणि ही कॉफी घे...ओवी त्याच्याकडे बघत चं राहिली......

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत ओवी ह्या नात्याबद्दल काय निर्णय घेते ते..)

लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी )

🎭 Series Post

View all