दोष कुणाचा - भाग - 2

ओवी

       ओवी ला दहावी ला नव्वद टक्के मिळतात. मनीषा खूप खुश होते. ओवी चे टक्के कळल्या वर मनीषा ओवी ला सांगते आजी आणि बाबांच्या पाया पड. ओवी आजीच्या पाया पडायला गेली असताना चं आजी बोलते बसं झाली नाटकी शिक्षणाची... काय ते कौतुक तुझ्या आई ला.. मला त्याचं काही नाही हा. मग ओवी सरळ बाबांच्या पाया पडायला गेली तर बाबा पहिल्यांदा खुश होऊन बोलले अशीच प्रगती कर.. खूप मोठी हो...ओवी ला मनातून खूप बरं वाटल.

        ओवी चं सायन्स ला ऍडमिशन घ्यायचं ठरत. म्हणजे तसं तीला सर्व तिच्या शाळेचे शिक्षक सुचवतात. बाबा पण होकार देतात.. आणि मग ओवी कॉलेज ला ऍडमिशन घेते.. पाठीमागच्या बहिणी पण हळू हळू मोठ्या होतं असतात..


       बाबा शिस्तीच्या बाबतीत अतिशय कडक असतात. त्यांना मुलींनी वावगं वागलेलं अजिबात सहन होतं नसे.. ओवी आता पंधरावी ला असते. मुलींनी कॉलेज मधल्या मुलांशी बोललेलं पण बाबांना आवडत नसे.


     ओवी कॉलेज ला शिकत असताना चं एका क्लास मध्ये पाचवी ते सातवी च्या मुलांना शिकवण्याची पार्ट टाईम नोकरी करत असे. आणि तिथेच शिकवणाऱ्या एका दुसऱ्या शिक्षकाचं तिच्यावर प्रेम असत. ओवी ला पण तो सर खूप आवडत असतो. बघता बघता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्याच्या घरची परिस्थिती गरीब असते. वडील वारलेले असतात.. आई लोकांच्या घरी घरकाम करत असे.. लहान बहीण शिकत असते.

      मुलगा स्वभावाने खूप चांगला असतो. परिस्थिती ची जाणं असणारा असतो. प्रतीक चं ग्रॅज्युशन झालेलं असत. तो सध्या चांगल्या नोकरी च्या शोधात असतो.

       ओवी आणि तो मुलगा ( प्रतीक ) एकमेकांच्या प्रेमात पडतात. क्लास सुटल्यावर भेटणे, फिरणे कालांतराने चालू होते. क्लास ला जाताना एकत्र जाणे - येणे चालू होते. प्रतीक् एकदा ओवी ला त्याच्या घरी सुद्धा घेऊन जातो. छोटंसं चं घरं असत दोन रूम चं एका चाळीत, पण ओवी ला खूप आवडतं..प्रतीक त्याच्या आई ला सांगतो ही माझी मैत्रीण ओवी माझ्या बरोबर चं क्लास मध्ये शिकवते. त्याची आई पण ओवी बरोबर पण छान गप्पा मारते.. दोघं ही सध्या , नोकरी करू आणि मग पुढचा विचार करू असा विचार करत असतात.

       असंच सर्व सुरळीत चालू असताना एक दिवस ओवी च्या बाबांना ह्या नात्याची कुणकुण लागते.. बाबा खूप चिडतात. आधी मनीषा ला ओवी च्या आई ला खूप ओरडतात. तुझं मुलींवर लक्ष नाही..असं बोलतात.. ओवी कॉलेज मधून आल्यावर बाबा तीला खूप ओरडतात.


        ओवी सांगते बाबा प्रतीक माझा फक्त मित्र आहे, बाकी आमच्यात काहीच नाही... पण बाबा ऐकत नाहीत आणि बोलतात पंधरावी ची परीक्षा व्हायला अजून एकचं महिना उरला आहे तो पर्यंत रोज मी तुला कॉलेज ला सोडायला - आणायला येणार.. आणि तुझ्या त्या शिकवण्या आजपासून बंद म्हणजे बंद...ओवी खूप रडते बाबा असं करू नका.. असं सांगते पण बाबा कोणाचंच ऐकत नाहीत..

         आजी बोलते बसं झालं शिक्षण हीच लग्न करून टाकू आता..बाबा पण लगेचच आजीच्या वाक्याला दुजोरा देतात आणि बोलतात मी पण उद्यापासून हिच्या साठी स्थळ बघायची सुरवात करतो... ओवी आणि मनीषा खूप रडतात. पण बाबा आधीच स्वभावाने खूप जिद्दी असतात ते कोणाचंच ऐकत नाहीत...

      आता ओवी वर सगळीकडून खूप बंधन येतात. तीला कुठेच एकटीला पाठवलं जात नाही, इकडे प्रतीक तिची रोज वाट बघून तिच्या एका मैत्रीणी ला विचारतो काय झालं ते आणि ती प्रतीक ला सांगते असं असं झालं आहे... प्रतीक पण खूप हताश होतो.. त्याला ओवी ला अज्जीबात भेटता येत नसतं.

        बाबांना हे ओवी चं वागणं सहन होतं नाही ते खूप रागात असतात.. आणि पुढच्या दोनच महिन्यात ओवी चं लग्न ठरवून टाकतात.. मुलगा कसा आहे काय करतो हे मनीषा ने विचारल्यावर बाबा सरळ बोलले चांगला श्रीमंत आहे.. त्या प्रतीक सारखा नक्कीच नाही आहे.. त्यांच्या कडक स्वभावामुळे मनीषा पण त्यांच्यापुढे काही बोलू शकली नाही..

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - ओवी चं लग्न झालेला मुलगा आणि त्याच्या घरची परिस्थिती )....

( लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )

( राहणार - देवरुख - रत्नागिरी )

🎭 Series Post

View all