Login

दोष कुणाचा - ( भाग -1 )

Ovi

  

              ( हि एक सत्य घटना आहे. )

        ओवी एका सामान्य कुटुंबातली मुलगी, घरची आर्थिक परिस्थिती मध्यम होती. ओवी च्या आई ला सहा मुली त्यातली ओवी एक नंबर ची मुलगी, वडीलांच स्वतः चं एक छोटंसं हेअर कटिंग चं सलून होतं. आणि घरची थोडीशी शेती होती. घरी वडिलांची आई ( आजी ) आणि आई - वडील आणि ह्या सहा मुली असं नऊ जणांचे कुटुंब होतं....

     वडील पाठोपाठ सहा मुली झाल्यामुळे आई वर सतत नाराज असत... सासू पण ओवी च्या आई ला ( मनीषा ) ला खूप त्रास देत असे.. जाता - येता सारखे ओरडत असे.  मुली हे सर्व बघत चं मोठया होतं होत्या. त्यांना आजी चा राग येत असे.. पण सांगणार कोणाला,  त्या बिचाऱ्या गप्प बसत असत..

         ओवी ची आई ( मनीषा )  पण बिचारी आला दिवस रडून घालवत असे..मनीषा ला सासू सतत घरात ओरडत असे. तिच्या प्रत्येक कामात खोटं काढत असे.. जेवढा देता येईल तेवढा त्रास सासू तीला देत असे. मनीषा पण बिचारी नशिबाला दोष देत सगळं सहन करत असे.. सासू सारखी म्हणत असे माझ्या ह्या एकुलत्या एक मुलाला हि असली कसली कमनशिबी बायको मिळाली देव चं जाणो...

       सासू तर मुलींना हात पण लावत नसे.. त्यात सगळयांच मुली लहान लहान होत्या, दोन - तीन वर्षाच्या अंतराने झालेल्या. त्यामुळे मनीषा ला मुलींचं,  शाळेची तयारी एकटीने चं सर्व सकाळी करावी लागत असे... पण सासू मनीषा ची दगदग बघून हि तीला अज्जीबात कामात मदत करत नसे. उलट मुद्दाम तिने केलेल्या जेवणाला नाव ठेवत असे..

       पहिली मुलगी ओवी झाली तेव्हा वडील खूप खुश झाले होते पहिली लक्ष्मी आली घरी म्हणून... पण मग पाठोपाठ सहा मुली झाल्यावर ते मुलींचा राग - राग करू लागले.. मुलींशी नीट बोलत नसतं. मुलींशी जेवढ्याच तेवढं बोलत असत. त्यांची कधीच प्रेमाने विचारपूस करत नसतं. 

      त्यात त्यांचा स्वभाव अतिशय कडक होता.. मुलींनी जास्त कोणाशी बोलायचं नाही. शिस्तीत राहायचं कायम...असं त्यांचं वागणं असे... मुली पण वडिलांना कायम घाबरून चं राहात असत. मोठी मुलगी ओवी पंधरा वर्षाची होती. यंदा दहावीला होती..तिच्या पाठोपाठ च्या ह्या बाकीच्या पाच मुली दुसरी आठवी, तर तिसरी पाचवी ला होती. चौथ्या वेळी आई ला जुळ्या मुली झाल्या होत्या त्या दोघी तिसरीला होत्या.. आणि सर्वांत छोटी पहिलीला होती..

      मनीषा बिचारी एकटीच सकाळी शाळेत नेण्यासाठी सहा मुलींचे डब्बे करत असे. आणि मग सगळ्या शाळेत गेल्यावर घरची सर्व कामं ( केर - लादी पुसणे ) एकटीच करत असे.. त्यातून पण सासू अधून - मधून हे करून दे खायला, ते करून दे अशा बेडवर बसून ऑर्डरी सोडत असे.

     दुपारी जरा मनीषा झोपायला गेली तरी सासू ची भुन - भुन चालूच असे.. सासू लवकर जेवून झोपत असे.. आणि मुद्दाम मनीषा जरा दुपारी आडवी पडायला गेली कि हि उठून मनीषा मनीषा असं ओरडून मला चहा करून दे असं सांगत असे...मनीषा बिचारी काहीच न बोलता गप्प बसत असे. आणि ती सांगणार तरी कोणाला होती माहेरी पण गरिबी चं होती, भावाचं लग्न झालं होतं, त्याला त्याचा संसार होता. आई - वडील पण आता वयोमनानुसार थकलेले होते.

       आणि ती काय बोलणार होती ह्या सगळ्यात दोष तिचा नव्हताचं..दोष होता तर तो नशिबाचा... असं बोलून ती रडत राहात असे..ओवी मोठी होती तीला सर्व समजत असे, दिसत असे आई चा त्रास पण वडिलांच्या कडक स्वभावामुळे तिला आईचं दुःख दिसत असूनही काहीच करता येत नसे.. आणि आजी तर येता - जाता मुलींनचा पाणउतारा करत असे.. काय करताय शिकून - लोकाच्याच घरी जायचं आहे ना शिकून मग कशाला शिकताय असं ओरडत असे सतत..

     पण मनीषा ला खूप वाटत असे कि मुलींनी शिकावं, खूप मोठं व्हावं, नाव कमवावं, ती मुलींना म्हणत असे तुम्ही तुमचा अभ्यास करा, आजी च्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका... ओवी आई ला  अगदी पाचवीला असल्यापासून घरकामात मदत करत असे, अंगणाचा कचरा काढणे, कधीतरी चहा ची भांडी घासणे हि छोटी, मोठी कामं ओवी करत असे... पण मनीषा तीला सांगत असे तू अभ्यास कर, खूप मोठी हो....

          ( पुढच्या भागात आपण बघणार आहोत ह्या सर्व परिस्थिती मधून ओवी आणि ओवी ची आई कशा बाहेर पडतात ते )....

( लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )

( राहणार - देवरुख - रत्नागिरी )

0

🎭 Series Post

View all